फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार, 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे. आज चंद्रग्रहण देखील आहे. ग्रहणाचा पितृपक्षावर कोणताही परिणाम होत नाही. हे कार्य पुढील 15 दिवस चालणार आहे. या काळात कोणत्याही शुभ वस्तूंची खरेदी केली जात नाही. मात्र ज्यांना घर, जमीन इत्यादींची खरेदी करायची आहे किंवा गृहप्रवेश करायचा आहे, यासाठी पितृपक्षानंतर कोणत्या मुहूर्तावर खरेदी करता येईल ते जाणून घ्या
लोकांच्या विश्वासानुसार, पितृपक्षाचा काळ हा अशुभ मानला जातो. या दिवसांत काहीही खरेदी केल्याने अशुभ परिणाम मिळतात, असे म्हटले जाते. असे देखील म्हटले जाते की, पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी केल्याने पूर्वजांना राग येतो. पितृपक्षात खरेदी केलेल्या वस्तू पूर्वजांना समर्पित असतात, अशी मान्यता आहे.
पितृपक्षाची समाप्ती 21 सप्टेंबर रोजी होत आहे. पंचांगानुसार, सप्टेंबर महिन्यामध्ये मालमत्ता, घर, जमीन खरेदी करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत.
गुरुवार, 25 सप्टेंबरपासून दुसऱ्या दिवशी 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.9 ते सकाळी 5.26 वाजेपर्यंत.
शुक्रवार, 26 सप्टेंबरपासून दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 5.26 ते सकाळी 5.27 पर्यंत राहील.
25 आणि 26 हे दोन्ही दिवस नवरात्रीचे असून घर खरेदी करण्यासाठी हा काळ खूप शुभ मानला जातो. या दिवशी देवी दुर्गेचा आशीर्वाद देखील मिळेल.
योग्य वेळी मालमत्ता खरेदी केल्यास गुंतवणूक सुरक्षित होते. याशिवाय कुटुंबात समृद्धी आणि स्थिरता देखील येते. त्यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा दीर्घकाळ वास राहतो आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते.
रोहिणी, उत्तरा आषाढ, उत्तरा भाद्रपद आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र या नक्षत्रामध्ये जमीन, मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ आहेत. तसेच इमारत, कारखाना, घर बांधणी इत्यादींचा पाया उभारण्यासाठी हे नक्षत्र अनुकूल राहील.
मंगळ हा भूमी आणि संपत्तीचा ग्रह आहे. त्याचा प्रभाव व्यक्तीच्या भावावर चौथ्या घरावर होत आहे. गुरु आणि शुक्र महत्त्वाचे आहेत कारण ते घर घेण्यास मदत करणारे शुभ ग्रह आहेत.
वास्तुशास्त्रानुसार, अशा ठिकाणी घर खरेदी करावे ज्याठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवा फिरती असेल.
घराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)