Carrom Tournament : कॅरमच्या पटावर सागर वाघमारे आणि सोनाली कुमारीचा दबदबा! विलिंग्डन जिमखाना स्पर्धेत पटकावले विजेतेपद
Carrom Tournament : विलिंग्डन कॅथलिक जिमखाना, सांताक्रूझ येथे आयोजित पहिल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुण्याच्या सागर वाघमारे आणि मुंबईच्या सोनाली कुमारी यांनी विजेतेपद पटकावले. पुरुष आणि महिला एकेरी गटातील अंतिम सामने चुरशीचे झाले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने ठाण्याच्या संदीप दिवे याच्यावर सरळ दोन सेटमध्ये मात केली. सागरने 23-16 आणि 16-12 अशा फरकाने विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुंबईच्या निलांश चिपळूणकरने बाजी मारली. त्याने मुंबईच्याच सिद्धांत वाडवलकरविरुद्ध पहिला सेट 15-17 असा गमावला. मात्र, त्यानंतर जोरदार पुनरागमन करत पुढील दोन सेट 25-10 आणि 25-9 अशा फरकाने जिंकले.
Gurnoor Brar ला अति आक्रमकपणाचे सेलिब्रेशन नडले; ICC केली ‘ही’ मोठी कारवाई
महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सोनाली कुमारीने विजेतेपदावर नाव कोरले. मुंबईच्याच मिताली पाठकविरुद्ध झालेल्या तीन सेटच्या लढतीत सोनालीला सुरुवातीला पराभवाचा सामना करावा लागला. मितालीने पहिला सेट 25-10 असा जिंकला. मात्र, सोनालीने दुसऱ्या सेटमध्ये 18-13 आणि तिसऱ्या सेटमध्ये 24-16 अशी बाजी मारत विजेतेपद पटकावले.
या गटातील तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमचा पराभव केला. समृद्धीने 24-10, 22-25 आणि 24-6 अशा गुणांनी विजय मिळवला.
MS Dhoni IPL Records : नेहमीच चेन्नईसाठी तारणहार ठरलाय एम. एस. धोनी; रेकॉर्ड पहाल तर थक्क व्हालं
विजेत्या खेळाडूंना विलिंग्डन कॅथलिक जिमखान्याचे अध्यक्ष दीपक नेटो, सचिव रोहिन ग्रेसियस, क्रीडा सचिव आणि ऑलिम्पिक हॉकीपटू जोकीम कार्व्हालो, संयुक्त सचिव आणि ऑलिम्पिक हॉकीपटू मर्विन फर्नांडिस, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष धनंजय साठे, मानद सचिव अरुण केदार आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दल दीपक नेटो आणि मर्विन फर्नांडिस यांनी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कौतुक केले. यापुढेही ही स्पर्धा नियमित आयोजित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तब्बल 40 वर्षांनंतर जिमखान्यात या स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल अरुण केदार यांनी जिमखान्याच्या संपूर्ण कार्यकारिणीचे आभार मानले.
Ans: पुण्याच्या सागर वाघमारेने पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले.
Ans: मुंबईच्या सोनाली कुमारीने महिला एकेरी गटात विजेतेपद मिळवले.
Ans: मुंबईतील सांताक्रूझ येथील विलिंग्डन कॅथलिक जिमखान्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.






