Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या इतिहासातील शक्ती आणि श्रद्धेचे केंद्र, कोणत्या ठिकाणी आहेत मारुतीस्थाने जाणून घ्या

हनुमंताच्या कृपेने बलोपासना दृढ व्हावी, कणखर माणसे घडावीत, यासाठी समर्थांनी ठिकठिकाणी मारुती स्थापन केले असावेत. समर्थांनी मारुतीच्या उपासनेतून सुदृढ शरीर, स्थिर मन आणि तीक्ष्ण बुद्धी यांचे माहात्म्य लोकांपर्यंत नेले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 31, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्राच्या इतिहासातील शक्ती आणि श्रद्धेचे केंद्र
  • मारुतीस्थाने कोणती आहेत
  • मारुतीस्थाने कोणत्या ठिकाणी आहेत
 

 

सोळाव्या शतकाच्या ज्या कालखंडात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात जाणतेपणी शस्त्र धरले, एकेक गाव – एकेक मावळा जोडत महाराष्ट्रधर्म वाढविला, त्याच कालखंडात समर्थ गावोगावच्या तरुणांना शक्ती-बुद्धी-युक्तीची उपासना हनुमंताच्या माध्यमातून शिकवीत होते. हा केवळ योगायोग नव्हता. महाराजांमध्ये समर्थांना श्रीराम दिसत होते, तर त्यांच्या जिवाला जीव देणारे मावळे प्रत्यक्ष मारुतीचे रूप. शिवाज्ञा शिरोधार्य मानून अन्यायाविरुद्ध तुटून पडणारे सारे मावळे हे हनुमंतस्वरूप होते.

महाराष्ट्राच्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी अकरा मारुती स्थापन केले, जे अतिशय प्रसिद्ध आहेत. चाफळ इथे स्थापन केलेल्या दास आणि प्रताप मारुतीच्या स्थानापासून नजीक अंतरावर ही मारुती मंदिरांची मालिका आहे. इतक्या कमी अंतरावर इतकी देवालये, तीही मारुतीची यामागे समर्थांची काही विशिष्ट योजना असली पाहिजे.

ही आहेत मारुती स्थाने

चाफळक्षेत्रीचे दोन मारुती – प्रभू श्रीराम यांनी समर्थांना दिलेल्या दृष्टांतानुसार त्यांना अंगापूरच्या डोहातून प्रभू रामचंद्राची मूर्ती मिळाली. सन 1648 साली चाफळ इथे श्रीराम मंदिर उभे राहिले. पुढे कोयनेच्या भूकंपात या राम मंदिराची पडझड झाली होती. परंतु त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली. चाफळ इथे समर्थांनी श्रीरामांच्या सन्मुख दास मारुतीची स्थापना केली आहे. दास्यभक्ती म्हणजे देवाच्या सख्यत्वासाठी, पडो जिवलगांशी तुटी. भक्तीच्या या आविष्कारात कुठेही गुलामीचा हीन भाव नसून भक्ताचा आराध्य दैवतावर संपूर्ण विश्वास आणि मनात सर्वशरणभाव असणे अभिप्रेत आहे. समर्थ हे स्वत: रामभक्त हनुमंतरूप होते आणि श्रीरामचरणी ते दास्यभक्तीनेच लीन झाले होते.

Chanakya Niti: खिशात पैसे टिकत नाही आहेत का? जाणून घ्या चाणक्याच्या या गोष्टी

 

शिंगणवाडी

या मारुतीला खडीचा मारुती/चपेट मारुती असे संबोधन आहे. समर्थांनी 1650 साली याची स्थापना केली. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ यांची भेट घडली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिंगणवाडीपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर एका उंच टेकडीवर रामघळ आहे. समर्थांनी रामघळीत बराच काळ आध्यात्मिक चिंतन-मनन केले. याच ठिकाणी शिवरायांची तहान भागविण्यासाठी त्यांनी कुबडी उलथून खालचे पाणी प्रवाहित केले, असे सांगतात. ही जागा कुबडीतीर्थ म्हणून ओळखली जाते.

माजगावचा मारुती

चाफळपासून तीन कि.मी. अंतरावर माजगावचा मारुती आहे. माजगावच्या वेशीवर पूर्वी घोड्याच्या आकाराचा एक गावरक्षक धोंडा ठेवलेला असे. त्याची पूजाही होत असे. गावकरी लोकांनी समर्थांना या देवतेची विधिपूर्वक प्रतिष्ठापना करण्याची विनंती केली, तेव्हा या धोंड्यावर आकार कोरून त्याला समर्थ रामदास यांनी मारुतीचे रूप दिले. हा मारुतीदेखील चाफळसंमुख असून मारुतीचे व्यवस्थापनही चाफळ येथूनच केले जाते. माजगावचे आज दिसणारे मंदिर श्रीधरस्वामी यांनी उभारलेले आहे. मंदिराच्या भिंतीवर उड्डाण करणार्‍या मारुतीचे उत्तम चित्र रेखाटले आहे.

