Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matru Navami Shraddha 2026: उद्या मातृनवमी! महिलांच्या श्राद्धासाठी हा दिवस इतका खास का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Matru Navami shraddha 2026: पितृपक्षातील मातृ नवमी हा दिवंगत आई, आजी, पणजी, पत्नी आणि कुटुंबातील इतर दिवंगत महिलांच्या श्राद्धासाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. २०२६ मध्ये मातृ नवमी ४ ऑक्टोबरला असून, नवमी तिथी ४ ऑक्टोबरला पहाटे ५:५१ वाजता सुरू होऊन ५ ऑक्टोबरला पहाटे ३:५३ वाजता संपेल.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 03, 2026 | 04:41 PM
Matru Navami Shraddha 2026: (फोटो- सोशलमीडिया)

Matru Navami Shraddha 2026: (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मातृ नवमी ४ ऑक्टोबर २०२६ रोजी असून दिवंगत महिलांसाठी श्राद्ध केले जाते.
  • कुतुप मुहूर्त ११:४६–१२:३३, रोहिणी मुहूर्त १२:३३–१:२० आणि अपराह्न काळ १:२०–३:४२.
  • श्राद्धावेळी शांतता, स्वच्छता आणि सात्विक आहार पाळण्याचा लेखात उल्लेख आहे.
मातृ नवमी श्राद्ध 2026: महिलांचं श्राद्ध याच दिवशी का करतात? शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या… पितृ पक्ष सुरु आहे आणि या पंधरा दिवसात आपण आपल्या पूर्वजांना आठवतो, त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण करतो. या पितृ पक्षातील सगळ्यात महत्वाचा दिवस मानला जातो तो म्हणजे मातृ नवमी. उद्या म्हणजे 4 ऑक्टोबर 2026, शनिवारी मातृ नवमी आहे. या दिवशी दिवंगत आई, आजी, पत्नी आणि घरातील इतर महिलांसाठी श्राद्ध केलं जातं. या परंपरेला शेकडो वर्ष झाली आहेत. हा दिवस महिलांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. Matru Navami Shraddha 2026:

मातृ नवमी 2026 ची तारीख आणि शुभ मुहूर्त

यंदा नवमी तिथी 4 ऑक्टोबरला पहाटे 5 वाजून 51 मिनिटांनी सुरु होणार आहे आणि 5 ऑक्टोबरला पहाटे 3 वाजून 53 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार मातृ नवमीचं श्राद्ध 4 ऑक्टोबर, शनिवारी केलं जाईल.श्राद्ध करण्यासाठी काही खास मुहूर्त असतात. त्या वेळेत श्राद्ध केलं तर ते जास्त फळ देतं असं मानलं जातं. श्राद्धासाठी शुभ वेळ अशी आहे

  • कुतुप मुहूर्त – सकाळी 11:46 ते दुपारी 12:33
  • रोहिणी मुहूर्त – दुपारी 12:33 ते दुपारी 1:20
  • अपराह्न काळ – दुपारी 1:20 ते दुपारी 3:42
या वेळेतच श्राद्ध करणं सगळ्यात चांगलं मानलं जातं. दुपारच्या वेळी म्हणजे सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 च्या मध्ये श्राद्ध विधी करावा.

नवमीला महिलांचं श्राद्ध का करतात?

साधारणपणे ज्या तिथीला व्यक्ती गेली असेल त्याच तिथीला तिचं श्राद्ध केलं जातं. पण आईच्या बाबतीत असं नाही. आई गेली ती तिथी कोणतीही असली तरी तिचं श्राद्ध नवमीच्या दिवशीच केलं जातं. यामागे मोठं कारण आहे. नवमी तिथी ही खूप शुभ मानली जाते. ही तिथी देवी दुर्गाची आहे. दुर्गा देवीचं नववं रूप सिद्धीदात्री हिची पण हीच तिथी आहे. या तिथीला केलेलं कोणतंही काम पूर्ण होतं आणि त्याचं फळ कायम टिकतं अशी मान्यता आहे.

