Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sant Surdas: कोण आहे संत सूरदास, जाणून घ्या सूरदासांचा अध्यात्मिक प्रवास

कृष्णभक्तिपर पदे रचणाऱ्या आठ भक्तकवींच्या कविसंप्रदायामध्ये सूरदास अग्रगण्य मानले जातात. त्यांच्या जन्मतारखे संदर्भात काही वादविवाद असले तरी काही संदर्भानुसार आज सूरदास यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 17, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कोण आहेत संत सूरदास
  • सूरदासांचा अध्यात्मिक प्रवास
  • संत सूरदासांचा जन्म कुठे झाला
 

 

सूरदासाच्यावर भावलेल्या सम्राट अकबराने आपली स्तुतिकवने रचण्याची आज्ञा सूरदासांना केली; पण ‘नहिं न रह्यो मन में ठौर’ म्हणजेच‘मी केवळ कृष्णकीर्तन करतो, अन्य कुणाचे कीर्तिगान करणे मला रुचत नाही’ असे परखड उत्तर सूरदासांनी दिले. तसेच त्याच्या कवित्वावर व गानमाधुर्यावर खूष होऊन अकबराने त्याला इनाम दिलेली काही गावे व द्रव्यही देऊ केले पण तेही सूरदासांनी नाकारले. असे महान कवी म्हणजे सूरदास हे थोर कृष्णभक्त आणि हिंदी संतकवी होते. त्यांच्या जन्माविषयीची नेमकी माहिती उपलब्ध नाही; मात्र १७ एप्रिल १४७८ ही त्यांची जन्मतारीख असल्याचे काही उल्लेख आढळतात. विक्रम संवत १५३५मधील वैशाख शुक्ल पंचमी ही त्यांची जन्मतिथी असल्याचे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्या तिथीनुसार येणारा दिवस १७ एप्रिल नाही. त्यामुळे नेमका खरा जन्मदिन कोणता, याबद्दल साशंकता आहे. अर्थात, त्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी होत नाही. त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

संत सूरदासांचा जन्म कुठे झाला

दिल्लीपासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या सीही नावाच्या खेड्यात गरीब, सारस्वत ब्राह्मण कुटुंबात सूरदासांचा जन्म झाला. ते जन्मांध होते; मात्र बालपणापासूनच ते गानविद्येत अत्यंत कुशल होते. त्यांना ज्योतिषविद्या अवगत होती व त्यावर त्यांनी काही काळ उपजीविकाही केली; पण पुढे वैराग्य आल्याने हा मार्गही त्यांनी सोडून दिला. कालांतराने यमुनाकाठी गौघाट येथे कुटी बांधून संत सूरदास यांनी अध्यात्मसाधनेला प्रारंभ केला. त्याच ठिकाणी पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य (१४७९–१५३१) यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. वल्लभाचार्यांनी त्यांना पुष्टिमार्गाची दीक्षा दिली व श्रीकृष्णभक्तीचा उपदेश केला. वल्लभाचार्यांनी त्यांना गोकूळ येथे नेले व कृष्णभक्तिपर पदे रचण्याची आज्ञा दिली.

Shani Gochar 2026: शनि करणार नक्षत्र परिवर्तन, या राशींच्या लोकांवर होणार सकारात्मक नकारात्मक परिणाम

साधारण १४९६ ते १५१० या काळात सूरदासांचे वास्तव्य गौघाट येथे व त्यानंतर गोवर्धन येथे होते. उर्वरित आयुष्य त्यांनी वृंदावनातील श्रीनाथजींच्या पूजाअर्चेत व भजन-कीर्तनात व्यतीत केले. श्रीनाथजी म्हणजे गोवर्धन पर्वतावर प्रकटलेल्या श्रीकृष्णाचे रूप. होय. सूरदासांनी श्रीकृष्णभक्तिपर सहस्रावधी पदे रचली. त्यात मुख्यतः कृष्णाच्या बाललीला व तारुण्यातील जीवन यांची वर्णने प्राधान्याने येतात. सूरदासांचे साधुत्व, गीतमाधुर्य व गानकौशल्य या गुणांनी सहस्रावधी कृष्णभक्तांना मंत्रमुग्ध केले. अकबर बादशहा व सूरदासाची भेट तानसेनाच्या मध्यस्थीने मथुरेत झाली, असा उल्लेख हरिरायने केला आहे.

