Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Margashirsha month: मार्गशीर्षातील तिसरा गुरुवार का आहे शुभ, जाणून घ्या पूजेची वेळ, पद्धत आणि महत्त्व

मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात येणारे चारही गुरुवार विशेष असतात. या दिवशी विधीवत पूजा केल्याने व्यक्तीला जीवनामध्ये फायदा होतो. कलश स्थापना करण्यासाठी वेळ जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 11, 2025 | 09:26 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार
  • तिसरा गुरुवार कलश स्थापना
  • तिसऱ्या गुरुवारचे महत्त्व
 

हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवार देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी खास शुभ मानला जातो. विशेषतः तिसरा गुरुवार अधिक फायदेशीर मानला जातो. कारण या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि मंत्रजपामुळे धनलाभ, सुख-समृद्धी आणि घरातील कलह दूर होण्याचे संकेत दिले आहेत.

मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार 11 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी सूर्योदय साधारण सकाळी 6.45 ते 7.10 पर्यंत असणार आहे. तर पूजेसाठी शुभ मुहूर्त सूर्योदयापूर्वी 5 ते 6 अभिजीत मुहूर्त दुपारी 11.45 ते 12.30 सायंकाळी लक्ष्मी पूजन 6.30 ते 8 या वेळेत करता येईल. यावेळी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र असणार आहे. तर अमृत काळ 09:44 ते 11:06 असेल. राहू काळची वेळ दुपारी 1.51 ते 3.14 असेल. मार्गशीर्षातील गुरुवार संपूर्ण दिवस पूजेसाठी शुभ मानला जातो.

Zodiac Sign: मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरूवार आणि वसुमान योगाचा तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

गुरुवारी पूजा करण्याची काय आहे पद्धत

गुरुवारी पूजेची सुरुवात करण्याआधी ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ते ठिकाण स्वच्छ करुन घ्या. त्या ठिकाणी केशर-पाणी किंवा गंगाजल शिंपडून स्वच्छ करुन घ्या. कलशाची स्थापना करण्याच्या वेळी तांबे किंवा पितळेचा कलश स्वच्छ करून घ्या.कलशात पाणी, सुपारी, तांदूळ, पंचपल्लव आणि नाणे टाका. त्यावर नारळ व लाल कपडा बांधून ठेवा. त्यानंतर पूजेची सुरुवात करताना देवी लक्ष्मी व भगवान विष्णूची प्रतिमा किंवा फोटो स्वच्छ करून स्थापना करा. त्या फोटो किंवा प्रतिमेला हळदीकुंकू, तांदूळ, फुले अर्पण करा. देवीलाकमळ किंवा पिवळी फुले विशेष प्रिय मानली जातात. पूजा झाल्यानंतर केशरयुक्त दूध, पूरणपोळी, चिरा-गूळ किंवा गाईचे तूप यांचा नैवेद्य दाखवावा. गुरुवार असल्याने मीठरहित प्रसादही विशेषमान्य आहे. ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः आणि ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा. असे करणे फायदेशीर ठरते.

दिव्याचे दान आणि दानधर्म

मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी पितळेच्या दिव्यात तूप लावून दीप प्रज्वलित करा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ दीप लावल्यास आर्थिक स्थिती चांगली राहते, असे मानले जाते. पिवळे वस्त्र, चणे-गूळ, हलवा किंवा तूप दान करणे विशेष शुभ मानले जाते. गुरुवारी हे दान केल्यास बृहस्पति ग्रह मजबूत होतो, अशी श्रद्धा देखील आहे.

Astro Tips: आठव्या घरातील मंगळाचा जीवनावर कसा होतो परिणाम, जाणून घ्या फायदे, तोटे आणि उपाय

मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारचे काय आहे महत्त्व

मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी केलेल्या पूजेमुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो, असे मानले जाते. व्रत व उपासनेने अडथळे दूर होतात आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होताना दिसून येते. तसेच गुरू ग्रह प्रसन्न झाल्याने विद्या, बुद्धी, करिअर आणि कौटुंबिक सौख्य वाढते. मार्गशीर्षातील गुरुवार देवांना अत्यंत प्रिय असल्याने संपूर्ण महिनाभर सतत शुभ फलप्राप्ती होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार विशेष का मानला जातो?

    Ans: मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार हे धन, सुख-समृद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जातात. तिसरा गुरुवार विशेषतः देवी लक्ष्मी व बृहस्पति ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी उत्तम मानला जातो.

  • Que: या दिवशी कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

    Ans: तिसऱ्या गुरुवारी महालक्ष्मी, श्री विष्णू आणि बृहस्पति देवाची पूजा करणे शुभ असते. काही ठिकाणी गुरुवार व्रतही पाळले जाते.

  • Que: कलश स्थापना का करतात

    Ans: कलश हे 'पूर्णत्व आणि समृद्धी'चे प्रतीक मानले जाते. मार्गशीर्षात कलश ठेवणे म्हणजे घरात चैतन्य, शांतता, धनप्राप्तीचे स्वागत करणे.

Web Title: Margashirsha month 2025 third thursday of margashirsha puja time and method importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 09:26 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Pearl Gemstone: या राशींच्या लोकांनी मोती रत्न परिधान करणे पडू शकते महागात, जाणून घ्या धारण करण्याचे नियम
1

Pearl Gemstone: या राशींच्या लोकांनी मोती रत्न परिधान करणे पडू शकते महागात, जाणून घ्या धारण करण्याचे नियम

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीतील रिंगण, फुगडी, दिंडी आणि टाळ-मृदुंग परंपरांचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या
2

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीतील रिंगण, फुगडी, दिंडी आणि टाळ-मृदुंग परंपरांचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Rama Raksha Stotra: रामरक्षा स्तोत्र कोणी रचले? जाणून घ्या त्याचे पठण कधी करावे आणि आध्यात्मिक महत्त्व
3

Rama Raksha Stotra: रामरक्षा स्तोत्र कोणी रचले? जाणून घ्या त्याचे पठण कधी करावे आणि आध्यात्मिक महत्त्व

Sant Nivruttinath: महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील पहिले ज्ञानदीप; जाणून घ्या त्यांचा इतिहास आणि कार्य
4

Sant Nivruttinath: महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील पहिले ज्ञानदीप; जाणून घ्या त्यांचा इतिहास आणि कार्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.