Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Masik Durga Ashtami 2026: ज्येष्ठ महिन्यातील मासिक दुर्गाष्टमी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

मासिक दुर्गा अष्टमी ही देवी दुर्गेला समर्पित आहे. या दिवशी देवीची पूजा आणि उपवास केल्याने शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते. ज्येष्ठ महिन्यातील दुर्गाष्टमी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 20, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मासिक दुर्गाष्टमी कधी आहे
  •  मासिक दुर्गाष्टमीचे मुहूर्त आणि  पूजा पद्धत
  •  मासिक दुर्गाष्टमीचे महत्त्व
 

 

हिंदू धर्मात अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे. ही तिथी देवी दुर्गेला समर्पित आहे. मासिक दुर्गाअष्टमी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला येते. मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी, भक्तगण आदिशक्ती असलेल्या देवी जगदंबेची विशेष प्रार्थना करतात. असा विश्वास आहे की या दिवशी देवी दुर्गेची पूजा आणि उपवास केल्याने शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांचा अंत होतो. ज्येष्ठ महिन्यातील दुर्गाष्टमी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

कधी आहे मासिक दुर्गाष्टमी

पंचांगानुसार, ज्येष्ठ शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात शनिवार, 23 मे रोजी सकाळी 5.4 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार, 24 मे रोजी सकाळी 4.27 वाजता होणार आहे. उदयतिथीनुसार ज्येष्ठ महिन्यातील मासिक दुर्गाष्टमीचे व्रत शनिवार, 23 मे रोजी पाळले जाणार आहे.

Brahma Purana: ब्रह्मपुराणाचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व; जाणून घ्या आदीपुराणातीलमधील खास वैशिष्ट्ये

मासिक दुर्गाष्टमी मुहूर्त

मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ०४:२३ ते पहाटे ०५:०८ पर्यंत असेल. तर अभिजीत मुहूर्त सकाळी ११:५१ ते दुपारी १२:४२ पर्यंत असेल. गोधूलि मुहूर्त- सायंकाळी ६:३९ ते ७:०१ पर्यंत असेल. तसेच अमृत काळाची वेळ रात्री ११:४५ ते दुसऱ्या दिवशी दुपारी १:२१ पर्यंत असेल.

मासिक दुर्गाष्टमीला पूजा करण्याची पद्धत

मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करा. त्यानंतर देवी दुर्गेचे ध्यान करून उपवास करण्याचा संकल्प करा. देवघर स्वच्छ करा. त्यानंतर आसन ठेवा. त्यावर एक स्वच्छ लाल वस्त्र अंथरा. यानंतर, देवी दुर्गाची मूर्ती किंवा चित्र आसनावर ठेवा. पूजेदरम्यान देवीला सोळा अलंकार, एक लाल शाल आणि लाल फुले अर्पण करा. व्रताची कथा म्हणा. देवी दुर्गाला समर्पित असलेल्या मंत्रांचा जप अवश्य करा. शेवटी, देवी दुर्गाची आरती करा आणि प्रसाद वाटा.

संत चोखामेळांचे जीवनचरित्र; जाणून घ्या अखंड विठ्ठलभक्तीची प्रेरणादायी कथा

दुर्गाष्टमी व्रताचे महत्त्व

मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भक्त फक्त एकच वेळचे जेवण किंवा फळांचा नाश्ता करतात. उपवासामुळे मन एकाग्र होण्यास आणि देवी दुर्गेच्या भक्तीत मग्न होण्यास मदत होते. योग्य विधींसह उपवास पूर्ण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील समस्या सुटतात. शिवाय, घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी हा उपवास केला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक दुर्गाष्टमी म्हणजे काय?

    Ans: प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला येणारी दुर्गाष्टमी “मासिक दुर्गाष्टमी” म्हणून ओळखली जाते. हा दिवस देवी दुर्गेच्या पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो.

  • Que: ज्येष्ठ महिन्यातील मासिक दुर्गाष्टमीचे महत्त्व काय आहे?

    Ans: ज्येष्ठ महिन्यात देवीची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात सुख-शांती व सकारात्मकता वाढते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: मासिक दुर्गाष्टमीला उपवास करण्याचे महत्त्व काय आहे?

    Ans: उपवास केल्याने मन शुद्ध राहते, आत्मसंयम वाढतो आणि देवीची कृपा प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे.

Web Title: Masik durga ashtami 2026 durga ashtami muhurt mode of worship and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Pandharpur: विठ्ठल मंदिरापासून चंद्रभागेपर्यंत; जाणून घ्या पंढरपूरच्या प्रमुख धार्मिक स्थळांचे महत्त्व
1

Pandharpur: विठ्ठल मंदिरापासून चंद्रभागेपर्यंत; जाणून घ्या पंढरपूरच्या प्रमुख धार्मिक स्थळांचे महत्त्व

Shravan Purnima: श्रावण पौर्णिमेला जानवे बदलण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व
2

Shravan Purnima: श्रावण पौर्णिमेला जानवे बदलण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व

Brahmanda Purana: ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून देवी ललितेच्या भंडासुर वधापर्यंत; जाणून घ्या पुराणातील प्रमुख कथा
3

Brahmanda Purana: ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून देवी ललितेच्या भंडासुर वधापर्यंत; जाणून घ्या पुराणातील प्रमुख कथा

Tulsi Plant: पूर्वी घराच्या अंगणाच्या मध्यभागी तुळशीचे रोप का लावले जायचे? धार्मिक श्रद्धेसोबत रोजच्या जीवनाशीही होता संबंध
4

Tulsi Plant: पूर्वी घराच्या अंगणाच्या मध्यभागी तुळशीचे रोप का लावले जायचे? धार्मिक श्रद्धेसोबत रोजच्या जीवनाशीही होता संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.