Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्र मंथनाच्या वेळी असं काही घडलं की भगवान विष्णूंनी केला शिरच्छेद ; राहू केतूची ‘ही’ पुराणकथा तुम्हाला माहितेय का ?

खूप जणं शनी आणि राहू केतूला घाबरतात. पण कधी विचार केलाय का हे राहू केतू निर्माण झाले तरी कसे ? यामागे देखील एक पुराणकथा आहे. काय आहे यामागील गोष्ट जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 07, 2026 | 02:16 PM
समुद्र मंथनाच्या वेळी असं काही घडलं की भगवान विष्णूंनी केला शिरच्छेद ; राहू केतूची ‘ही’ पुराणकथा तुम्हाला माहितेय का ?
Follow Us
Follow Us:

कधी तुम्हाला कुठल्या ज्योतिषाने सांगितलं आहे का की पत्रिकेत राहू केती खराब आहे ? राहू केतूचा प्रभाव म्हणजे आता आयुष्यात काहीतरी चुकीचं घडणार हा एक समज झालेला आहे. राहू केतू म्हणजे आता आपलं वाईट होणार असं प्रत्येकाला वाटतं. खूप जणं शनी आणि राहू केतूला घाबरतात. पण कधी विचार केलाय का हे राहू केतू निर्माण झाले तरी कसे ? यामागे देखील एक पुराणकथा आहे. काय आहे यामागील गोष्ट जाणून घेऊयात.

पुराकथेनुसार अशी दंतकथा सांगितली जाते, की समुद्रमंथानाच्या वेळी भगवान विष्णूंचा राग अनार झाला आणि त्यांनी एका राक्षसाला मारलं. समुद्र मंथनाची कथा सर्वांनाच माहित आहे. ज्यातून चौदा रत्ने आणि अमृत निघालं होतं. हे अमृत जो कोणी प्राशन करेन तो अमर होईल. खरंतर दानवांच्या विरोधात देव अधिक शक्तीशाली व्हावे यासाठी या अमृताचा घाट घातला होता. देैत्य जेव्हा धुमाकूळ घालत असायचे तेव्हा देवांनी दैत्यांचा वध केल्यानंतर दानवांचे गुरू शुक्राचार्य यांना संजिवनी विद्या प्राप्त असल्या कारणाने युद्धा मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करायचे. त्यामुळे देव कुळावरचं दिवसेंदिवस संकट वाढत जात होतं. अशावेळी काय करावं हे देवांना कळत नव्हतं त्यावेळी देव भगवान विष्णूंकडे सल्ला मागायला गेले. तेव्हा विष्णू देवांनी सांगितलं की, समुद्रमंथन करून अमृत मिळवायचं आणि दानवांवर विजय मिळवायचा.

Rahu Ketu: आता पैसाच पैसा! राहू-केतूची होणार कृपादृष्टी; ‘या’ चार राशींचं फळफळणार नशीब

या मंथनातून आलेल्या अमृतासाठी देव आणि दानव यांच्यात वाद झाले होते. हे अमृत जो कोणी प्राशन करेन त्यांना अमरत्व प्राप्त होईल अशी या अमृताची ख्याती होती. आपण देखील अमर व्हावं आणि देवांवर विजय मिळावावा या हेतूसाठी दानवांनी अमृत कलश पळवून नेला.. दानवांकडील अमृताचा कलश मिळवण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनी रुप धारण केलं. या मोहिनी रुपाची भूरळ फक्त दानवांनाच नाही तर देवांनाही पडली. मोहिनी रुपावर भाळलेल्या दानवांनी मोहिनी जे आणि जसं सांगेल तसं ऐकलं. आणि मोठ्या हुशारीने विष्णूंनी अमृत कलश मिळवला. आता देवकुळात आनंद साजरा केला जात होता.

विष्णू स्वत: देवांना अमृत वाटत होते. या अमृताची वाटणी करताना एका राक्षसाने चंद्रदेवांचं रुप घेतलं. काही वेळाने या राक्षसाचं पितळ उघड झालं. चंद्रदेव आणि इतर देवगणांनी राक्षसाचा खरा चेहरा समोर आणला. त्याला अमृत प्राशन करण्यापासून परावृत्त केलं. मात्र तोवर फार उशीर झाला होता. त्या राक्षसाच्या पोटात अमृताचा एक थेंब गेला होता. विष्णूंना याचा राग अनावर झाला त्यानंतर त्यांनी या राक्षसाची मान आणि धड वेगळं केलं. पण त्याने अमृत प्राशन केलं असल्याने त्याला मरण येणार नव्हतं. या राक्षसाचं मुंडकं आणि धड वेगळं झालं त्याचवेळी निर्माण झाले ते राहू केतू.

या राक्षसाच्या मुंडकं म्हणजे राहू आणि धड म्हणजे केतू. बऱ्याचदा ज्योतिष असं सांगतात की, राहू केतूचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी भगवान विष्णूंची उपासना करा. ते याच कराणाने. कारण राहू केतू विष्णू देवाला घाबरतात.

अरेरे! ‘या’ 2 राशींच्या व्यक्तींचा आज Break Up होणारच, वेळीच व्हा सावध; वाचवा आपले नाते

Web Title: How were the planets rahu and ketu created what is the story of the samudramanthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • hindu religion
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी घरात श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे का काढले जातात? जाणून घ्या कारण
1

Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी घरात श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे का काढले जातात? जाणून घ्या कारण

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा
2

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा
3

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर
4

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.