Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Grahan 2025: चंद्रग्रहणानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे का? जाणून घ्या त्यामागील कारणे

आज रविवार, 7 सप्टेंबर रोजी भारतामध्ये चंद्रग्रहण दिसणार आहे. या चंद्रग्रहणानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे कारण नकारात्मक ऊर्जा आणि आजारांपासून संरक्षण होते, असे म्हटले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 07, 2025 | 01:45 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आज रविवार, 7 सप्टेंबर रोजी भारतामध्ये होणार आहे. या ग्रहणाची सुरुवात आज रात्री 9.58 वाजता सुरु होणार आहे आणि 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1.26 पर्यंत हे ग्रहण चालणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास ​​38 मिनिटे असणार आहे. ग्रहणाच्या वेळी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. त्यापैकी एक नियम म्हणजे ग्रहणानंतर आंघोळ करणे. यामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. यामागील एक महत्त्वाची कथा म्हणजे महाभारताच्या काळामध्ये ज्यावेळी देवी राधा, यशोदा आणि नंद बाबा ग्रहणानंतर आंघोळ करुन कुरुक्षेत्रात येत असत. ग्रहणानंतर स्नान करणे आवश्यक आहे का? ग्रहणानंतर स्नान करण्याचे काय फायदे आहेत? ग्रहणानंतर जर कोणी स्नान केले नाही तर काय होईल? जाणून घ्या

ग्रहण कोणत्या अशुभ ग्रहांमुळे होते

धार्मिक मान्यतेनुसार, राहू आणि केतू हे दोन्ही अशुभ ग्रहांमुळे चंद्र आणि सूर्यग्रहण होतात. चंद्रग्रहणादरम्यान केतू चंद्रावर परिणाम करतो आणि त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो. त्यानंतर आसुरी शक्ती लवकर संपत नाही. ग्रहणानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत.

Vastu Tips: तुम्हाला नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत का? जाणून घ्या वास्तूचे उपाय

ग्रहणानंतर आंघोळ करणे का आवश्यक आहे

ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहणानंतर प्रत्येकाने आंघोळ केली पाहिजे. पुराणांमध्ये उल्लेख केल्यानुसार, मुलाच्या जन्माच्या वेळी, यज्ञ, सूर्य आणि चंद्र संक्रांती, जरी रात्रीच्या वेळी असली तरी, स्नान करून स्वतःला शुद्ध केले पाहिजे. जर असे केले नाही तर शरीर अशुद्ध राहते.

ग्रहणाच्या वेळी शरीर अशुद्ध होते आणि पूर्वजांच्या कार्यासाठी ते पुन्हा शुद्ध करणे आवश्यक असते. असे म्हटले जाते की, ज्यावेळी ग्रहण असते त्यावेळी अनेक नकारात्मक शक्ती जवळ येतात.

काय आहेत वैज्ञानिक कारणे

जर आपण व्यवस्थितरित्या पाहिल्यास चंद्रग्रहणाच्या वेळी अनेक प्रकारच्या जंतूंचा प्रभाव वाढतो. ग्रहणाच्या वेळी चंद्रातून निघणाऱ्या प्रकाशाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहता चंद्रग्रहणाच्या वेळी आंघोळ करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. असे केल्याने अनेक आजारांपासून सुटका होते.

Pitru Paksha 2025: पितृपक्षानंतर घर किंवा जमीन खरेदी करायची असल्यास सप्टेंबर महिन्यात काय आहे मुहूर्त

ग्रहणाच्या आधी आंघोळ करण्याचे फायदे

ग्रहणानंतर आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत असतीलच पण ग्रहणाच्या आधी आंघोळ करण्याचे देखील फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी देवाची पूजा आणि ध्यान करणे पुण्यपूर्ण आहे. त्यामुळे ग्रहण लागण्यापूर्वी, देवाच्या मूर्तींना स्पर्श न करता, संपूर्ण कुटुंबासह स्नान करावे आणि स्तोत्रे म्हणावीत किंवा मंत्र म्हणावेत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Chandra grahan 2025 reasons why taking a bath after a chandra grahan is important

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.