Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive Navarashtra-Navadurga: ‘मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी…’, संस्कृतीचा अंगावर काटा आणणारा मात्र प्रेरणादायी अनोखा प्रवास

Exclusive Navarashtra-Navadurga: जेव्हा जन्मतः मुलगा म्हणून ओळखली गेलेली व्यक्ती स्वतःची ओळख स्त्री म्हणून स्वीकारते, तेव्हा तिचा प्रवास केवळ बाह्य रूप बदलण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो स्वतःच्या अस्तित्वाचा आणि आत्मस्वीकृतीचा असतो.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 15, 2026 | 01:18 PM
'मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी...', संस्कृतीचा अंगावर काटा आणणारा मात्र प्रेरणादायी अनोखा प्रवास

'मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी...', संस्कृतीचा अंगावर काटा आणणारा मात्र प्रेरणादायी अनोखा प्रवास

Follow Us
Follow Us:
  • ‘मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी व्हायचं होतं!’
  • संकेत ते जेंटलमन गागा; संस्कृती सावंत यांची कहाणी
  • ‘स्वतःची ओळख शोधताना…’ संस्कृती सावंत यांचा संघर्ष
Exclusive Navarashtra-Navadurga: समाजाच्या चौकटी, लोकांच्या नजरा आणि स्वतःच्या अस्तित्वाबाबतचे अनेक प्रश्न… या सगळ्यांतून स्वतःची ओळख निर्माण करणं सोपं नसतं. मात्र, स्वतःच्या भावना स्वीकारून त्या जगासमोर मांडण्याचं धाडस मुंबईतील प्रसिद्ध ड्रॅग आर्टिस्ट संस्कृती सावंत हीने दाखवलं. संकेत सावंत ते ‘जेंटलमन गागा’ आणि पुढे संस्कृती सावंत असा तिचा प्रवास केवळ नावाचा किंवा बाह्य रूपाचा नसून कला, आत्मशोध आणि स्वतःला व्यक्त करण्याचा आहे. लहानपणापासूनच्या भावना, ड्रॅग आर्टच्या दुनियेतील अनुभव आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रवास त्यांनी मनमोकळेपणाने उलगडला. याच विषयावर नवभारत नवराष्ट्रच्या ‘नवदुर्गा’ विशेष पॉडकास्टमध्ये ड्रॅग आर्टिस्ट आणि कलाकार संस्कृती सावंत हिने आपला प्रवास उलगडला.

नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवसानिमित्त आयोजित या विशेष पॉडकास्टमध्ये सूत्रसंचालिका लीनल देशमुख यांनी संस्कृती सावंत यांच्याशी संवाद साधला. संकेत या नावाने सुरू झालेला प्रवास, ‘जेंटलमन गागा’ म्हणून मिळालेली ओळख आणि पुढे संस्कृती सावंत हे नाव स्वीकारण्यामागची भूमिका त्यांनी सांगितली.

Exclusive Navarashtra-Navadurga: चेहरा जळाला, पण स्वप्नं नाही! शरीरावर भाजल्याचे व्रण असतानाही मिताली बनली सुपरमॉडेल

संकेत ते संस्कृती सावंत; नावामागची खास कहाणी

आपल्या नावाविषयी बोलताना संस्कृती सावंत हिने मराठी संस्कृती, परंपरा आणि कुटुंबाशी असलेले नाते अधोरेखित केले. आपण सावंत कुटुंबातून आल्याचा आणि आपल्या सांस्कृतिक मुळांचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. लहानपणापासूनच घरातील संस्कार, धार्मिक परंपरा आणि भारतीय संस्कृतीचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव राहिला आहे. ड्रॅग आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर भारतीय संस्कृतीतील विविध घटक आपल्या सादरीकरणात आणण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि सांस्कृतिक मुळांशी जोडलेले ‘संस्कृती’ हे नाव निवडल्याचे संस्कृतीने स्पष्ट केले.

‘जेंटलमन गागा’ हे नाव कसे मिळाले?

संस्कृती सावंतला ‘जेंटलमन गागा’ या नावानेही ओळखले जाते. ‘गागा’ या शब्दाशी जोडलेला वेगळेपणा आणि काहीसा भन्नाट स्वभाव तिच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळतो. तिच्या कलात्मक प्रवासात या नावाने तिला ओळख मिळाली. पुढे संस्कृती हे नाव स्वीकारल्यानंतरही अनेक जण प्रेमाने तिला ‘गागा’ म्हणून बोलायला लागले. संस्कृतीच्या मते, स्वतःचे व्यक्तिमत्त्व लपवण्याऐवजी त्यातील वेगळेपणा स्वीकारणे महत्त्वाचे आहे.

‘स्वतःला स्वीकारणं हीच सर्वांत मोठी गोष्ट’

या संवादातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार. याविषयी संस्कृती सावंतने सांगितले की, एखाद्या व्यक्तीला समाज स्वीकारेल की नाही, यापेक्षा त्या व्यक्तीने स्वतःला स्वीकारणे अधिक महत्त्वाचे आहे.’जग तुम्हाला स्वीकारो अथवा न स्वीकारो, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला स्वीकारणे,’ असा संदेश तिने या पॉडकास्टमधून दिला. लैंगिक ओळख, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आणि समाजाच्या अपेक्षा याविषयी बोलताना तिने स्वतःच्या अस्तित्वाविषयी आत्मविश्वास बाळगण्यावर भर दिला.

