Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dussehra 2026: कुठे रावणदहन, कुठे शस्त्रपूजन, तर कुठे दुर्गा विसर्जन; जाणून घ्या देशभरातील दसऱ्याच्या अनोख्या परंपरा

Dussehra 2026: भारतात सण-उत्सव भारतीय संस्कृतीला एकत्र बांधण्याचे काम करतात. एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा अर्थात विजयादशमी! हा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, प्रत्येक प्रांतात दसरा साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्या कशा पद्धती आहेत ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 18, 2026 | 03:29 PM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय दर्शवणारा सण
  • महाराष्ट्रात दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून वाटण्याची परंपरा आहे
  • उत्तर भारतात विजयादशमीला रामलीला आणि रावणदहनाचे आयोजन केले जाते
 

देशात दसरा (विजयादशमी) हा सण असत्यावर सत्याच्या आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु प्रत्येक प्रांतातील साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे.. कुठे शस्त्र पूजन तर कुठे आपट्यांची पाने वाटप करून.. तर रावण दहण करून.. याविषयी सविस्तर माहिती घेऊ यात..

महाराष्ट्र

आपट्याची पाने (सोने) वाटणे ही मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. कुटुंबातील ज्येष्ठ-कनिष्ठ एकमेकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून देऊन आपापसात सदिच्छा आणि आदर व्यक्त करतात. दुपारी गावाच्या किंवा घराच्या सीमेबाहेर जाऊन सीमोल्लंघन केले जाते आणि शमीच्या (किंवा आपट्याच्या) वृक्षाची पूजा केली जाते. तसेच शस्त्र आणि वाहन पूजन
या दिवशी पुस्तके, शस्त्रे, अवजारे आणि वाहनांची पूजा करण्याची परंपरा आहे. कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौक येथे मोठी मिरवणूक काढली जाते.

Dussehra 2026: दसऱ्याला शमीपूजन आणि आपट्याची पाने सोनं म्हणून का वाटतात? पांडव आणि कौत्साची रंजक कथा

उत्तर भारत (उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब इतर राज्यांच्या पद्धत

रामलीला आणि रावणदहन रामलीलांचे आयोजन करून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, जे प्रभू रामाच्या रावणावर झालेल्या विजयाचे प्रतीक आहे.

कंज्याक पूजा

पंजाब आणि इतर काही भागांत नवरात्रीच्या समाप्तीनिमित्त लहान मुलींची (कन्या) पूजा करून त्यांना भोजन दिले जाते.

कर्नाटक (म्हैसूर आणि कुर्ग)

म्हैसूर येथील ‘म्हैसूर दसरा’ हा जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. चामुंडेश्वरी देवीची मूर्ती सोन्याच्या अंबारीत बसवून हत्तीवरून भव्य आणि शाही मिरवणूक (जंबो सवारी) काढली जाते. कुर्ग (मडिकेरी) येथे १०० वर्षे जुनी ‘करागा’ लोकनृत्याची परंपरा आहे, ज्यामध्ये द्रौपदीचा सन्मान केला जातो.

पश्चिम बंगाल

दसऱ्याचा दिवस हा बंगाली बांधवांसाठी ‘विजया दशमी’ असतो. या दिवशी माता दुर्गेच्या मूर्तींचे पाण्यात विसर्जन (सिंदूर खेळ) केले जाते.

हिमाचल प्रदेश (कुलू व्हॅली)

हिमाचल येथील धालपूर मैदानावर ७ दिवसांचा मोठा आंतरराष्ट्रीय उत्सव भरवला जातो, ज्यामध्ये भगवान रघुनाथजींची भव्य यात्रा काढली जाते.

छत्तीसगड (बस्तर)

बस्तर येथे हा उत्सव तब्बल अडीच महिने चालतो, ज्यामध्ये आदिवासी संस्कृतीनुसार दंतेश्वरी देवीची विशेष पूजा आणि रथयात्रा काढली जाते.

Dussehra 2026: दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त का मानतात? काय आहे यामागील कारण आणि धार्मिक महत्त्व

दक्षिण भारत (तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा)

बोंमई कोलू (Golu)

तमिळनाडूमध्ये घरात बाहुल्यांची सुंदर मांडणी करून ‘कोलू’ उत्सव साजरा केला जातो. पहिले ३ दिन लक्ष्मी, ३ दिन सरस्वती आणि ३ दिन दुर्गा देवीची पूजा करून भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. आंध्र प्रदेशात कृष्णा नदीवर ‘पोत्सोत्सव’ (नाव Sair) साजरा होतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून का वाटतात?

    Ans: पौराणिक कथांनुसार, आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दसऱ्याला ही पाने एकमेकांना देऊन समृद्धी आणि शुभेच्छा व्यक्त केल्या जातात.

  • Que: दसऱ्याला शस्त्रपूजन का केले जाते?

    Ans: शस्त्रपूजन ही परंपरा सामर्थ्य, कर्तव्य आणि विजयाचे प्रतीक मानली जाते. काही ठिकाणी या दिवशी कामाची साधने, पुस्तके आणि वाहनांचेही पूजन केले जाते.

  • Que: पश्चिम बंगालमध्ये विजयादशमी कशी साजरी केली जाते?

    Ans: पश्चिम बंगालमध्ये विजयादशमीला दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी महिलांकडून ‘सिंदूर खेळा’ ही परंपराही पाळली जाते.

Web Title: Dussehra 2026 unique traditions across india pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Dussehra
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Dussehra 2026: दसऱ्याला शमीपूजन आणि आपट्याची पाने सोनं म्हणून का वाटतात? पांडव आणि कौत्साची रंजक कथा
1

Dussehra 2026: दसऱ्याला शमीपूजन आणि आपट्याची पाने सोनं म्हणून का वाटतात? पांडव आणि कौत्साची रंजक कथा

Papankusha Ekadashi 2026: पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूंच्या या रूपाची केली जाते पूजा; जाणून घ्या महत्त्व
2

Papankusha Ekadashi 2026: पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूंच्या या रूपाची केली जाते पूजा; जाणून घ्या महत्त्व

Dussehra 2026: दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त का मानतात? काय आहे यामागील कारण आणि धार्मिक महत्त्व
3

Dussehra 2026: दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त का मानतात? काय आहे यामागील कारण आणि धार्मिक महत्त्व

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
4

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.