Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकविरा आई पालखी सोहळ्याने दुमदुमला कार्ला डोंगर, जाणून घ्या पौराणिक कथा आणि परंपरा

आगरी कोळी समाजाची शान असलेली आई एकविरा. आज २५ मार्च रोजी कार्ले डोंगरावर देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. एकविराची पौराणिक कथा आणि परंपरा याविषयी जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 25, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • एकविरा आईचा पालखी सोहळा
  • पौराणिक कथा आणि परंपरा
  • पालखी सोहळा कधी असतो
 

एकविरा आई पालुखी गं.. पालखी कार्ले डोंगरावर.. अशी असंख्य कोळी गीते ठाणे, रायगड, पालघर परिसरातील आगरी कोळी समाजात ऐकण्यास मिळतील. यावरूनच या समाजात एकविरा आईप्रति किती श्रद्धा असेल याची प्रचिती येते. आज दि. २५ मार्च चैत्र महिन्यातील एकविरा आई पालखी सोहळा कार्ले डोंगरावर उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने एकविरा आई विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे प्रमुख मानली जातात; त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी होय. एकविरा देवी ही रेणुका मातेचा अंश आहे. तर रेणुका माता म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वती देवी होय. वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकविरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. एकविरा आई ही एक हिंदू देवता आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकविरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते. एकविरा आईचे मुळरूप रेणुका माता आहे आणि तिचे पूर्ण स्वरूप विरारच्या डोंगरावर असलेली जिवदानी देवी आहे. जीवदानी देवीला महावीरा देवी असे म्हणतात. त्यामुळे एकविरा मातेची मोठी बहीण जीवदानी देवी मानली जाते. तर बारोंडा देवी ही छोटी बहीण आणि इतर अवतार जोगेश्वरी देवी (योगेश्वरी देवी), यल्लमा, यमाई, तुळजाभवानी, येडेश्वरी या बहिणी मानल्या जातात. एकविरा आईचे मंदिर पुण्यातील लोणावळा परिसरातील कार्ला गडावर आहे. नवरात्र आणि चैत्र नवरात्रमध्ये येथे मोठा उत्सव होतो. चैत्र नवरात्रीमधील पालखी सोहळा तर खूप मोठा होतो.‌ तर वर्षभरातही देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने जात असतात.

Mars Transit 2026: मंगळ मीन राशीत करणार संक्रमण, मंगळाच्या युतीचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

एकवीरा आईचे देऊळ

एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या लोकांचेही हे कुलदैवत आहे. या मंदिर-संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत, असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते. या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपूर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी/ कोंबडी यांसह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत, अशी भाविकांची मान्यता आहे.

Chaitra Navratri: चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवशी करा कालरात्री देवीची पूजा, सर्व समस्येतून होईल सुटका

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा देवी प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला.

पालखीचा मान

चैत्र नवरात्रीमधील पालखीचा मान आजूबाजूला परिसरात कोळीआगरी समाजाकडे असतो. हा समाज भक्तीभावाने देवी आराधना करतो. देवी नवसाला पावते. तसेच भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी म्हणून आगरी कोळी समाजाची मोठी देवीवर श्रद्धा आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात कोळीआगरी समाज पालखीचा मान मिळावा म्हणून आग्रही असतो. यावर्षी २०२६चा मान पनवेल कोळीवाड्याला मिळाला आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: पालखी सोहळा कधी साजरा केला जातो?

    Ans: हा सोहळा प्रामुख्याने चैत्र नवरात्रीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, विशेषतः सातव्या दिवशी मोठी गर्दी होते.

  • Que: पालखी सोहळ्यात काय विशेष पाहायला मिळते?

    Ans: देवीची सजवलेली पालखी, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा ,“एकविरा आई”च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर

  • Que: या सोहळ्यामुळे काय धार्मिक लाभ होतो?

    Ans: नवस पूर्ण होतात अशी श्रद्धा, संकटांपासून मुक्ती मिळते, घरात सुख-शांती येते, सकारात्मक ऊर्जा वाढते

Web Title: Ekvira devi chaitra palkhi sohala 2026 mythology and traditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी
1

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी

Pitru Paksha 2026: गणपती बाप्पांना निरोप देताच पितृपक्ष सुरू! कोणत्या दिवशी करायचं श्राद्ध? पाहा तिथीनुसार संपूर्ण यादी
2

Pitru Paksha 2026: गणपती बाप्पांना निरोप देताच पितृपक्ष सुरू! कोणत्या दिवशी करायचं श्राद्ध? पाहा तिथीनुसार संपूर्ण यादी

Vastu Shastra Married Daughter: माहेरून मुलीला वस्तू देताय? ‘या’ 5 गोष्टी देण्याआधी हे नक्की वाचा
3

Vastu Shastra Married Daughter: माहेरून मुलीला वस्तू देताय? ‘या’ 5 गोष्टी देण्याआधी हे नक्की वाचा

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
4

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.