फोटो सौजन्य- pinterest
अंकशास्त्रानुसार, बुधवार असल्याने बुधाची संख्या 5 मानली जाते. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास असणार आहे. तर काही मूलांकांची लोक कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील. तुमचे कोणतेही काम दीर्घकाळापासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. करिअरच्या दृष्टीने आज तुमच्या मनात अनेक विचार राहतील. तुमचा मानसिक ताण कमी होईल.
मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्ही आज सामाजिक क्षेत्रात सहभाग घेऊ शकता. आज घरातील वातावरण शांत राहील. आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक 4 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी दिलेल्या नवीन जबाबदाऱ्या गांभीऱ्याने घेऊन पूर्ण कराव्या लागतील. तुमची अडकलेली कामे आज पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक 5 असलेले लोक कामात व्यस्त राहतील. व्यवसायाच्या संबंधित असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुमचा एखाद्या नवीन व्यक्तीशी संपर्क होऊ शकतो त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होऊ शकतो. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज कौटुंबिक कार्यक्रम किंवा भावनिक क्षणाचा आनंद घ्याल. कलेशी संबंधित असलेले लोक कामात व्यस्त राहतील. जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील. कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रामध्ये तुमचा रस वाढेल.
मूलांक 7 असलेल्या लोकांना इतरांशी कमी बोलायला आवडते. जर एखाद्या व्यक्तीला अभ्यास, ध्यान किंवा सर्जनशील लेखनात रस असल्यास त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करु शकता. दीर्घकालीन कोणतीही गुंतवणूक करताना विचारपुर्वक निर्णय घ्या. कोणतेही आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा दिवस उत्साहाने भरलेला असतो. कामाच्या ठिकाणी कोणत्याही योजना आखू शकता. तुमच्या कोणत्याही जुन्या समस्या असतील तर त्या आज सुटतील. तुमचे विचार इतरांवर लादू नका.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)