फोटो सौजन्य: Pintrest
वास्तुतज्ज्ञ आनंद पिंपळकर हे सांगतात की, प्रत्येक वेळेला वास्तुनुसार फ्लॅट्सची रचना करणं शक्य होत नाही पण असे काही सोपे उपाय आहेत जे प्रभावीपणे काम करतात. त्यातला पहिला उपाय म्हणजे घराच्या खिडक्या उघड्या ठेवणे. घरात जितका जास्त सूर्यप्रकाश तेवढे जास्त साकारात्मक उर्जा टिकून राहते. विज्ञानसुद्धा हेच सांगतं की, ज्या घरात सूर्यप्रकाश जास्त येतो तिथे सहसा कोणतेही आजारपण येत नाही. जितका जास्त घरात उजेड तेवढं मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. त्य़ाचबरोबर महत्वाचं आहे ते म्हणजे घर स्वच्छ ठेवणं. ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करते.
Vastu Tips : नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यावर वास्तूशांत का गरजेची आहे ?
अनेकदा घरात कोंडट वातावरण असतं. त्यामुळे घरात कुबट वास येणं यासगळ्याने सतत चिडचिड होणं किंवा मनासिकरित्या अस्वस्थ वाटणं या सगळ्या घटना घडतात. म्हणूनच तुम्ही घरात धूप कापूर जाळू शकता. काहींना अगरबत्ती किंवा धुपाचीअॅलर्जी असते मग अशावेळी तुन्ही सुवासिक फुलं जसं की मोगरा , चाफा निशिगंध याप्रकारची फुलं घराच ठेवू शकतो. यामुळे होतं काय तर वातावरण शुद्ध राहतं. सतत तुम्ही जर आजारी पडत असाल तर डोक्याला हळद आणि चंदनाचा लेप लावा यामुळे होतं काय तर तुमची रोगप्रतिकारकशत्ती वाढते. तसंच जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या उंबऱ्याला हळदीचा लेप देता त्यावेळी कोणतेही जंतू घरात शिरत नाही आणि घरात सकारात्मक उर्जा वाढीस लागते. प्रत्येक वेळी काही मोठं करण्याची गरज नसते तुम्ही रोजच्या जगण्यात काही बदल केलेत तरी देखील खूप काही चांगले बदल दिसून येतात. फक्त घरच नाही तर आयुष्यात देखील तुम्ही तुमचा स्वत:शी असलेला संवाद चांगला ठेवा. तुम्ही आतून सकारात्मक असलातर गोष्टी तशा घडायला सुरुवात होते, असं आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे.
Vastu Tips : वास्तुदोष म्हणजे नेमकं काय ? कसा ओळखायचा, जाणून घ्या …






