Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaitra Navratri 2026: चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना कशी करावी? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. या दिवशी शुभ मुहूर्तावर कलश स्थापना करणे चांगले मानले जाते. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना करण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 16, 2026 | 02:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चैत्र नवरात्रीची सुरुवात कधी होत आहे
  • चैत्र नवरात्रीला कलश स्थापना कधी करावी
  • कलश स्थापना करण्याचे धार्मिक महत्त्व
 

 

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शकिनुसार, नवरात्र वर्षातून चार वेळा येते, त्यापैकी एक शारदीय नवरात्री, एक चैत्र आणि दोन गुप्त नवरात्री आहेत. चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत २०२६ मध्ये चैत्र नवरात्री कधी सुरू होत हे जाणून घेऊया.

चैत्र नवरात्रीचे महत्त्व

चैत्र नवरात्र ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येते आणि या सणाला वसंत नवरात्री असेही म्हणतात. चैत्र नवरात्रोत्सव मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. हा शुभ सण हिंदू नऊ दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात. नवरात्रीचा प्रत्येक दिवस दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित असतो आणि त्यानुसार पूजा केली जाते. चैत्र नवरात्रीचे पर्व १९ मार्च ते २७ मार्च असे नऊ दिवस साजरे होईल. १९ मार्चपासून सुरू होऊन २७ मार्च रोजी रामनवमीला चैत्र नवरात्र संपेल.

Gudi Padwa 2026: नववर्ष स्वागतयात्रेची सुरुवात कधी आणि कशी झाली तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या इतिहास

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. त्यासाठी शुभ मुहूर्त हा १९ मार्च रोजी सकाळी ०६ वाजून ५२ मिनिटांपासून ते सकाळी ०७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असेल. तर कलश स्थापनेसाठी दुपारी १२ वाजून ०५ मिनिटांपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असेल.

‘कन्यापूजन कधी केले जाते?

नवरात्रीत कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी या तिथी विशेष महत्त्वाच्या आहेत. कन्यापूजन दोन्ही तिथीना केले जाते. २०२६ मध्ये चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी २६ मार्च रोजी असेल आणि नवमी २७ मार्च रोजी असेल. या दोन्ही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता.

Mahabharat Navratri Story: रावणसोबतच या पांडवानेही केली देवी दुर्गेची पूजा

कलश स्थापना विधी

नवरात्रोत्सवात दररोज सकाळी लवकर उठले पाहिजे. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पूजास्थानावी स्वच्छता करावी. नंतर तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी भरावे. कलशावर रोळी घालून स्वस्तिक बनवावे, त्यानंतर कलशावर आंब्याची पाने व नारळ ठेवावा. नऊ दिवसांचा उपवास आणि उपासना कोणत्याही समस्येशिवाय पूर्ण करण्यासाठी तुम्ही श्री गणेशाची प्रार्थना केली पाहिजे. नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला फळे, फुले, मिठाई आणि प्रसाद अर्पण करावा. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दुर्गा देवीची आरती करावी.

दुर्गेच्या नऊ रूपांची नावे

शैलपुत्री, ब्रह्मचारिणी माता, चंद्रघंटा माता, कुष्मांडा, स्कंद माता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कलश स्थापना म्हणजे काय?

    Ans: कलश स्थापना किंवा घटस्थापना ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाणारी विशेष पूजा आहे. यात पवित्र कलश ठेवून देवी शक्तीचे आवाहन केले जाते.

  • Que: कलश स्थापना कशी करतात?

    Ans: प्रथम स्वच्छ जागी मातीचा किंवा तांब्याचा कलश ठेवला जातो. त्यात पाणी, सुपारी, नाणे आणि आंब्याची पाने ठेवली जातात. त्यावर नारळ ठेवून देवीचे आवाहन केले जाते आणि पूजा केली जाते.

  • Que: नवरात्रीत कलश स्थापनेचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: कलश हा समृद्धी, शक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. नवरात्रीत कलश स्थापना केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Web Title: Chaitra navratri 2026 how to kalash sthapana on the first day religious significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास
1

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व
2

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम
3

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण
4

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.