फोटो सौजन्य- pinterest
शनि देव 2027 प्रयंत मीन राशीमध्ये राहून काही राशीच्या लोकांवर आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे. त्यामुळे व्यक्तीने दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास त्याचा व्यवसायात फायदा होणार आहे.
न्यायदेवता असलेल्या शनिदेवाने मीन राशीमध्ये 29 मार्च रोजी प्रवेश केला आहे आणि या राशीमध्ये तो 2027 पर्यंत राहणार आहे. सर्व ग्रहांमध्ये असलेला शनि हा सर्वांत मंद गतीचा ग्रह मानला जातो. त्याचा परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांवर होतो. शनि ग्रहाला कर्माचा कर्ता म्हणून देखील ओळखले जाते. त्याचा परिणाम व्यक्तीला त्यांच्या कर्मांवर आधारित शुभ आणि अशुभ फळं देतात.
कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांच्या स्थितीमुळे व्यक्तीला व्यवसाय आणि करिअरमध्ये विशेष प्रगती होणार आहे. दरम्यान, शनिच्या राशीतील बदलामुळे लोकांना विशेष फायदे होतात. अशा परिस्थितीत, मीन राशीत राहून 2027 पर्यंत काही राशींवर शनि आपला आशीर्वादाचा वर्षाव करेल. शनि देवाच्या या प्रभावामुळे एखाद्या व्यक्तीला गुंतवणूक आणि योजनांमध्ये चांगली बातमी मिळेल, तर प्रेम जीवनातही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या राशी आहेत त्या जाणून घेऊया.
शनि मीन राशीत असल्याने वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. यामुळे या राशीतील लोकांच्या व्यवसायामधील सर्व योजना देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पूर्ण होतील. त्याशिवाय या लोकांना आर्थिक लाभाच्या संधी देखील उपलब्ध होतील. तसेच तुम्ही आर्थिक योजना आखत असल्यास तुम्हाला यश मिळेल. व्यायवसायिकांच्या निर्णयांमध्ये स्थिरता राहील. प्रलंबित कामांमध्ये सर्वांची प्रगती होईल. न्यायालयीन खटवल्यातून तुमची सुटका होईल. प्रत्येक क्षेत्रातील लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल.
मकर राशीच्या लोकांना त्यांच्या उत्पन्नामध्ये फायदा होईल. मुलांच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करत आहेत अशा विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. व्यवसाय आणि करिअरमध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्ही एखादी नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला राहील. मात्र तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आत्मविश्वास वाढल्याने तुमचे काम इच्छेनुसार पूर्ण होईल.
कुंभ राशीच्या लोकांवर शनि देवाचा विशेष आशीर्वाद राहतो. शिक्षणात रस असलेल्या विद्यार्थ्यांना हा काळ विशेष असणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. पदोन्नतीची शक्यता वाढेल. भौतिक सुखसोयींच्या बाबतीतही हा काळ चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)