फोटो सौजन्य- chatgpt
कार्तिक एकादशीला पंढरपुरात आषाढी वारीप्रमाणे सर्व प्रमुख संतांच्या मोठ्या पालख्या जात नाहीत, तर महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेक स्थानिक वारकरी दिंड्या आणि काही मोजक्या संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. आषाढी वारीमध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या मुख्य पालख्या पंढरपूरला जातात, तर कार्तिकी वारीमध्ये पांडुरंग स्वतः संत ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्यासाठी आळंदीला जातात अशी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांचे स्वरूप याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया
संत गोरोबा काकांची पालखी आषाढी वारीला न येता परंपरेनुसार कार्तिकी वारीसाठी तेर (धाराशिव) येथून पायी पंढरपूरला येते. या पालखी सोहळ्यात रथाचा वापर न करता पूर्ण मार्गावर पालखी खांद्यावर वाहून नेली जाते. हे पालखीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील स्थानिक व ग्रामीण दिंड्या. कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमधून शेकडो लहान-मोठ्या दिंड्या टाळ-मृदंगाच्या गजरात पायी चालत पंढरपूरला येतात.
त्याचबरोबर प्रांतिक आणि फडकरी दिंड्या. वारकरी संप्रदायातील विविध फडांच्या (उदा. वासकर फड, देहूकर फड, आजरेकर फड इत्यादी) नेमलेल्या दिंड्या कार्तिक शुद्ध एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात दाखल होतात.
महाराष्ट्राच्या सीमाभागातून आणि शेजारील राज्यांतूनही अनेक भजनी मंडळे आणि दिंड्या कार्तिकी यात्रेसाठी विठ्ठल दर्शनाला येतात. विठ्ठलाचे दर्शन घेतात.
आषाढी वारीला संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत तुकाराम महाराज (देहू), संत एकनाथ महाराज (पैठण), संत निवृत्तीनाथ (त्र्यंबकेश्वर) यांसारख्या सर्व मोठ्या संतांच्या पालख्या आणि त्यांच्यासोबत शेकडो नोंदणीकृत दिंड्या पंढरपूरला जातात. त्यामुळे विठ्ठल भक्तांची मांदियाळी असते. तर कार्तिकी वारीच्या या काळात पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २४ तास दर्शन सुरू असते. या वारीनंतर कार्तिक वद्य एकादशीला पंढरपुरातून पांडुरंग, संत नामदेव आणि संत पुंडलिक यांच्या मानाच्या दिंड्या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी रवाना होतात.
कार्तिकी वारी आणि कार्तिकी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून आणि गावांतून पंढरपूर किंवा आळंदीकडे दिंड्या निघतात. प्रमुख आणि प्रसिद्ध दिंडीची माहिती घेऊ यात..ॉ
पुणे जिल्ह्यातील आळंदी किंवा देहू येथून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर पुणे – सासवड – जेजुरी – वाल्हे – लोणंद – फलटण – नातेपुते – माळशिरस – वेळापूर – वाखरी – पंढरपूर. असा मार्ग असतो.
तसेच आषाढीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही महाराष्ट्रभरातून (कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक इ.) शेकडो लहान-मोठ्या दिंड्या पंढरपुरात दाखल होतात.
गोवा व कोकण भागातून कोकण व गोवा भागातील वारकरी समुदाय दरवर्षी कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरसाठी पायी किंवा वाहन दिंडीने मार्गस्थ होतात.
आषाढी एकादशीच्या तुलनेत कार्तिकी एकादशीला पंढरपूरला कमी दिंड्या जाण्यामागे हवामान, शेतीची कामे आणि धार्मिक परंपरा ही मुख्य कारणे आहेत. आषाढी वारीत संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने वारकरी आणि शेकडो दिंड्या पायी जातात, तर कार्तिकी वारीत ही गर्दी तुलनेने कमी असते
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कार्तिकी वारीत संत गोरोबा काकांची पालखी आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या स्थानिक वारकरी दिंड्या सहभागी होतात.
Ans: आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या प्रमुख पालख्या सहभागी होतात. कार्तिकी वारीत तुलनेने कमी पालख्या आणि स्थानिक दिंड्या सहभागी होतात.
Ans: आषाढी वारीत या संतांच्या मुख्य पालख्या पंढरपूरला जातात. कार्तिकी वारीच्या परंपरेनुसार पांडुरंग स्वतः आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी जातात, अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे.






