गुरु पौैर्णिमा हा सण हिंदू धर्माच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. गुरु आणि शिष्याचा नात्याचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु कुठल्याही रुपात येऊन आपल्य़ाला मार्गदर्शन करतो. त्यामुळे गुरु आणि शिष्य याचं याचं असं आहे की त्याला कोणत्याही वयाचं बंधन नाही. नवनाथ संप्रदायात देखील गुरु पौर्णिमेला महत्वाचं स्थान दिलं जातं. ह्याच दिवशी अनेक भक्त ‘स्वामी समर्थांचे जीवनचरित्र – ‘स्वामीचरित्र सारामृत’ याचे पारायण करतात. यामागचं धार्मिक कारण काय ते जाणून घेऊयात.
स्वामी समर्थांना श्री गुरुदेवदत्त यांचे अवतार मानलं जातं. स्वामींनी त्यांच्या कार्यकाळात अनेक भक्तांना योग्य दिशा दाखवली आहे. याचं स्वामीनिष्ठेपोटी अनेक स्वामीचरित्राचं गुरुपौैर्णिमेच्या दिवशी पारायण करतात. स्वामींच्या कार्यकाळापासून ते आजतागायत अनेक पिढ्यांनी भटकेल्या आयुष्याला मार्ग मिळावा यासाठी स्वामींना आपलं गुरु केलं. त्यामुळे अनेक जण स्वामींच्या चरित्राचं गुरुपौेणिमेला पारायण करतात.
या दिवशी अनेक भक्त ‘स्वामी समर्थ महाराज’ यांचे ‘स्वामीचरित्र सारामृत’ हे ग्रंथ पारायण करतात. या पारायणामागे केवळ धार्मिक परंपरा नाही, तर त्यामागे अनेक आध्यात्मिक कारण देखील आहे. स्वामी समर्थ हे दत्तगुरुंचे अंश आहेत. त्यामुळे या ग्रंथात केवळ स्वामींच्या जीवनचरित्राची माहिती नसते, तर तो श्रद्धा, भक्ती, शरणागती आणि गुरुकृपेचे दिव्य दर्शन घडवतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ग्रंथाचे पारायण केल्याने स्वामींच्या चरणी आपली निष्ठा दृढ होते. मनात शांती निर्माण होते, आत्मिक उन्नतीसाठी प्रेरणा मिळते आणि स्वामींच्या कृपाशीर्वादाची अनुभूती होते.स्वामी त्यांच्या भक्तांना इतकंच सांगतात की, विश्वास अढळ आणि संयम ठेव मी कायमच तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी त्यांच्या भक्तांना सांगतात.
का करतात गुरु पौर्णिमेला पारायण ?
गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मशुद्धी आणि गुरुकृपेच्या स्मरणाचा दिवस. स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे भक्तांसाठी गुरुच आहे. जीवनात आलेल्या अडचणी, संकटे, दुःख, शोक आणि मोहाच्या अंध:कारातून भक्तांना स्वामी या सारामृताच्या मदतीने प्रतिकुल परिस्थितीतून बाहेर काढतात, असा स्वामी भक्तांचा विश्वास आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वामीभक्त एकत्रित सामूहिक पारायण करतात. हा ग्रंथ फक्त वाचनापुरता नाही, तर जीवनाचा सार आहे. पारायण म्हणजे केवळ ग्रंथ वाचणे नव्हे, तर त्यात दिलेल्या गोष्टी मन:पूर्वक आत्मसात करणे. त्यातून मिळणारे विचार, तत्त्वज्ञान आणि कृपाप्रसंग हे जीवनाला योग्य दिशा देतात.गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे पारायण केल्यास गुरुंच्या कृपेचा लाभ होतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे.