फोटो सौजन्य- pinterest
हस्तरेखाशास्त्रानुसार, आपल्या तळहातावरील विविध रेषा, पर्वत यांचे वर्णन आढळते. त्याच प्रकारचे वर्णन शरीराच्या वेगवेगळ्या भागातील रचनेचे केलेले असते. यावरुन व्यक्तीच्या भविष्याबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल समजून येते. जसे की एखाद्या व्यक्तीच्या ओठांच्या आकारावरुन समजते की, त्याचे भविष्य आणि व्यक्तिमहत्त्व कसे असेल. तो श्रीमंत असेल की गरीब. ओठांच्या आकारामुळे त्या व्यक्तीमधील कोणतीही मोठी रहस्ये उघड करता येतात. ओठांवरुन भविष्य आणि स्वभाव कसा ओळखायचा, जाणून घ्या
हस्तरेखाशास्त्राच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तीचे ओठ गुलाबी असतात त्या व्यक्तींचे जीवन चांगले असते. हे लोक खूप बुद्धिमान असतात. अशा लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि ते त्यांच्या हुशारीने पुढे जातात. या लोकांची बोलण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते त्यामुळे सर्व लोक त्यांच्या बोलण्याकडे प्रभावित होतात. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते सर्व समस्यांमधून सहजपणे मार्ग काढतात. त्यामुळे त्यांना जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते.
ज्या लोकांचे ओठ उग्र असतात त्यांना जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागतो, असे मानले जाते. तसेच त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. हस्तरेखाशास्त्रानुसार, या लोकांना कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. या लोकांना भावनिकदृष्ट्याही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
मान्यतेनुसार ज्या व्यक्तीच्या ओठांचा रंग लाल असतो त्या व्यक्तींचा स्वभाव खूप चांगला असतो, असे मानले जाते. लाल रंगांचे ओठ असलेले लोक खूप श्रीमंत असतात असे मानले जाते. तसेच या लोकांना जीवनामध्ये अनेक प्रकारच्या सोयीसुविधा मिळतात. लाल ओठ असलेले लोक एखाद्याशी मैत्री केल्यास ती मनापासून करतात अथवा दोन हात दूर राहतात. त्याचसोबत हे लोक नेहमी अडी अडचणींना लोकांची मदत करण्यास पुढे असतात. तसेच या लोकांना कधीच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही.
ज्या महिलांच्या ओठांचा रंग लाल असतो आणि ते गुळगुळीत असतात त्या स्वभावाने सर्वोत्तम असतात, असे मानले जाते. या लोकांच्या जीवनात नेहमी आनंद आणि सुख समृद्धी असते. या महिलांना जास्त कष्ट करावे लागच नाही. हे लोक त्यांच्या कारकिर्दीत खूप प्रगती करुन यश संपादन करतात. या व्यक्तींना कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. तसेच त्यांना परिवारातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळतो. गुळगुळीत आणि लाल ओठ असलेल्या महिला नातेसंबंध व्यवस्थितरित्या टिकवून ठेवतात.
ज्या महिलांच्या ओठांमध्ये रेषा असते अशा महिला खूप भाग्यवान असल्याचे मानले जाते. अशा महिलांना नेहमीच नशिबाची साथ मिळते. या महिला लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही जीवनात आनंदीत राहतो. अशा लोकांना कशाचीही कमतरता भासत नाही. तसेच ही लोक त्यांच्या पुढील कारकिर्दीत त्यांना नशिबाची साथ मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)