बाहे बोरगाव

वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या रामलिंग बेटावर वसलेले मारुतीचे क्षेत्र म्हणजे बाहे बोरगाव हे निसर्गरम्य ठिकाण आहे. इथला मारुती दोन बाहू पसरून उभा आहे, हे इथले वैशिष्ट्य. असे म्हणतात की रावणाचा वध करून श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईसह या स्थानी आले असताना दोन्ही बंधू कृष्णास्नान करायला गेले. त्यानंतर शिवपिंडीची पूजा करताना कृष्णा नदीचे पाणी पुष्कळ वाढले. सीतामाईला याचा त्रास होऊ नये, म्हणून मारुतीने आपले दोन्हीही बाहू विस्तारले आणि नदीचा प्रवाह अडविला. त्या वेळी नदी विभागली आणि मध्ये बेट तयार झाले, तेच हे रामलिंग बेट.

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीपूर्वी या वस्तू घरी आणल्याने वाढेल सुख समृद्धी

शहापूर

इथला मारुती सन 1645 साली स्थापित झाला. ही मूर्ती चुन्याची आहे, म्हणून तिला चुन्याचा मारुती असेही म्हणतात. या मारुतीच्या मस्तकी गोंड्याची टोपी आहे. रूप उग्र आहे. मारुतीची कथा मोठी रंजक आहे. शहापूर गावालागत चंद्रगिरी डोंगरावर समर्थ मुक्कामाला असताना या गावच्या बाजीपंत कुलकर्णी यांच्या घरीही ते भिक्षा मागायला जात असत. परंतु बाजीपंतांच्या पत्नी सतीबाई समर्थांना कधीही भिक्षा वाढत नसत आणि वर गोसावडा म्हणून हेटाळणी करत असत. एकदा कुळकर्णी यांना तिथल्या मुसलमान अंमलदाराने हिशोब चुकल्याचे कारण सांगून अन्यायाने अटक केली आणि शिपाई त्यांना घेऊन विजापूरला निघाले. त्या वेळी समर्थांनी शहापुरात चुन्याचे मारुतीराय घडविले आणि या संकटातून सोडविण्यासाठी हनुमंताचा धावा आरंभला. कुळकर्णी सुटून परत आले. परिणामी कृतज्ञभावाने कुलकर्णी कुटुंब व गावकरी मारुतीचे निस्सीम भक्त झाले.

बत्तीस शिराळे

हे गाव नागपंचमीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. समर्थांनी स्थापिलेल्या मारुतीस्थानासाठीदेखील हे स्थान प्रसिद्ध आहे. रामदासस्वामींचे एक शिष्य महादजी देशपांडे यांच्या आग्रहावरून शिराळे इथे समर्थांनी 1655 साली उत्तराभिमुख वीर मारुतीची स्थापना केली. आजही देशपांडे कुलाकडे इथली व्यवस्था आहे. वीर मारुतीची मूर्ती सात फूट उंच आहे. या मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या अंगाला झरोके आहेत. रोज सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी मूर्तीवर झरोक्यामधून सूर्याची किरणे पाझरतात. हे अतिशय मनोहर दृश्य पाहण्यासारखे असते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अकरा मारुती स्थाने म्हणजे काय?

    Ans: समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात स्थापन केलेली ११ मारुती मंदिरे ‘अकरा मारुती’ म्हणून ओळखली जातात.

  • Que: अकरा मारुती कोणकोणती आहेत?

    Ans: चाफळ (दास मारुती, प्रताप मारुती), शिंगणवाडी, माजगाव, उंब्रज, बाहे बोरगाव, मनपाडळे, शहापूर, मसूर, बत्तीस शिराळे आणि पारगाव ही प्रमुख स्थाने आहेत.

  • Que: अकरा मारुती स्थळांना भेट देण्याचे महत्त्व काय आहे?

    Ans: या स्थळांना भेट दिल्याने भक्ती, शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी जोडले जाण्याचा अनुभव मिळतो.

Web Title: Centers of power and faith in maharashtra discover the sacred maruti temples

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Maruti

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
2

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
3

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
4

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.