
फोटो सौजन्य- gemini.
लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा स्त्रीया कोणीही साईबाबांच व्रत करू शकतात. असं सांगण्यात येतं. 9 गुरुवार हे व्रत करावं असं साईबाबांच्या अध्यायात सांगण्यात आलेलं आहे. या दिवशी उपवास करून संध्याकाळी साईबाबांसमोर दिवा लावा त्यांच्या मंदिरात दर्शनासाठी जा आणि एकवेळच जेवण करा, असंही सांगण्यात येतं. 5, 11 किंवा 21 रुपात हे व्रत असावं आणि कोणत्याही गुरुवारपासून या व्रताची सुरुवात करता येते, असा या व्रताचा नियम आहे. साईबाबांच्या व्रताची नेमकी कथा काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया
गुजरातमधील एका शहरामध्ये कोकिळा नावाची स्त्री आणि तिचा पती महेशभाई राहतं होते. त्याचं एकमेंकावर प्रेम होतं. पण महेश यांचा स्वभाव भांडखोर होता. तर कोकिळा अत्यंत धार्मिक स्त्री होती तिचा देवावर नेहमीच विश्वास होता. तिच्या नवऱ्यांच्या भांडखोर स्वभावामुळे व्यवसायावर आणि नोकरीवर परिणाम होऊ लागला. ज्यामुळे उत्पनाचं दुसरं कोणतंही साधन उरलं नाही. नोकरी गेल्यामुळे महेशभाई घरीच राहू लागले आणि ते चुकीच्या मार्गावर गेले. त्यांच्या आळशीपणामुळे त्यांचा स्वभाव अधिकच चिडचिडा झाला.
एके दिवशी एक वृद्ध गृहस्थ दारामध्ये उभे राहिले. त्यांनी डाळ भात मागितला. धार्मिक वृत्तीच्या असलेल्या कोकिळाने त्यांना डाळ भात दिला आणि दोन्ही हातांनी त्या वृद्ध गृहस्थाला नमस्कार केला ते गृहस्थ म्हणाले, साईंचा आशीर्वाद तुमच्यावर असो, कोकिळा म्हणाली, बाबा सुख मात्र माझ्या नशिबी नाही मग नंतर सर्व माहिती तिने त्यांना दिली. त्यानंतर त्या वृद्ध गृहस्थाने कोकिळाला साईबाबांच्या व्रताविषयी सांगितलं. ते म्हणाले, हे व्रत केल्याने तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि बाबांचा आशीर्वाद तिच्या घरी कायम राहील. त्या वृद्ध गृहस्थाचं म्हणणं ऐकून कोकिळाने नऊ गुरुवार हे व्रत पाळलं. बाबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तिने केली. त्यानंतर लवकरच घरामध्ये समृद्धी वाढली आणि ते जोडप आनंदाने आणि शांततेने राहू लागलं. त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला आणि महेश भाईंचा स्वभाव ही बदलला.
एक दिवशी कोकिळाचे दीर आणि वहिनी सुरत वरून आले बोलता बोलता त्यांनी सांगितलं की त्यांची मुलं अभ्यासाकडे लक्षच देत नाही आहेत त्यामुळे परीक्षेत सतत नापास होत आहे. तेव्हा कोकिळाने नऊ गुरुवार उपवास करण्याचा सल्ला दिला आणि त्यांची महती समजवून सांगितली. साईबाबांच्या भक्तीमुळे मुलं चांगला अभ्यास करू शकतील पण साईबाबांवर श्रद्धा असणं महत्त्वाचं होतं. काही दिवसांनी देखील सुरत वरून पत्र आलं होत त्यात लिहीलं होत तिच्या मुलांनी साईबाबांचा उपवास सुरू केला आहे आणि त्यांचा अभ्यासही चांगला सुरू झाला आहे. नऊ गुरुवारी साईबाबांचे व्रत श्रद्धापूर्वक केल्याने साईबाबांचा आशीर्वाद राहतो, असा भक्तांचा समज आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: साईभक्तांच्या परंपरेनुसार महिला, पुरुष, वृद्ध आणि लहान मुलेही श्रद्धेनुसार हे व्रत करू शकतात.
Ans: गुरुवारी साईबाबांची पूजा करून दिवा लावावा, नामस्मरण करावे आणि श्रद्धेनुसार उपवास किंवा एकवेळ भोजन करावे. साई मंदिरात दर्शन घेणेही करता येते.
Ans: भक्तांच्या श्रद्धेनुसार ९ गुरुवार व्रत श्रद्धेने केल्यास साईबाबांचा आशीर्वाद मिळतो आणि मनोकामना पूर्ण होण्याची भावना आहे. हा धार्मिक विश्वास आहे.