Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026: नवरात्रीचा सातवा दिवस कालरात्री देवीला समर्पित, कशी करावी पूजा आणि महत्त्व

Navratri 2026: आज शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा सातवा दिवस आहे म्हणजे सप्तमी तिथी आहे. आजचा दिवस कालरात्री देवीला समर्पित आहे. आजचा रंग राखाडी आहे. कालरात्री देवीची पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 17, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीचा सातवा दिवस कालरात्री देवीला समर्पित आहे
  • कालरात्री देवीची पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व
  • कालरात्री देवी कोण आहे
 

कालरात्री देवीची पूजा आणि राखाडी रंगाचे महत्त्व

नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. कालरात्री हे नवदुर्गापैकी सातवे रुप असून तिला शक्ती, धैर्य आणि नकारात्मक शक्तीचे नाश करणारे स्वरुप मानले जाते. आज १७ ऑक्टोबर रोजी राखाडी रंग आहे. राखाडी रंग हा स्थैर्य, शांतता, समतोल आणि परिस्थितीचा स्वीकार यांचा प्रतीक मानला जातो. नवरात्रीच्या सातव्या दिवशी राखाडी रंग परिधान करून देवीची पूजा करण्याची परंपरा काही ठिकाणी आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून राखाडी रंगांचे कपडे परिधान करावे.

पूजेची पद्धत

पूजेची जागा स्वच्छ करून देवीसमोर दिवा लावावा. देवी कालरात्रीच्या प्रतिमेला, मूर्तीला, गंध किंवा अक्षता अर्पण करावी. लाल किंवा लालसर फुल अर्पण केली जाऊ शकतात. नैवेद्यासाठी गूळ, केळ्याचे पदार्थ, फळ आणि आपल्या परंपरेनुसार सात्विक पदार्थ अर्पण करावे. पण अनेक ठिकाणी कालरात्री देवीसाठी गूळ वापरला जातो. देवीची आरती करून मनोभावे प्रार्थना करावी. ओम देवी कालरात्रेय नमः या मंत्रांचा जप करावा.

Navchandi Puja: शारदीय नवरात्रीत नवचंडी पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

काय आहे धार्मिक श्रद्धा

कालरात्री देवी ही नवदुर्गेतील सातवी देवी आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी तिची पूजा केली जाते. देवी दुर्गेचे हे स्वरूप उग्र, शक्तिशाली आणि दुष्ट शक्तींचा नाश करणारे मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, कालरात्री देवी भक्तांचे भय दूर करून त्यांना धैर्य आणि आत्मविश्वास देते.

कालरात्री देवी कोण आहे

कालरात्री देवी ही नवदुर्गेतील सातवी देवी असून, नवरात्रीच्या सातव्या दिवशी तिची पूजा केली जाते. देवी दुर्गेचे हे स्वरूप उग्र आणि शक्तिशाली मानले जाते. धार्मिक आख्यायिकांनुसार, देवी कालरात्री दुष्ट शक्तींचा नाश करून भक्तांचे रक्षण करते. तिचे स्वरूप अंधार, भय आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचे प्रतीक मानले जाते.

Navratri 2026: नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी देवीला समर्पित, कशी करावी देवीची पूजा

पारंपरिक वर्णनानुसार, कालरात्री देवीचा वर्ण काळा असून तिचे केस विस्कटलेले आहेत. तिला चार हात असून, दोन हातांत शस्त्रे आणि इतर दोन हात अभय व वरद मुद्रा दर्शवतात. देवीचे वाहन गाढव आहे. तिचे रूप उग्र असले, तरी ती भक्तांसाठी शुभफलदायी मानली जाते. त्यामुळे कालरात्री देवीला ‘शुभंकरी’ असेही म्हटले जाते.

धार्मिक श्रद्धेनुसार, कालरात्री देवीची उपासना केल्याने भीती आणि संकटांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ मिळते. तिची पूजा भक्तांमध्ये धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेची भावना निर्माण करणारी मानली जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कालरात्री देवी कोण आहे?

    Ans: कालरात्री देवी ही नवदुर्गेतील सातवी देवी आहे. तिचे स्वरूप शक्ती, धैर्य आणि दुष्ट शक्तींचा नाश यांचे प्रतीक मानले जाते

  • Que: कालरात्री देवीला कोणता नैवेद्य दाखवला जातो?

    Ans: धार्मिक परंपरेनुसार कालरात्री देवीला गूळ किंवा गुळापासून तयार केलेले पदार्थ अर्पण केले जातात. आपल्या घरातील परंपरेनुसार फळे आणि सात्त्विक पदार्थही अर्पण करता येतात.

  • Que: कालरात्री देवीला शुभंकरी का म्हणतात?

    Ans: देवीचे स्वरूप उग्र असले, तरी ती भक्तांसाठी शुभफलदायी आणि रक्षण करणारी मानली जाते. त्यामुळे तिला ‘शुभंकरी’ असेही म्हटले जाते.

Web Title: Navratri 2026 navratri seventh day importance of goddess puja method on kalratri pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Navratri
  • navratri day
  • Navratri festival

संबंधित बातम्या

Navratri Special : “आयुष्यात सतत काहीतरी करत राहायचंय”; मिताली जगताप यांनी सांगितला संघर्षाचा प्रवास
1

Navratri Special : “आयुष्यात सतत काहीतरी करत राहायचंय”; मिताली जगताप यांनी सांगितला संघर्षाचा प्रवास

Navchandi Puja: शारदीय नवरात्रीत नवचंडी पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Navchandi Puja: शारदीय नवरात्रीत नवचंडी पूजा का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Bhaskar Jadhav: आमदार भास्करराव जाधव यांची ६० वर्षांची परंपरा कायम; नवरात्रीत कुटुंबासह जाखडी नृत्य
3

Bhaskar Jadhav: आमदार भास्करराव जाधव यांची ६० वर्षांची परंपरा कायम; नवरात्रीत कुटुंबासह जाखडी नृत्य

Exclusive Navarashtra-Navadurga: ‘मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी…’, संस्कृतीचा अंगावर काटा आणणारा मात्र प्रेरणादायी अनोखा प्रवास
4

Exclusive Navarashtra-Navadurga: ‘मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी…’, संस्कृतीचा अंगावर काटा आणणारा मात्र प्रेरणादायी अनोखा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.