Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narasimha Jayanti: भगवान विष्णूने का घेतला होता नृसिंह अवतार? काय आहे पौराणिक कथा

नृसिंह जयंती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी नृहसिंह अवताराची पूजा केली जाते, जो भगवान विष्णूंचा अद्भुत आणि पराक्रमी अवतार मानला जातो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 30, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नृहसिंह जयंती कधी आहे
  • भगवान विष्णूने का घेतला होता नृसिंह अवतार
  • नृसिंह जयंतीची पौराणिक कथा
 

 

देवाचा सहावा अवतार म्हणजे नृसिंह अवतार. भगवाताला या पृथ्वीवर दहा अवतार घेऊन मानवाचे रक्षण करावे लागले. कारण भगवंताने गीतेत सांगितले हे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत यातील सहावा अवतार म्हणजे नृसिंह! नृसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचा देवता आहेत. अधर्म आणि अत्याचार करणाऱ्यांना भगवान नृसिंह कठोर शिक्षा देतात.

नृसिंह जयंती कधी आहे

विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांनी अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी अनेक अवतार घेतले. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूच्या (Narasimha Jayanti) 12 अवतारांपैकी नरसिंह हा सहावा अवतार आहे. भगवान नृसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देवता आहेत. अधर्म आणि अत्याचार करणाऱ्यांना भगवान नरसिंह कठोर शिक्षा देतात. धर्मग्रंथानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला, आपल्या भक्त प्रल्हादच्या रक्षणासाठी, भगवान विष्णूने अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंहाचे शरीर धारण केले आणि राक्षसांचा राजा हिरण्यकशिपूचा वध केला. म्हणूनच या दिवशी नृसिंह जयंती साजरी केली जाते. यंदा नृसिंह जयंती ३० एप्रिलला म्हणजेच आज साजरी होत आहे.

पुंडलिकांची सेवा पाहून स्वतः आले विठ्ठोबा, जाणून घ्या पंढरपूरच्या विठ्ठलाची कथा

का घेतला नृसिंह अवतार

कश्यप ऋषींच्या दोन मुलांपैकी एकाचे नाव हिरण्यकश्यपू होते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केले होते आणि देव, देवी, पुरुष, स्त्री, असुर, यक्ष किंवा इतर कोणताही प्राणी त्यांना मारू शकणार नाहीत तसेच ना दिवसा, ना रात्री, ना दुपारी, ना घरात, ना बाहेर, ना आकाशात, ना पाताळात, ना शस्त्राने, ना शस्त्राने. हे वरदान प्राप्त करून तो स्वतःला देव समजू लागला. तो स्वतःला देव समजू लागला होता. हिरण्यकश्यपू आपल्या प्रजेला त्याची पूजा करण्यास भाग पाडू लागला, जे त्याची पूजा करत नाहीत, त्यांचा तो विविध प्रकारे छळ करत असे. भगवान विष्णूच्या भक्तांवर त्यांला राग येऊ लागला होता. पण हिरण्यकश्यूपला प्रल्हाद नावाचा मुलगा झाला.

प्रल्हाद गर्भात असताना आई नारदाच्या आश्रमात होती. त्यामुळे त्याचा मोठा प्रल्हादावर झाला‌. भगवान विष्णूचे निस्सीम भक्त झाला. त्यांने हिरण्यकश्यपूच्या देवात्वालाच हरताळ फासला. दैवी कार्य तो करू लागला. हिरण्यकश्यपूला ही गोष्ट कळताच त्याने प्रल्हादला समजावले. त्याने आपल्या मुलाला सांगितले की मीच देव आहे, त्यामुळे तू आणि सर्व प्रजेने माझीच पूजा करावी. परंतु प्रल्हादाने वारंवार नकार दिला आणि भगवान विष्णूंवरील आपली भक्ती सोडली नाही. उलट तो अधिक व्यापकतेने करू लागला. हिरण्यकश्यूपने प्रल्हादला आपला अपमान समजून मारण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु श्री हरी विष्णूच्या कृपेने तो वाचत असे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ याप्रमाणे हिरण्यकश्यपूचे सगळे प्रयत्न व्यर्थ जात. त्यामुळे तो अधिक संतापला होता.

Dream Astrology: रात्रीची भितीदायक स्वप्ने देतात आयुष्यातील मोठ्या बदलांचा इशारा

अखेर त्याने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले. होलिकाला वरदान मिळाला होता की, की तिला अग्नी काही करू शकत नाही. पण जेव्हा होलिका प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली तेव्हा श्रीहरीच्या कृपेने ती स्वतः त्या आगीत जळून गेली आणि प्रल्हाद वाचला. कारण वरदान सत्कार्य करणार्यांसाठी नव्हता तर दुष्कार्य करणाऱ्याविरोधात होलिका उभी राहिली तर तिला अग्नी काही करू शकणार नाही.. पण प्रल्हाद दैवी कार्य करत होता. त्यामुळे त्याला अग्नी काही करू शकली नाही. उलट होलिकेचा नाश झाला. शेवटी चिडलेल्या हिरण्यकश्यपूने आपला मुलगा प्रल्हाद याला एका खांबाला बांधले आणि त्याला मारण्यासाठी तलवार काढली आणि म्हणाला, मला सांग तुझा देव कुठे आहे, प्रल्हाद म्हणाला की या खांबात देव आहे, तू मला कुठे बांधले आहेस. हिरण्यकश्यपूला प्रल्हादचा वध करायचा होताच, नरसिंहाने खांबातून बाहेर पडून हिरण्यकश्यपचा वध केल्याने भगवान विष्णू अवतरले.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नृसिंह जयंती म्हणजे काय?

    Ans: नृसिंह जयंती हा दिवस नृसिंह अवताराच्या प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो.

  • Que: भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार का घेतला?

    Ans: अधर्माचा नाश करून भक्तांचे रक्षण करण्यासाठी विष्णू यांनी नृसिंह अवतार धारण केला.

  • Que: नृसिंह अवताराची कथा काय आहे?

    Ans: राक्षस राजा हिरण्यकश्यपू याने मिळवलेल्या वरदानामुळे तो अहंकारी झाला. त्याचा मुलगा Prahlada हा विष्णूभक्त होता. त्याचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी नृसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला.

Web Title: Narasimha jayanti 2026 why did lord vishnu take the narasimha avatar mythological story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Ramayana Story: श्रीरामांना ‘आज्ञाधारक पुत्र’ का म्हटले जाते? जाणून घ्या राजा दशरथांसोबतचे नाते
1

Ramayana Story: श्रीरामांना ‘आज्ञाधारक पुत्र’ का म्हटले जाते? जाणून घ्या राजा दशरथांसोबतचे नाते

International Yoga Day: गीता, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानात योगाचे काय आहे महत्त्व
2

International Yoga Day: गीता, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानात योगाचे काय आहे महत्त्व

Jyotiba Story: जोतिबाच्या श्रावणयष्टी यात्रेचे काय आहे धार्मिक महत्त्व? जाणून घ्या
3

Jyotiba Story: जोतिबाच्या श्रावणयष्टी यात्रेचे काय आहे धार्मिक महत्त्व? जाणून घ्या

Trigrahi Yoga: त्रिग्रही योगाचा 22 जूनपासून होणार परिणाम; या राशींना सामोरे जावे लागेल आव्हानांना, जाणून घ्या उपाय
4

Trigrahi Yoga: त्रिग्रही योगाचा 22 जूनपासून होणार परिणाम; या राशींना सामोरे जावे लागेल आव्हानांना, जाणून घ्या उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.