Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jupitor Transit 2026 : गुरु बदलाचा सकारात्मक परिणाम; 2 जून नंतर 12 राशींवर काय होणार परिणाम ?

Jupitor Transit 2026 : जून महिन्यात गुरुची स्थिती बदलणार असून याचा बारा राशींसाठी सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे. याबाबत ज्योतिषतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी यांनी सांगितलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2026 | 04:56 PM
jupitor transit

jupitor transit

Follow Us
Follow Us:
  • गुरु बदलाचा सकारात्मक परिणाम
  • 2 जून नंतर 12 राशींवर काय होणार परिणाम ?
 

Jupitor Transit 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती बदलली की त्याचे चांगले वाईट परिणाम पाहायला मिळतात. सध्या ग्रहांची शुभ स्थिती पाहायला मिळत आहे. जून महिन्यात गुरुची स्थिती बदलणार असून याचा बारा राशींसाठी सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे. याबाबत ज्योतिषतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी यांनी सांगितलं आहे.

मेष रास

मेष राशीच्या चौथ्या स्थानामध्ये गुरु येणार आहे. त्यामुळे मालमत्ता, जमीन किंवा नवीन वाहन खरेदीचे खरं तर मजबूत योग आहेत. चौथ्या भावातील गुरु कुटुंबात आनंदाचं वातावरण घेऊन येत आहे. आईच्या तब्येतीची चांगली सुधारणा होईल. काही बाबतीत काळजी काय घ्यायला हवी अनाठायी खर्च खूप वाढू शकतो. विनाकारण मनस्ताप वाढू वाढणार आहे. अचानक अचानक खर्च वाढल्यामुळे आर्थिक ताण येऊ शकतो.

उपाय

यावर काय उपाय म्हणजे रोज सकाळी आंघोळ झाल्यावर कपाळाला केशर आणि हळद ओली करून कपाळाला लावत जा. चांगला अनुभव येईल. गणपतीची उपासना करा.

वृषभ रास

गुरु तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करतो. तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल. धैर्यात वाढ होईल. नोकरी व्यवसायासाठी केलेले छोटेसे प्रवास फायदेशीर ठरतील. बहीण भावांमध्ये, भावांना आणि भावांमध्ये काही मतभेद असतील तर ते संपून एकमेकांचे सहकार्य उत्तम मिळेल. सावधगिरी काय बाळगायला हवी. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नका. शेअर्समध्ये तडाखा भडकी गुंतवणूक करू नका.

उपाय
उपाय काय तर दर गुरुवारी गायीला गूळ आणि भिजवलेले चन्याचे डाळ जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा खाऊ घाला.

मिथुन रास

यामध्ये गुरु तुमच्या दुसऱ्या स्थानातून जातोय. आर्थिक बाजू ही अत्यंत मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. घरामध्ये चांगलं आनंदाचं कार्य घडेल. शुभकार्य घडेल. विवाहा इच्छुकांचे विवाह ठरतील. खाण्यापिण्यावर मात्र या कालखंडात नियंत्रण ठेवा. ही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आरोग्याची काळजी घ्या. सर्दी, पचशाचा आजार खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात. न्यूमोनियासारखा त्रास होऊ शकतो.

उपाय काय करायचा तर
दर गुरुवारी श्री विष्णू लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे आणि पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करा.

Guru Gochar 2026: 12 वर्षानंतर कर्क राशीत गुरू गोचर, 6 राशींचं बदलणार आयुष्य; लक्ष्मी कृपेसह होणार उन्नती!

कर्क रास

गुरु तुमच्या राशीत म्हणजे पहिल्या स्थानात येत आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत सुवर्णकाळ आहे. समाजामध्ये प्रचंड मानसन्मान वाढेल. निर्णयक्षमता सुधारेल. अविवाहितांचे विवाह ठरतील. अचानक मोठ्या धनलाभाचे योग येतील. वैवाहिक आयुष्यामध्ये काही तणाव असतील तर ते दूर होतील. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा हा कालखंड आहे. फक्त एकच आहे सावधगिरी म्हणजे अहंकार वाढू देऊ नका. सगळ्यांशी अत्यंत नम्रतेने वागा.

