Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabharat Katha: कृष्णाने 2 वेळा उघडला होता तिसरा डोळा, झाला होता कहर

महाभारतात कृष्णासारख्या शांत देवाला तिसरा डोळा उघडावा लागला असे मानले जाते. हे दोनदा घडले. जर त्याने हे केले नसते तर पांडवांचे मोठे नुकसान झाले असते असे पौराणिक कथेत म्हटले जाते, काय आहे ही कथा?

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 20, 2025 | 01:07 PM
श्रीकृष्णाला का उघडावा लागला होता तिसरा डोळा (फोटो सौजन्य - Freepik)

श्रीकृष्णाला का उघडावा लागला होता तिसरा डोळा (फोटो सौजन्य - Freepik)

Follow Us
Close
Follow Us:

महाभारत म्हटलं की आपण कितीही मोठे झालो तरीही कान टवकारतात. महाभारतातील अशा कथा आहेत, ज्या कितीही वेळा ऐकल्या तरीही मन भरत नाही. याशिवाय महाभारत युद्धात कृष्णाची विशेष भूमिका होती. तो अर्जुनाच्या रथाचा सारथी होता पण प्रत्यक्षात तोच सूत्रधार, रणनीतीकार आणि संपूर्ण युद्ध स्वतःच्या पद्धतीने चालवणारा होता. 

कृष्णाने या महाभारत युद्धात असे दोन प्रसंग आले जेव्हा त्याने तिसरा डोळा उघडला आणि मग पांडवांवर येणाऱ्या विनाशातून वाचले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अरे कृष्णाचा तिसरा डोळा? तर हो यामागे मनोरंजक कथा आहे आणि ही पौराणिक कथाच आज या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  त्या दोन वेळा कोणत्या होत्या? कर्ण पर्वात कृष्णाने आपला तिसरा डोळा उघडल्याची घटना घडते, जेव्हा तो अर्जुनाला आपले महाकाय रूप दाखवतो. जरी महाभारताच्या मूळ आवृत्तीत या घटनेचा थेट उल्लेख नसला तरी, काही लोकप्रिय कथा आणि भागवत परंपरेत तिचा उल्लेख आहे असे मानण्यात येते (फोटो सौजन्य – Freepik) 

…आणि मग कृष्णाने तिसरा डोळा उघडला

जेव्हा कर्ण आणि अर्जुन यांच्यात युद्ध सुरू होते, तेव्हा कर्णाकडे इंद्राने दिलेले एक शक्तिशाली शस्त्र होते, जे तो अर्जुनावर वापरणार होता. हे शस्त्र अर्जुनासाठी घातक ठरू शकते हे कृष्णाला माहीत होते. असे म्हटले जाते की त्यानंतर कृष्णाने आपला तिसरा डोळा उघडला, ज्याला दिव्य डोळा म्हणतात. तो डोळा उघडताच, एक तेजस्वी प्रकाश बाहेर आला. यामुळे कर्ण विचलित झाला आणि मग अर्जुनाचा फायदा झाला

Mahabharat: महाभारत युद्ध कुरुक्षेत्रात या विध्वंसक शस्त्रांनी लढले, क्षणार्धात झाला होता विनाश

अर्जुनाने उचलला फायदा

कर्ण विचलित झाल्यानंतर या क्षणाचा फायदा घेत अर्जुनने कर्णावर हल्ला केला आणि कर्ण मारला गेला. पण जर त्या दिवशी कर्णाने ते शस्त्र वापरले असते तर कदाचित अर्जुन वाचला नसता. कृष्णाचा तिसरा डोळा वैश्विक शक्ती आणि दैवी ज्ञानाचे प्रतीक आहे असे म्हटले जाते. 

या घटनेत कृष्णाने आपल्या विष्णू रूपाचे दर्शन घडवले, ज्यामुळे कर्णासह सर्व योद्धे चकीत झाले होते. कृष्णाेन आपले भव्यदिव्य रूप यावेळी दाखवले होते. जरी अर्जुनाला हे आधी समजले होते, परंतु युद्धातील या दिव्य रूपानंतर अर्जुनाला कृष्ण केवळ सारथी नव्हता तर देव होता याची प्रचिती आली होती. 

