Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Padmini Ekadashi 2026: 3 वर्षांतून एकदा येणारी पद्मिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

अधिक महिन्यामध्ये पद्मिनी एकादशीचे व्रत पाळले जाते. हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित असून इच्छापूर्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. अधिक महिन्यातील पहिली एकादशी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 23, 2026 | 10:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • पद्मिनी एकादशी कधी आहे
  • 3 वर्षांतून एकदाच पद्मिनी एकादशी का येते
  • पद्मिनी एकादशीचे महत्त्व
 

हिंदू धर्मात अधिक मास हा एक अत्यंत पवित्र आणि विशेष महिना मानला जातो. याच पवित्र काळात येणारी पद्मिनी एकादशी हा एक अत्यंत फलदायी उपवास मानला जातो. ही एकादशी केवळ अधिक मासातच येत असल्यामुळे, ती दर तीनवर्षांतून एकदाच येते. या दिवशी भगवान विष्णूची उपासना आणि उपवास केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात आणि अडथळे दूर होतात. अधिक महिन्यातील पद्मिनी एकादशी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

3 वर्षांतून एकदाच पद्मिनी एकादशी का येते

खगोलशास्त्र आणि हिंदू पंचांगानुसार, चांद्र वर्ष आणि सूर्य वर्ष यांच्यामध्ये दरवर्षी अंदाजे ११ दिवसांचा फरक असतो. हा फरक भरून काढण्यासाठी, दर ३ वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास, मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाते. यामुळेच या महिन्यात येणाऱ्या एकादशी दुर्मिळ मानल्या जातात.

Ekadashi 2026: अधिक महिन्यातील ‘ही’ एकादशी मानली जाते खास, मिळू शकते श्रीहरींची कृपा

अधिक महिन्यातील दोन विशेष एकादशी

अधिक महिन्यात दोन विशेष एकादशी येत आहे. पद्मिनी एकादशी जी बुधवार, 27 मे रोजी आहे. या एकादशी कमला एकादशी असे देखील म्हटले जाते. तर दुसरी परमा एकादशी, ही एकादशी गुरुवार, 11 जून रोजी असणार आहे. या दोन्ही एकादशीचा उपवास करणे फायदेशीर मानले जाते. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रभावी मानले जातात.

पद्मिनी एकादशी कधी आहे

बुधवार, २७ मे रोजी पद्मिनी एकादशीचा उपवास पाळला जाणार आहे. एकादशी तिथीची सुरुवात २६ मे रोजी सकाळी ५:१० वाजता होणार आहे आणि २७ मे रोजी सकाळी ६:२१ वाजता संपणार आहे.

पद्मिनी एकादशीच्या दिवशी पूजा करण्याची पद्धत

एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करावे.

या दिवशी साबणाने स्नान करणे निषिद्ध मानले जाते, त्यामुळे साबण किंवा कोणतेही रासायनिक क्लीनर वापरणे टाळा.

त्यानंतर देवघर स्वच्छ करून एका चौरंगावर विष्णू, बाळ गोपाल, शालिग्राम आणि श्री यंत्र यांची स्थापना करावी.

नंतर सर्वांना पंचामृताने स्नान घालून त्यांना पिवळे कपडे, फुले आणि तुळशीचा हार घाला.

शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि उदबत्त्या लावा. देवतेला मिठाई, फळे, तुळशीची पाने आणि पंचामृत अर्पण करा.

नंतर विष्णु सहस्रनामाचा पाठ करा आणि “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करा.

या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा आणि शक्य असल्यास त्याच्या सात प्रदक्षिणा घाला.

एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. गरज वाटल्यास, एक दिवस आधी तोडून पाण्यात साठवून ठेवावीत.

Chandra Gochar: चंद्र सूर्याच्या राशीत करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

पद्मिनी एकादशीचे महत्त्व

पद्मिनी एकादशीचे महत्त्व स्कंद पुराणात सांगितले गेले आहे. भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांनाही हे व्रत पाळण्याची योग्य पद्धत समजावून सांगितली आहे. असे मानले जाते की पद्मिनी एकादशीचे व्रत पाळल्याने व्यक्ती भूतकाळातील आणि वर्तमानातील सर्व पापांपासून मुक्त होऊ शकते. जर एखादी व्यक्ती विधीनुसार आदिमास एकादशी म्हणजेच पद्मिनी एकादशीचे व्रत पाळते, तर तिला भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ धामात स्थान मिळण्याचा लाभ होतो.ट

दान करण्याचे महत्त्व

या दिवशी, आपल्या ऐपतीनुसार गरजू लोकांना तांदूळ, डाळ, पीठ, तूप, मीठ आणि फळे दान करण्याच्या महत्त्वावर भर दिला जातो. असे मानले जाते की पद्मिनी एकादशीला केलेल्या दानाचे अनेक पटींनी फळ मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: पद्मिनी एकादशीला विशेष महत्त्व का आहे?

    Ans: ही एकादशी अधिकमास किंवा पुरुषोत्तम मासात येत असल्यामुळे अत्यंत पुण्यदायी आणि दुर्मिळ मानली जाते. हा योग साधारणपणे तीन वर्षांतून एकदाच येतो

  • Que: पद्मिनी एकादशी 2026 कधी आहे?

    Ans: पद्मिनी एकादशी बुधवार, 27 मे रोजी आहे

  • Que: पद्मिनी एकादशीचे व्रत केल्याने काय लाभ मिळतात?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे सुख-समृद्धी, कीर्ती, वैभव आणि आध्यात्मिक प्रगती मिळते.

Web Title: Padmini ekadashi 2026 padmini ekadashi muhurt mode of worship and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Garuda Purana: गरुड पुराणातील यमलोक आणि नरकाची कथा काय सांगते? जाणून घ्या या ग्रंथाचे महत्त्व
1

Garuda Purana: गरुड पुराणातील यमलोक आणि नरकाची कथा काय सांगते? जाणून घ्या या ग्रंथाचे महत्त्व

Shivlilamrut: शिवलीलामृतच्या १३व्या अध्यायातील दक्षयज्ञापासून शिव-पार्वती विवाहापर्यंतची संपूर्ण कथा जाणून घ्या
2

Shivlilamrut: शिवलीलामृतच्या १३व्या अध्यायातील दक्षयज्ञापासून शिव-पार्वती विवाहापर्यंतची संपूर्ण कथा जाणून घ्या

Budhaditya Yoga: श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तयार होत आहे बुधादित्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार सुख-संपत्तीचा लाभ
3

Budhaditya Yoga: श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तयार होत आहे बुधादित्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार सुख-संपत्तीचा लाभ

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधानाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वात्तम वेळ कोणती? जाणून घ्या
4

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधानाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वात्तम वेळ कोणती? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.