उपाय
दर गुरुवारी तुम्ही गरजू लोकांना पिवळ्या वस्तू, पिवळी मिठाई, केळी किंवा पिवळ्या अन्नाचं दान करा.

सिंह रास

गुरु तुमच्या बाराव्या स्थानात म्हणजे खर्चाच्या स्थानात जात आहे. अर्थातच आध्यात्मिक कार्यामध्ये खरं तर रस वाढेल. त्या तुम्हाला पणवटी पण चाललंय. जे लोक परदेशात जाण्याचा किंवा तिथे व्यवसाय करण्याचा, राहण्याचा, नोकरीचा विचार करत आहेत त्यांना खूप चांगले संधी मिळतील. त्याचबरोबर ज्यांना इथे काही व्यवसाय वगैरे सुरू करायचे आहेत, नोकरीत बदल बदली करायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा चांगला काळ असू शकतो. पण सावधगिरी करायला हवी. अनावश्यक खर्च वाढतील. कोर्ट कचेरीच्या मागा लागण्यात नाही याला ही काळजी घ्या. पैशाच्या देवाण घेवाणी मध्ये अत्यंत सावध राहा.

उपाय
रोज घराबाहेर पडताना कपाळावर आणि नाभीवरती थोडीशी हळद लावावी. तसेच कपाळावर सुक्या केशराचा टिळा जरी लावला तरी चालेल. नुसतं केशरा घेऊन आपल्या कपाळाला लावलं तरी चालेल.

कन्या रास
गुरु तुमच्या अकराव्या स्थानात प्रवेश करतोय. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या जुन्या गुंतवणुकीपासून मोठे फायदे होतील. तुम्ही पूर्वी कुठे काही आर्थिक बाबतीत बोलत असाल तर प्रचंड मोठ्या धनलाभाचे योग येतील. तुमच्या इच्छा परिपूर्ण होणारा हा कालखंड आहे. कामाधंद्यामध्ये बरकत आणि धन प्राप्त होईल. एक मात्र करा की तोंडावर नियंत्रण ठेवा. विनाकारण वाद घालणे टाळा. उगाचच अरेला कार्य करू नका. रस्त्यावरती भांडण करू नका.
उपाय
गुरुवारी कोणत्याही मंदिरामधे तुम्ही चणा डाळ आणि गुळाचं दान करा. लहान मुलांना फुटाण्यांचं दान करा.

तूळ रास

गुरु तुमच्या दहाव्या स्थानामध्ये येतोय. कामाधंद्यात बदल बदली करायचा असेल तर उत्तम संधी आहेत. नवीन व्यावसायिकांना कंत्राट मिळतील. वडिलांपारजी संपत्तीचा लाभ होईल. असंख्य अनेक दिवसांपासून जर काही अडकलेली काम असतील पैशाची तर ती पण मार्गी लागतील. काही घटना मनाप्रमाणे घडतील. फक्त एकच काम करा की कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही राजकारणापासून दूर रहा. वरिष्ठ्यांशी मतभेद पूर्णपणे टाळा. जर व्यावसायिक असाल तर तुमच्या customer शी वाद घालू नका.

उपाय
कुलदेवतेची रोज उपासना करा आणि कपाळावर आपलं जे पांढरे चंदन असतं ते उघडून कपाळाला लावलं तर त्याचा चांगला अनुभव येईल. पुढची रास आहे

वृश्चिक रास

गुरु तुमच्या नवव्या स्थानात प्रवेश करतोय. तुमचं भाग्य अत्यंत यशस्वीपणे फळफळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. रखडलेली कामं नशिबाच्या जोरावर ती पूर्ण होतील. शिक्षणामध्ये अडथळे असतील तर ते दूर होतील. अविवाहित असाल तर विवाह होण्यासाठी मार्ग लाभेल. धार्मिक प्रवासाचा संधी मिळते. हा फक्त एकच आहे की वडिलांच्या आरोग्याची थोडी तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
उपाय
गुरुवारी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही वह्या पुस्तकांचं दान करा किंवा कपड्याचं वगैरे दान करा.

