Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan: राखी बांधताना 3 गाठी का बांधतात? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

राखी बांधताना तीन गाठी बांधणे ही एक धार्मिक परंपरा आहे. याचा संबंध त्रिदेवाशी असल्याचे मानले जाते. रक्षाबंधनाचा सण पूर्ण विधीपूर्वक साजरा करण्यासाठी ओवाळणीच्या ताटामध्ये सर्व गोष्टी असणे महत्त्वाचे असते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 01, 2025 | 02:26 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या नात्यामधील नात दृढ करण्यासाठी एक खास सण मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंद आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा सण शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आहे. मात्र रक्षाबंधनाच्या परंपरे संबधित अनेक श्रद्धा आहेत ज्याचे पालन बहिणी करावे. राखी बांधताना बहिणी त्यात 3 गाठी बांधतात. या गाठी बांधण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व, जाणून घ्या

काय आहे रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त

शनिवार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.22 ते पहाटे 5.4 पर्यंत राहील. तर राखी बांधण्यासाठी मुहूर्त दुपारी 12 ते 12. 53 पर्यंत राहील हा अभिजित मुहूर्त सर्वोत्त्म मानला जातो. यावेळी बहिणींनी भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते.

Raksha Bandhan: भावाला अशा प्रकारची राखी बांधा, करिअर आणि जीवनात मिळेल अपेक्षित यश

ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी असाव्यात

ओवाळणीच्या ताटामध्ये या गोष्टी असणे गरजेचे मानले जाते. त्यातील प्रत्येक वस्तूला विशेष असे महत्त्व आहे. या गोष्टींचा ताटामध्ये समावेश करणे खूप गरजेचे मानले जाते.

टिळक लावण्यासाठी कुंकू आणि तांदूळ

हळद – याला शुभतेचे प्रतीक मानले जाते.

नारळ – नारळाला समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

राखी – भावाच्या मनगटावर बांधण्यासाठी

दिवा – राखी बांधून झाल्यावर ओवाळण्यासाठी

मिठाई – ओवाळून झाल्यावर गोड पदार्थ भरवण्यासाठी मावा मिठाई किंवा खीर

ओवाळणीच्या ताटामध्ये या गोष्टी असणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा ताट अपूर्ण असल्याचे मानले जाते.

राखी बांधताना 3 गाठी बांधण्याचे महत्त्व

राखी बांधताना तीन गाठी बांधण्याची परंपरा खूप जुनी आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, या गाठींचा संबंध त्रिदेवांशी आहे म्हणजेच – ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी असल्याचे मानले जाते.

Shukra Gochar: शुक्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या जीवनातील वाईट दिवस संपतील, मिळेल अपेक्षित यश

राखी बांधताना पहिली गाठ बांधण्याचा अर्थ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी असा होतो.

राखी बांधताना दुसरी गाठ बांधण्याचा अर्थ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि शांतीसाठी असा होतो.

तर तिसऱ्या गाठीचा अर्थ भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम आणि गोडवा टिकवून ठेवण्यासाठी असा होतो.

मान्यतेनुसार या तिन्ही गाठी बंध मजबूत करतात यामुळे जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते. म्हणून बहिणीने राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते.

रक्षाबंधन सणाचे महत्त्व

रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून तो भाऊ आणि बहिणीच्या नात्यामधील अतूट प्रेम विश्वास दाखवतो. हा सण आपल्याला जीवनात नाती किती महत्त्वाची आहेत याची आठवण करून देतो. बहिणी आपल्या भावांच्या संरक्षणासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणींच्या आनंदासाठी आणि सुरक्षिततेची देण्याचे वचन देतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Raksha bandhan 2025 why are 3 knots tied while tying rakhi religious significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • dharm
  • Raksha Bandhan
  • religions

संबंधित बातम्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण
1

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण

Surya Ketu Yuti: नागपंचमीच्या दिवशी सिंह राशीत सूर्य आणि केतूची होणार युती, या राशींच्या लोकांनी कुटुंबाची घ्यावी काळजी काळ
2

Surya Ketu Yuti: नागपंचमीच्या दिवशी सिंह राशीत सूर्य आणि केतूची होणार युती, या राशींच्या लोकांनी कुटुंबाची घ्यावी काळजी काळ

Samudrik Shastra: शरीराच्या या भागांवर तीळ असणे मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र
3

Samudrik Shastra: शरीराच्या या भागांवर तीळ असणे मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश
4

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.