Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamika Ekadashi: कधी आहे आषाढातील कामिका एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

आषाढ महिन्यातील कामिका एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. या दिवशी विधीपूर्वक श्रीविष्णूची पूजा, उपवास आणि जप केल्यास पापांचा नाश होऊन पुण्यप्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जाणून घ्या मधील कामिका एकादशीची तारीख, शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 03, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आषाढ महिन्यातील कामिका एकादशी कधी आहे
  • कामिका एकादशी मुहूर्त आणि पूजा विधी
  • कामिका एकादशीचे काय आहे महत्त्व
 

 

कामिका एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची एकादशी असून ती आषाढातील कृष्ण पक्षात साजरी केली जाते. ही एकादशी श्री हरी विष्णूला समर्पित असून या दिवशी व्रत केल्यानं सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यावर्षी कामिका एकादशी गुरुवार, ९ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. आषाढ महिन्यात साजरी होणारी दुसरी एकादशी आहे.

काय आहे मान्यता?

कामिका एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो, असे मानले जाते. पूर्वजन्मी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि तो वैकुंठात जातो, असे मानले जाते. एकादशीला केलेल्या व्रताने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि व्यक्तीला सुख, समृद्धी व शांती मिळते. कामिका एकादशीचे व्रत भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी विष्णूची आराधना केल्याने कुटुंबावर त्यांची विशेष कृपा प्राप्त होते.

कामिका एकादशी मुहूर्त

एकादशी तिथीची सुरुवात ८ ऑगस्ट रोजी दुपारी १:५९ वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०४ वाजता होणार आहे. उदयतिथीनुसार हे व्रत ९ ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असल्याने उपवास याच दिवशी केला जाईल.

Shravan 2026: श्रावण महिना दोनदा का येतो? जाणून घ्या उत्पत्ती, धार्मिक महत्त्व आणि शास्त्रीय कारण

एकादशीचे महत्त्व

या एकादशीला तुळशीचे विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय मानली जाते. कामिका एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणे, तुळशीला जल अर्पण करणे आणि तुळशीच्या माळेने जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तुळशीची पूजा केल्याने यमराजाच्या भयापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कामिका एकादशीचं व्रत केल्यानं व्यक्तीला आध्यात्मिक शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात.

Kalashtami 2026: मासिक कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजा मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व

व्रताची पद्धत

सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. व्रताचा संकल्प करावा. भगवान विष्णूची मूर्ती किंवा पोटो स्थापित करून त्यांची पूजा करावी.

विष्णूंना तुळस, पिवळी फुले, चंदन, अक्षता, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. विष्णू सहस्रनाम, विष्णू स्तोत्र किवा विष्णूच्या मंत्रांचा ॐ नमो भगवते वासुदेवायर जप करावा.

दिवसभर उपवास करावा. निरंकार करणे शक्य नसेल, तर फलाहार किंवा सात्विक भोजन (साबुदाणा खिचडी) घेऊ शकता, पण मीठ टाळावे.

रात्री जागरण करून भगवान विष्णूचे भजन-कीर्तन करू शकता. द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून भगवान विष्णूवी पूजा करावी. ब्राह्मणांना भोजन दान करावे आणि दक्षिणा द्यावी, शुभ मुहूर्तावर उपवास सोडताना तुळशीचे पान खाऊन उपवास सोडावा.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कामिका एकादशी कधी आहे

    Ans: कामिका एकादशी रविवार, 9 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे

  • Que: कामिका एकादशी कोणत्या देवतेला समर्पित आहे?

    Ans: कामिका एकादशी ही भगवान श्रीविष्णू यांना समर्पित असून या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते.

  • Que: कामिका एकादशीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, नकारात्मकता दूर होते आणि आध्यात्मिक प्रगतीस मदत होते.

Web Title: Kamika ekadashi 2026 muhurat puja rituals and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
1

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
2

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.