नवीन घर बांधताना भिंती आणि सौंदर्यासोबतच भविष्यात होणाऱ्या नुकसानापासून घराचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे असते. त्यातही ‘वाळवी’ हा असा शत्रू आहे, जो डोळ्यांना न दिसता लाकडी फर्निचर आणि घराची पायाभरणी आतून पोखरून टाकतो. एकदा का वाळवीने घरात प्रवेश केला की महागडे फर्निचर वाचवणे कठीण होते. त्यामुळे घर बांधणीच्या वेळीच, विशेषतः बेड काँक्रीट घालताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
बेड काँक्रीट करताना घ्यावयाची काळजी
१. अँटी-टर्माइट केमिकल ट्रिटमेंट: बेड काँक्रीट ओतण्यापूर्वी जमिनीच्या मातीवर विशिष्ट कीटकनाशक केमिकल्स जसे की Chlorpyrifos किंवा Imidacloprid ची फवारणी करावी. मातीमध्ये केमिकल चांगल्या प्रकारे मुरू दिल्यास वाळवीचा जमिनीतून वर येणारा मार्ग कायमचा बंद होतो.
गाई-म्हशींचेही असतात ‘मूड स्विंग्स’! धार काढताना किंवा चारा टाकताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी
२. काँक्रीटचा दर्जा आणि जाडी: बेड काँक्रीट घालताना सिमेंट, वाळू आणि खडीचे प्रमाण योग्य असावे. काँक्रीटमध्ये कुठेही भेगा किंवा पोकळी राहू देऊ नये, कारण वाळवी या बारीक भेगांमधूनच वर येते. काँक्रीटची जाडी कमीत कमी ३ ते ४ इंच असावी.
३. वॉटरप्रूफिंग आणि ओलावा नियंत्रण: वाळवी नेहमी ओल्या किंवा दमट जागी लवकर पनपते. त्यामुळे बेड काँक्रीट करताना त्यात वॉटरप्रूफिंग कंपाउंड वापरावे, जेणेकरून जमिनीतील ओलावा वरच्या मजल्यापर्यंत किंवा फर्निचरपर्यंत पोहोचणार नाही.
फर्निचर वाचवण्यासाठी इतर आवश्यक उपाय






