Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangalagauri Vrat: दुसऱ्या श्रावण मंगळवारी असे करा मंगळागौरीचे व्रत, जाणून घ्या कथा

श्रावण महिना सुरू झाला असून चाहुल लागते ती श्रावणात येणाऱ्या मंगळवारची. कारण या दिवशी मंगळागौरीचे व्रत केले जाते. आज २५ ऑगस्ट रोजी श्रावणामधील दुसरा मंगळवार आहे. या दिवशी मंगळागौरीची पूजा कशी करावी आणि मंगळागौरीची कथा जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 25, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आज दुसरा श्रावण मंगळवार
  • मंगळागौरीची अशी करा पूजा
  • मंगळागौरीची काय आहे कथा
 

श्रावण महिना सुरू झाला की महिलांमध्ये मंगळागौरीच्या व्रताची लगबग सुरू होते. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी विवाहित महिला मंगळागौरीची पूजा करून सौभाग्य, सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. श्रावणातील दुसरा मंगळवारही मंगळागौरीच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. यावेळी श्रावणामधील दुसरा मंगळवार आज २५ ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी मंगळागौरीची पूजा कशी करायची आणि कथा जाणून घेऊया

दुसऱ्या श्रावण मंगळवारी अशी करा पूजा

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. घरातील पूजेची जागा स्वच्छ करून मंगळागौरीची स्थापना करावी. हळद-कुंकू, फुले, अक्षता, नैवेद्य आणि दिवा अर्पण करून देवीची मनोभावे पूजा करावी. त्यानंतर मंगळागौरीची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर आरती करावी. या दिवशी शक्य असल्यास जागरण करावे. तसेच सर्व महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक खेळ खेळावे.

Shravan Tuesday: मंगळागौरीच्या पूजेला सुरुवात कशी झाली? श्रावणातील …

मंगळागौरी व्रताचे महत्त्व

मंगळागौरी व्रत हे विशेषतः विवाहित महिलांकडून श्रद्धेने केले जाते. माता पार्वतीला मंगळागौरीच्या रूपात पूजले जाते. पतीचे दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य आणि वैवाहिक जीवन सुखी राहावे, यासाठी महिला हे व्रत करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

मंगळागौरीच्या दिवशी का खेळले जातात खेळ

महाराष्ट्रात मंगळागौरीच्या पूजेनंतर महिलांच्या पारंपरिक फुगड्या, झिम्मा, पिंगा आणि इतर पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा आहे. यामुळे महिलांमध्ये आनंद, एकोपा आणि सामाजिक बंध अधिक दृढ होतात, असे म्हटले जाते.

मंगळागौरीच्या व्रताची पौराणिक कथा

स्कंदपुराणासह विविध व्रतकथांमध्ये मंगळागौरी व्रताशी संबंधित कथा प्रचलित आहे. कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे देवी पार्वतीच्या कृपेने एका तरुणाचे अल्पायुष्य टळते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यामुळे हे व्रत अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष मानले जाते. प्राचीन काळी एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर धन-संपत्ती होती, परंतु त्याला अपत्य नव्हते. अनेक वर्षे भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्ती केल्यानंतर देवी त्याच्यावर प्रसन्न झाली. देवीने व्यापाऱ्याला दोन पर्याय दिले. अल्पायुषी पण गुणी पुत्र किंवा दीर्घायुषी कन्या. व्यापाऱ्याने गुणी पुत्राची इच्छा व्यक्त केली. काही काळाने त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या मुलाचे नाव शिव (काही कथांमध्ये वेगळे नावही आढळते) ठेवण्यात आले.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधानाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वात्तम वेळ कोणती? जाणून घ्या

मात्र, त्याच्या जन्मावेळीच त्याचे आयुष्य १६ वर्षांचे असल्याचे सांगण्यात आले. मुलगा मोठा झाल्यावर त्याचा विवाह एका सद्गुणी आणि शिवभक्त मुलीशी झाला. ती माता गौरीची निष्ठेने पूजा करत असे आणि मंगळागौरीचे व्रत नियमित करत होती. लग्नानंतर एका रात्री देवी गौरी त्या मुलीच्या स्वप्नात प्रकट झाल्या. त्यांनी सांगितले की, तुझ्या पतीवर मृत्यूचे संकट येणार आहे. त्यापासून त्याचे रक्षण करण्यासाठी एक उपाय कर. देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने पूजा केली आणि पतीला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व केले. रात्री यमदूत सर्पाच्या रूपाने आले, पण देवीच्या कृपेने त्या सर्पाला दूध भरलेल्या भांड्यात अडकवण्यात आले. त्यामुळे पतीचा मृत्यू टळला. देवी गौरीच्या आशीर्वादामुळे त्या तरुणाचे अल्पायुष्य दूर झाले आणि त्याला दीर्घायुष्य लाभले. त्यानंतर या व्रताचे महत्त्व सर्वत्र पसरले.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगळागौरी व्रत कोणासाठी विशेष मानले जाते?

    Ans: हे व्रत प्रामुख्याने विवाहित महिला पतीचे दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी करतात.

  • Que: मंगळागौरी व्रताचे महत्त्व काय आहे?

    Ans: धार्मिक श्रद्धेनुसार, हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबात सुख-समृद्धी लाभते.

  • Que: मंगळागौरीची कथा कशाशी संबंधित आहे?

    Ans: प्रचलित व्रतकथेनुसार, माता गौरीच्या कृपेने एका तरुणाचे अल्पायुष्य टळते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते.

Web Title: Mangalagauri vrat worship and recite the story of the goddess on the second tuesday of shravan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Puja Niyam: देवाला अर्पण केलेला हार कधी काढावा? दरवाजाला लावण्याआधी जाणून घ्या हे नियम
1

Puja Niyam: देवाला अर्पण केलेला हार कधी काढावा? दरवाजाला लावण्याआधी जाणून घ्या हे नियम

Sant Eknath: अडीचशे वर्षांनंतर संत एकनाथांनी केले ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण; नेमकं काय आहे यामागचा इतिहास
2

Sant Eknath: अडीचशे वर्षांनंतर संत एकनाथांनी केले ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण; नेमकं काय आहे यामागचा इतिहास

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला जुळून येणार शुभ योग; मोठे यश मिळण्याची शक्यता
3

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला जुळून येणार शुभ योग; मोठे यश मिळण्याची शक्यता

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.