Pitru Paksha 2026: मृत्यूनंतर नाही, तर जिवंतपणीच पिंडदान! ‘या’ मंदिरातील ३ दिवसांची परंपरा नेमकी काय?

दुसरं कारण म्हणजे भारतीय संस्कृतीत आईला सगळ्यात मोठं स्थान आहे. तीच घराचा पाया असते, संस्कृती जपते. म्हणून तिच्यासाठी एक खास दिवस ठेवला आहे. या दिवशी फक्त आईचंच नाही तर आजी, पणजी आणि कुटुंबातील ज्या महिला आता नाहीत त्यांचं श्राद्ध केलं जातं. याला अविधवा नवमी श्राद्ध पण म्हणतात. असं म्हणतात की नवमीला श्राद्ध केल्याने घरात सुख-समृद्धी येते, शांती लाभते आणि आईचा आशीर्वाद मिळतो. सगळ्या इच्छा पूर्ण होतात.

श्राद्ध करताना या गोष्टी लक्षात ठेवा

मातृ नवमीचं श्राद्ध करताना काही नियम पाळावे लागतात.

  • या दिवशी राग, भांडणं, वादविवाद करू नये. मन शांत आणि पवित्र ठेवावं.
  • स्वयंपाक करताना स्वच्छता पाळावी. अन्न सात्विक असावं.
  • जेवणात कांदा, लसूण वापरू नये.
  • ही तामसिक मानली जातात. तसेच या दिवशी दुधी भोपळ्याची भाजी खाऊ नये, बनवू नये असं सांगितलं जातं.
  • जेवणात खीर, पुरी, बटाट्याची भाजी, भोपळ्याची भाजी असे सात्विक पदार्थ बनवावेत.
  • श्राद्धासाठी एक सुवासिनी स्त्रीला आणि एका ब्राह्मणाला जेवायला बोलवावं.
  • प्रार्थना आणि ध्यान करताना तोंड दक्षिण दिशेला असावं.
  • जेवण झाल्यावर दक्षिणा म्हणून कपडे, फळं, कुंकू, टिकली, बांगड्या अशा सुहागाच्या वस्तू द्याव्यात.
Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते

मातृ नवमी हा फक्त एक विधी नाही तर आपल्या आईबद्दल, आपल्या कुटुंबातील महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी आपल्यासाठी जे केलं त्याची आठवण ठेवण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे उद्या मनापासून श्रद्धेने श्राद्ध करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Matru navami shraddha 2026 date muhurat significance women rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Pitru Paksha
  • Pitrupaksha
  • Religion

संबंधित बातम्या

Shani Dev Puja Rules: शनिदेवांच्या पत्नीचा ‘हा’ श्राप नेमका काय? घरी पूजा करण्याआधी जाणून घ्या धार्मिक मान्यता
1

Shani Dev Puja Rules: शनिदेवांच्या पत्नीचा ‘हा’ श्राप नेमका काय? घरी पूजा करण्याआधी जाणून घ्या धार्मिक मान्यता

Pitru Paksha 2026: मृत्यूनंतर नाही, तर जिवंतपणीच पिंडदान! ‘या’ मंदिरातील ३ दिवसांची परंपरा नेमकी काय?
2

Pitru Paksha 2026: मृत्यूनंतर नाही, तर जिवंतपणीच पिंडदान! ‘या’ मंदिरातील ३ दिवसांची परंपरा नेमकी काय?

Venus retrograde: ३ ऑक्टोबरपासून शुक्र होणार वक्री, या राशींच्या जीवनात घडून येणार सकारात्मक बदल
3

Venus retrograde: ३ ऑक्टोबरपासून शुक्र होणार वक्री, या राशींच्या जीवनात घडून येणार सकारात्मक बदल

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
4

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.