जेव्हा अश्वत्थामाविरुद्ध उघडला तिसरा डोळा 

भगवान श्रीकृष्णाने कधी उघडला तिसरा डोळा

महाभारतात अश्वत्थामा आणि कृष्ण यांच्यातही अशीच एक घटना घडली असल्याचे सांगण्यात येते, जिथे काही कथांमध्ये कृष्ण आपला तिसरा डोळा उघडतो असे नमूद आहे. ही घटना सौप्तिका पर्व (रात्रीच्या हत्याकांड) नंतर घडली, जेव्हा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडून पांडव वंशाचा नाश करण्याचा प्रयत्न केला. प्रथम, अश्वत्थामाने पांडवांच्या छावणीत प्रवेश केला आणि शिखंडी आणि पाच पांडव पुत्रांना ठार मारले. मग तो तिथून पळून गेला असा उल्लेख आहे. 

Mahabharat: भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाचे 100 गुन्हे का माफ केले?

मात्र पांडव कुळ वाचले

जेव्हा कृष्ण आणि पांडवांनी त्याचा माग काढला तेव्हा त्याने उत्तराच्या गर्भाशयात वाढणाऱ्या राजा परीक्षितला मारण्यासाठी ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि अशा प्रकारे संपूर्ण पांडव वंश नष्ट केला. जर ते योग्य लक्ष्यावर आदळले असते तर पांडव घराणे नष्ट झाले असते. नंतर, या गर्भाचे रक्षण केल्यानंतर, उत्तराच्या गर्भातून राजा परीक्षितचा जन्म झाला, जो नंतर हस्तिनापूरचा राजा बनला.

मग हे थांबवण्यासाठी कृष्णाला तिसरा डोळा उघडावा लागला. जेव्हा कृष्णाने अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्राला थांबवण्यासाठी तिसरा डोळा उघडला तेव्हा त्याच्या उर्जेमुळे पृथ्वी थरथरली. 

कृष्णाच्या कथा 

कृष्णाने कसे वाचवले पांडव कुळ

महाभारत, हरिवंश पुराण आणि प्रादेशिक लोककथांसह, कृष्णाने आपली दैवी शक्ती प्रकट केली आणि तिसरा डोळा उघडला असेदेखील वर्णन करते. नरकासुराला मारण्यासाठी कृष्णाने आपला तिसरा डोळाही उघडला होता असंही सांगण्यात येते 

त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या वैश्विक उर्जेने अश्वत्थामाचे ब्रह्मास्त्र निष्क्रिय केले. यानंतर अश्वत्थामाने शरणागती पत्करली. त्याने आपला कपाळावर असणारे रत्न कृष्णाला दिले आणि तेथून निघून गेला. तथापि, त्याच वेळी, त्याला कधीही मोक्ष मिळणार नाही तो पृथ्वीवर कायमचा भटकत राहील असा शापदेखील मिळाला. 

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: Mahabharat katha krishna opened third eye to save pandavas what were the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • Mahabharat facts
  • Mahabharata war
  • religion news
  • Shri Krishna

संबंधित बातम्या

Premanand Maharaj: नोकरीवरुन काढलं तर बॉसला कर्माची शिक्षा मिळते ? प्रेमानंद महाराजांनी दिलं हटके उत्तर
1

Premanand Maharaj: नोकरीवरुन काढलं तर बॉसला कर्माची शिक्षा मिळते ? प्रेमानंद महाराजांनी दिलं हटके उत्तर

महाभारत म्हणजे जेव्हा तंत्रज्ञान उच्चतम शिखरावर होते! Biomatic Weapon आले होते वापरण्यात
2

महाभारत म्हणजे जेव्हा तंत्रज्ञान उच्चतम शिखरावर होते! Biomatic Weapon आले होते वापरण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.