Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rameshwar Jyotirlinga: काय आहे रामेश्वरस्वामी मंदिराचा रामायणाशी संबंध, रामेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा जाणून घ्या

रामेश्वरस्वामी मंदिर हे हिंदू धर्मातील पवित्र स्थळ असून रामायणाशी जोडलेले आहे. रामेश्वरममध्ये वसलेले हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून भगवान शिव यांना समर्पित आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 13, 2026 | 09:37 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रामेश्वरस्वामी मंदिराचा रामायणाशी संबंध
  • रामेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा
  • रामेश्वरम् ज्योतिर्लिंग महत्त्व

रामेश्वरम् ज्योतिर्लिंग महत्त्व

12 ज्योतिर्लिंगापैकी दहावे ज्योतिर्लिंग ते म्हणजे दक्षिण भारतातील रामेश्वरम् स्वामी मंदिर. हे मंदिर तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम या पांबन बेटाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेले आहे. या चारधाम यात्रेतील एक महत्त्वाच असं धाम आहे. हिंदू धर्मात या देवस्थानाला खूप जास्त असं महत्त्व आहे. हे शिवलिंग राम आणि शिव यांच्याशी संबंधित आहे म्हणूनच याला रामेश्वरम् असे नाव पडले. रामाचा ईश्वर अर्थातच रामेश्वरम. या मंदिरांचा प्रांगण अतिशय भव्य आणि सुंदर आहे.

Jyotirlinga: ज्योतिर्लिंग म्हणजे काय? यामागील पौराणिक कथा जाणून घेऊया

२२ कुंड व अग्नीतीर्थ

या मंदिरात 22 पवित्र कुंड आहे. प्रत्येक कुंडाचे पाणी वेगवेगळ्या चवीचं आणि गुणधर्माचं आहे असं मानलं जातं. दर्शनापूर्वी या कुंडात स्नान करणे शुभ मानले जाते. मंदिराजवळील समुद्राला अग्नीतीर्थ असे मानले जाते. येथे स्नान केल्याने पाप नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. मंदिराची रचना पारंपरिक दक्षिण भारतीय अर्थातच द्रविड शैलीत असून उंच गोपुरम भव्य आहे. रामेश्वरामध्ये राम सेतू असल्याची देखील श्रद्धा आहे. येथून श्रीरामांनी लंकेकडे जाण्याचा मार्ग तयार केला होता. या ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा जाणून घेऊया

ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा

ही कथा आहे रामायणातील. रामायणानुसार राम यांनी लंकेच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी येथे भगवान शिवांची पूजा केली होती. श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर ब्राम्हण हत्या दोष दूर करण्यासाठी शिवपूजा करण्याचं ठरवलं. त्याने हनुमान यांना काशीहून शिवलिंग आणायला पाठवलं. पण वेळ निघून जात असल्यामुळे सीतेनेच वाळूचे शिवलिंग तयार केले. या शिवलिंगाची पूजा करून रामांनी दोष मुक्ती मिळविली.

Varuthini Ekadashi: वल्लभाचार्य नक्की कोण होते? कुठे झाला जन्म जाणून घ्या संपूर्ण कथा

 

हे शिवलिंग रामनाथ स्वामी ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झालं. हनुमान परत आल्यावरती त्यांना दुःख झालं की त्यांच्या आणलेल्या शिवलिंगाऐवजी दुसरं शिवलिंग पूजलं गेलं आहे. तेव्हा श्रीरामांनी त्यांना शांत करून सांगितलं की तू आणलेलं शिवलिंगही येथेच स्थापित केलं जाईल. म्हणूनच येथे दोन शिवलिंगाच महत्त्व सांगितलं जातं. एक शिवलिंग राम लिंग म्हणून ओळखलं जातं जे माता सीतेने वाळूपासून तयार केलं. तर दुसरं शिवलिंग हे हनुमान लिंग म्हणून ओळखलं जातं.

ज्योतिर्लिंगाची ओळख

रामेश्वरम हे श्रद्धा, इतिहास आणि वास्तुकलेचा सुंदर असा संगम आहे. ज्योतिर्लिंगाला भेट दिल्यामुळे मनशांती आणि आध्यात्मिक समाधान मिळतं. शिवाय पापमोचन अशी देखील या ज्योतिर्लिंगाची ओळख आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रामेश्वरम् ज्योतिर्लिंग कुठे आहे?

    Ans: रामेश्वरम् मंदिर तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथे समुद्रकिनाऱ्याजवळ स्थित आहे.

  • Que: मंदिरातील २२ कुंडांचे महत्त्व काय आहे?

    Ans: या २२ पवित्र कुंडांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते; प्रत्येक कुंडाचे पाणी वेगळ्या गुणधर्माचे असल्याची श्रद्धा आहे.

  • Que: रामेश्वरम् मंदिराचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून चारधाम यात्रेचा महत्त्वाचा भाग आहे; येथे दर्शनाने पापमोचन व मनःशांती मिळते अशी श्रद्धा आहे.

Web Title: Rameshwar jyotirlinga the connection of rameshwaraswamy temple with ramayana the story of rameshwara jyotirlinga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • hindu religion
  • Jyotirlinga
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
1

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष
2

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष

Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी घरात श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे का काढले जातात? जाणून घ्या कारण
3

Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी घरात श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे का काढले जातात? जाणून घ्या कारण

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी
4

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.