फोटो सौजन्य- chatgpt
शिर्डीचे साईबाबा हे श्रद्धा, सबुरी आणि मानवतेचा संदेश देणारे संत म्हणून भक्तांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. त्यांच्या जीवनातील अनेक कथा आजही भक्तांमध्ये सांगितल्या जातात. अशीच एक कथा मुंबईतील एका व्यापाऱ्याशी संबंधित आहे. या कथेत साईबाबांनी दिलेल्या तीन रुपयांमागील आध्यात्मिक संदेश विशेष महत्त्वाचा मानला जातो.
बाबांच्या भक्त समुदायामध्ये सर्व धर्माचे भक्त होते. बाबांचे अनेक चमत्कार सांगितले जातात, असाच प्रत्यय मुंबईतील एका व्यापाऱ्याला आला. मुंबईतील एका व्यापाऱ्यांचा मुलगा खूप आजारी होता त्याला नेमका कोणता आजार झाला आहे हेच कळतं नव्हतं. अखेर त्या मुलाला व्यापाऱ्याने साईबाबांच्या चरणी शिर्डीला आणलं आणि त्याच्या आजारांविषयी माहिती दिली. साईबाबांनी गोड हसून त्या मुलाला आशीर्वाद दिला आणि संध्याकाळनंतर त्या मुलाला बरं वाटू लागलं. बाबांनीच मुलाला बरं केलं आणि चमत्कार झाला असे तो व्यापारी बोलू लागला.
त्यावर साईबाबांनी त्याला सांगितलं तो केवळ परमेश्वरच एखाद्याला जीवनदान देत असतो यामध्ये माझं कोणतंही सामर्थ्य नाही. यानंतर व्यापारी आणि त्याचा मुलगा काही दिवस शिर्डीतच मुक्कामाला राहिले आणि मुलाच्या आरोग्यात खूप फरकही पडला.
जेव्हा व्यापारी मुंबईला जायला निघाला तेव्हा साईबाबांनी त्याला तीन रुपये दिले आणि म्हणाले दोन रुपये मी आधीच तुला दिले आहेत आणि आता हे तीन रुपये घे आणि पुजेच्या स्थानावर ठेवं. देवाचं नामस्मरण कर आणि चांगलं कर्म करत जा. तुझ भलंच होईल.
साईबाबांनी आपल्याला दोन रुपये कधी दिले असाच विचार करत व्यापारी मुंबईत आला आणि त्याने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. तेव्हा आईने सांगितलं जेव्हा लहानपणी व्यापारी आजारी पडला होता तेव्हा त्याचे बाबा त्याला साईबाबांकडे घेऊन गेले आणि त्यावेळी साईबाबांनी त्याला दोन रुपये आशीर्वाद म्हणून दिले होते. यावरूनच देवाचं आणि भक्तांच नातं खूप मजबूत आहे हे सिद्ध झालं. भक्त जरी देवाला विसरला असला तरी देव त्याचं नेहमीच रक्षण करतो.
या कथेतून साईभक्तीतील श्रद्धा, ईश्वरावरील विश्वास आणि चांगले कर्म यांचा संदेश दिला जातो. भक्त आपल्या आयुष्यात देवाला विसरला तरी ईश्वर भक्ताला विसरत नाही, अशी श्रद्धा या कथेतून व्यक्त होते.
साईबाबांच्या शिकवणीत केवळ चमत्कारांपेक्षा श्रद्धा, सबुरी, नामस्मरण आणि सत्कर्म यांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे ही कथा भक्तांसाठी श्रद्धा आणि ईश्वराशी असलेल्या नात्याची आठवण करून देणारी मानली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कथेनुसार, साईबाबांनी व्यापाऱ्याला तीन रुपये देऊन ते पूजेच्या ठिकाणी ठेवण्यास आणि देवाचे नामस्मरण करण्यास सांगितले.
Ans: देवाचे नामस्मरण करावे, चांगले कर्म करावे आणि श्रद्धा कायम ठेवावी, असा संदेश या कथेतून दिला जातो.
Ans: साईबाबांच्या भक्तीपरंपरेत ‘श्रद्धा आणि सबुरी’ या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते.





