December 2026 Marriage Dates (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
तुळशी विवाहानंतर डिसेंबर महिन्यात विवाह मुहूर्तांना सुरुवात होते. वर्षातील डिसेंबर महिन्यात विवाहाचे शुभ मुहूर्त असतात.भारतीय समाजात हिंदू धर्मामध्ये लग्न मुहूर्त ,तारीख ,वेळ या गोष्टींना महत्वाचे मानले जाते. .ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर विवाह केल्यानमुळे नवीन दांपत्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रेम आणि आनंदाने सुरुवात होते असे धार्मिकतेने मानले जाते . त्यांच्या नवीन प्रवास हा सुखकर व्हावा हा हेतू असतो.तुम्ही 2026 मध्ये डिसेंबर महिन्यात लग्न करण्याचा विचार असेल , तर येत्या महिन्यातील शुभ विवाह तारखा, तिथी, नक्षत्र आणि मुहूर्त यांसंबंधीची माहिती पुढील तारखांमधून जाणून घेऊया.December 2026 Marriage Dates:
भारतीय पंचांगानुसार डिसेंबर 2026 मध्ये विवाहासाठी खालील सात शुभ तारखा आहेत.
१. डिसेंबर 2026 : बुधवार : उत्तराफाल्गुनी
२. डिसेंबर 2026 : गुरुवार : उत्तराफाल्गुनी, हस्त
३.डिसेंबर 2026 : शुक्रवार : हस्त
४. डिसेंबर 2026 : शनिवार : स्वाती
५.डिसेंबर 2026 : रविवार : स्वाती
६. डिसेंबर 2026 : शुक्रवार : उत्तराषाढा
७.डिसेंबर 2026 : शनिवार : उत्तराषाढा
भारतीय पंचांगामध्ये एखादे शुभ कार्य करण्यासाठी सुयोग्य वेळ ठरवली जाते त्यावेळेला शुभ मुहूर्त असे म्हणतात.त्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग, करण आणि ग्रहांच्या स्थितीचा विचार करून मुहूर्त निश्चित करतात.विवाहासाठी शुभ मुहूर्त निवड करताना वधू-वरांच्या जन्मकुंडलीचाही अभ्यास केला जातो. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनासाठी शुभ मुहूर्त निवडण्यास मदत होते, अशी ज्योतिषशास्त्रीय विचारणा आहे.
Black Thread on Feet: पायात काळा धागा बांधताय? 9 गाठींचे रहस्य आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या!
ग्रहांची योग्य स्थिती:विवाह सोहळ्यादरम्यान गुरु, शुक्र, सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांची स्थिती विचारात घेतली जाते.
आनंदी कौटुंबिक जीवनासाठी: योग्य शुभ मुहूर्तावर विवाह झाल्याने पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा टिकून राहतो, अशी धार्मिक संकल्पना आहे.
धार्मिक परंपरांचे जतन: शुभ मुहूर्त निवड ही भारतीय विवाहसंस्कृतीमधील एक महत्त्वाची परंपरा आहे.
सकारात्मक आयुष्याला सुरुवात: शुभ मुहूर्तावर नवीन आयुष्याची सुरुवात केल्यामुळे मनात सकारात्मकता आणि आनंद निर्माण होतो.
कौटुंबिक समृद्धी: शुभ मुहूर्तावर विवाह केल्याने वधू-वरच्या कुटुंबात सुख-शांती आणि समृद्धी नांदते अशी मान्यता आहे .
तिथी: विवाहासाठी योग्य तिथीची निवड केली जाते.
नक्षत्र: रोहिणी, मृगशीर्ष, मघा, उत्तराफाल्गुनी, हस्त, स्वाती, अनुराधा, मूल, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती यांसारख्या नक्षत्रांचा अभ्यास केला जातो.
आठवड्यातील वार: विवाहासाठी अनुकूल वाराचा विचार केला जातो.
गुरु आणि शुक्र ग्रह: गुरु आणि शुक्र ग्रहांची स्थिती विवाह मुहूर्त अभ्यास करताना महत्त्वाची ठरते.
गुणमिलन: वधू आणि वर यांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास करताना गुणमेलन तपासले जाते.