मुंबई सोडून कुठेही जाणार नाही!

मुंबईबद्दल बोलताना संस्कृती सावंत भावनिक झाली. या शहराने आपल्याला प्रेम दिले आणि आपल्या वेगळेपणासह स्वीकारले, असे सांगितले. कामानिमित्त इतर ठिकाणी जावे लागले, तरी पुन्हा मुंबईतच परतणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबई हे केवळ कामाचे शहर नसून आपल्या आयुष्याचा आणि ओळखीचा महत्त्वाचा भाग असल्याची भावना संस्कृतीने व्यक्त केली.

मनोरंजन क्षेत्रातील १३ वर्षांचा प्रवास

संस्कृती सावंतने मनोरंजन क्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवांबद्दलही भाष्य केले. मनोरंजन क्षेत्रात जवळपास १३ वर्षे झाली असूनया प्रवासात अनेक प्रकारची कामे करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, मनोरंजन क्षेत्रात आपल्याला वैयक्तिक पातळीवर त्रास देणारा अनुभव आला नसल्याचे सांगितले. काम करताना आपली कला, मेहनत आणि व्यक्तिमत्त्व यांना महत्त्व मिळाल्याची भावना संस्कृतीने व्यक्त केली.

नृत्य, संगीत आणि ड्रॅग कलेशी घट्ट नाते

संस्कृती सावंतला लहानपणापासूनच नृत्य आणि कलेची आवड होती. शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात तिने विविध नृत्य आणि चित्रकला स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. ‘माझ्या डिक्शनरीमध्ये लाज नावाचा शब्दच नाही,’ असे सांगत तिने आपल्या बिनधास्त स्वभावाचे वर्णन केले.

नृत्य आणि संगीत हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्यामुळे ड्रॅग आर्टिस्ट म्हणून काम करणे हा त्या कलात्मक प्रवासाचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. तिच्या मते, ड्रॅग ही केवळ वेगळी वेशभूषा करण्याची कला नाही. त्यामध्ये संगीत, नृत्य, अभिनय, फॅशन आणि स्वतःला सर्जनशील पद्धतीने व्यक्त करण्याचा समावेश असतो.

ड्रॅग आर्टिस्ट, होस्ट आणि इन्फ्लुएन्सर

संस्कृती सावंतने सांगितले की, ती गेल्या सात ते आठ वर्षांपासून ड्रॅग शो करत आहेत. ड्रॅग परफॉर्मन्सव्यतिरिक्त होस्टिंग, स्टायलिंग आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग क्षेत्रातही सक्रिय आहेत. ‘गली फॅशन’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असल्याचेही सांगितले.

कलाकार म्हणून स्वतःची आवड जपतानाच उदरनिर्वाहासाठी विविध प्रकारची कामे करावी लागतात. ड्रॅग, स्टायलिंग, होस्टिंग आणि इन्फ्लुएन्सिंग ही सर्व कामे आपल्या व्यावसायिक प्रवासाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय संस्कृतीत विविधतेला स्थान; मग समाज स्वीकार का करत नाही?

या पॉडकास्टमध्ये संस्कृती सावंतने भारतीय संस्कृतीतील अर्धनारीश्वर संकल्पनेचाही उल्लेख केला. भारतीय परंपरेत अर्धनारीश्वराचे स्वरूप मान्य केले जाते. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भांमध्ये स्त्री-पुरुष तत्त्वांच्या एकात्मतेचे दर्शन घडते. मात्र, प्रत्यक्ष समाजात वेगळी लैंगिक ओळख किंवा अभिव्यक्ती असलेल्या व्यक्तींना सहज स्वीकारले जात नाही, या विरोधाभासाकडे संस्कृतीने लक्ष वेधले. समाजात अशा व्यक्तींबद्दल अधिक समजूतदारपणा, संवेदनशीलता आणि आदर निर्माण होण्याची आवश्यकता असल्याचे तिच्या संवादातून समोर आले.

नवदुर्गा पॉडकास्टमधून महत्त्वाचा संदेश

नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीची विविध रूपे पूजली जातात. मात्र, व्यक्तीच्या ओळखीचा आणि अस्तित्वाचा स्वीकार हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष आयुष्यातही दिसला पाहिजे, हा विचार या संवादातून पुढे आला.

संस्कृती सावंतचा प्रवास हा कलेतून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा, सांस्कृतिक मुळे जपण्याचा आणि आत्मविश्वासाने जगण्याचा प्रवास आहे. समाज काय म्हणेल यापेक्षा आपण स्वतःला कसे पाहतो आणि आपल्या अस्तित्वाचा किती आदर करतो, हे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांच्या अनुभवातून मिळतो.

Exclusive Navarashtra-Navadurga: शाळेच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलांसाठी उघडली प्रगतीची नवी दारं! ‘राशी पीओएस फाउंडेशन’ची कहाणी

Web Title: Navdurga podcast sanskriti sawant gentleman gaga drag artist journey gender identity self acceptance sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Exclusive
  • Navratri

संबंधित बातम्या

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण
1

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी
2

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

Navratri Born Baby: नवरात्रीत जन्मलेली मुले असतात खास? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये
3

Navratri Born Baby: नवरात्रीत जन्मलेली मुले असतात खास? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार
4

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.