धनु रास
गुरु तुमच्या आठव्या स्थानामध्ये जात आहे. ज्या मंडळींना गुणशास्त्रांमध्ये, ज्योतिषांमध्ये, अध्यात्मामध्ये रस असेल त्यांना तो रस वाढेल. अचानक कुठूनतरी चांगले धन मिळण्याचे योग आहेत. अध्यात्मामध्ये ईश्वरी कृपा होणे, दत्त दर्शन होणे, गुरूंचं दर्शन होणे अशा प्रकारचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या थोडीशी स्थिरता येईल आणि खर्च देखील वाढेल. इतरांवर अति खर्च करणे टाळावे. आरोग्याच्या बाबतीत मात्र निष्काळजीपणा करू नका. वाहन चालवताना पूर्ण लक्ष ठेवा आणि कोणावरही पैशाच्या बाबतीत आंधळा विश्वास ठेवू नका.
उपाय
दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावं किंवा ते तुम्ही ऐकावं.

मकर रास
गुरु तुमच्या सातव्या स्थानतनं येतो आहे. विवाह ठरण्यासाठीचा खरंच सर्वोत्तम काळ आहे. प्रेमात असाल तर प्रेमविवाह जमू शकतो. भागीदारीमध्ये व्यवसाय करणार असाल तर मोठा नफा होईल. फक्त एकच आहे की जे कराल ते अंमलबजावणी legal करा. property खरेदी करण्यासाठी उत्तम काळ आहे. जोडीदाराबरोबरचे संबंध जे असतील ते अधिक घट्ट होतील. सावधगिरी एकच आहे की व्यवसायामध्ये भागीदारीचे व्यवहार हे पारदर्शक ठेवा. प्रत्येक गोष्ट लिखित ठेवा. विश्वासावर काही होऊ नये.
उपाय
दर गुरुवारी किंवा जमेल तसं गायीला पिवळे पेढे किंवा बेसनाचे लाडू तुम्ही खायला घालावेत आणि गायीला प्रदर्शन घालावे.

कुंभ रास.
गुरु तुमच्या सातव्या स्थानामध्ये जातोय. नोकरी करणाऱ्यांना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. जुन्या कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो. काही कटकटी असतील तर त्याच्यामध्ये compromise होऊन बऱ्यापैकी matter close होऊ शकतं. आणि साधारणपणे आनंदाचा हा काळ आहे. आपोआपच तुमचे संकटं देखील कमी होतील. मात्र गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आरोग्यासाठी हा काळ मिश्र आहे. पोटाचे विकार आणि वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते आणि कर्ज घेणे वगैरे टाळा. विनाकारण काही कारण नसताना फार मोठं कर्ज काढू नका.

उपाय
दर गुरुवारी दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे. त्या ठिकाणी पिवळे पदार्थ वाटणे, पिवळे मिठाई वाटणे आणि दररोज बाहेर पडताना कपाळाला ओली हळद लावणे.

मीन रास

गुरु  पाचव्या स्थानातून भ्रमण करणार  आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत प्रगतीचा आहे. ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा असेल त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम काळ आहे. जुन्या वादांवरती तोडे निघतील आणि आनंदाच्या घटना घरामध्ये घडतील. घरामध्ये तुमच्या मुलाबाळांच्या संख्येत वाढ होईल. घरात गोकुळासारखं वातावरण राहील. फिरण्याचे पण योग बनतात. एक मात्र आहे की तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. पती-पत्नींमध्ये संशयाचं वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
उपाय
गुरुवारी जमेल तसं केळीच्या झाडाची पूजा करून त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावा आणि ओम राम दत्तात्रय नमः किंवा ओम ब्रह्मस्पतय नमः या मंत्राचा सातत्याने जप करा.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घर नाही? चिंता नको! ‘हे’ छोटे उपाय घरात आणतील सकारात्मक ऊर्जा

Web Title: Jupitor transit 2026 positive impact of jupiter change what will be the impact on 12 zodiac signs after june 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • guru gochar
  • hindu religion
  • other zodiac signs

संबंधित बातम्या

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
1

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
2

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व
3

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व

Puja Tips: देवघरातील घंटा कोणत्या धातूची असावी? जाणून घ्या घंटानादाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
4

Puja Tips: देवघरातील घंटा कोणत्या धातूची असावी? जाणून घ्या घंटानादाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.