सूरदासांचे प्रसिद्ध संग्रह

सूरदासांच्या स्फुट पदांचा संग्रह ‘सूरसागर’ या नावाने प्रसिद्ध आहे. भागवत पुराणाच्या आधारे रचलेल्या या ग्रंथात कृष्णाच्या लीलांचे गुणगान आहे. कृष्णजन्मापासून ते ब्रजभूमीतील क्रीडा, मथुरागमन, द्वारकेला प्रयाण व पुन्हा कुरुक्षेत्रात ब्रजवासी लोकांची भेट इथपर्यंतच्या सर्व घटनांचे साद्यन्त, क्रमवार वर्णन त्यात आहे. त्यांतील विविध रागांतील अनेक पदे फार लोकप्रिय झाली. तसेच त्यांतील ‘विनय पदे’ (प्रार्थनागीते) प्रसिद्ध आहेत. काही विद्वानांच्या मते ही पदे वल्लभाचार्यांकडून पुष्टिमार्गाची दीक्षा घेण्यापूर्वी सूरदासांनी रचली असावीत. तथापि या पदांतील प्रगल्भता, गांभीर्य, वैराग्याची ओढ इत्यादी वैशिष्ट्ये पाहता ती प्रौढ वयात रचली गेली असावीत, असेही एक मत आहे.

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला लोक सोनं खरेदी का करतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व

‘सूरसागर’मधील काव्यदृष्ट्या सर्वांत हृदयस्पर्शी भाग म्हणजे ‘भ्रमरगीत’ होय. कंसवधासाठी मथुरेला गेल्यानंतर श्रीकृष्णाने काळजीत पडलेल्या गोकुळवासीयांना आपले कुशल वर्तमान कळवण्यासाठी उद्धवाला तेथे धाडले. ज्ञानमार्गी उद्धव व प्रेमभक्तिमार्ग अनुसरणाऱ्या गोपी यांच्यातील पद्यसंवाद भ्रमरगीतात आहे. नाट्यात्मता, काव्यात्मता, सहजसुलभ शैली इत्यादी वैशिष्ट्ये त्यात उत्तमरीत्या प्रकटली आहेत. निर्गुण, निष्प्रेम अव्यक्त मार्गापेक्षा सगुण प्रेममय व्यक्त मार्गाची भक्ती सहजसाध्य व श्रेष्ठतम आहे, हा यातील संदेश आहे. मधुर व कोमल ब्रज भाषेत रचलेल्या या पदांमध्ये सूरदासांचा भक्तिभाव व तत्त्वचिंतन प्रभावीपणे प्रकटले आहे. सूरदासांच्या पदांमध्ये वात्सल्य व शृंगार या दोन रसांचा उत्कृष्ट समन्वय साधलेला आढळतो.

कृष्णभक्तिपर पदे रचणाऱ्या आठ भक्तकवींच्या कविसंप्रदायामध्ये सूरदास अग्रगण्य मानले जातात. श्रीकृष्ण हा सर्वश्रेष्ठ परमेश्वर असून त्याची भक्ती व अनुग्रह (पुष्टी) हाच मानवाच्या अंतिम कल्याणाचा श्रेष्ठतम मार्ग, हे या संप्रदायाचे तत्त्वज्ञान सूरदासांनी सोप्या गेय पदांतून मांडले. गोस्वामी विठ्ठलनाथांनी सूरदासांचा ‘पुष्टिमार्गाचे जहाज’ या शब्दांमध्ये गौरव केला. ‘सूरसागर’मध्ये काव्य व संगीत यांचा उत्तम मिलाफ साधला आहे. त्यांचे बहुश्रुत, अनुभवसंपन्न, विवेकशील, चिंतनशील, भक्तिभावपूर्ण व्यक्तिमत्त्व त्यांच्या काव्यातून प्रत्ययाला येते. सख्यभक्ती, वात्सल्यभक्ती, माधुर्यभक्ती, विनोदवृत्ती हे त्यांच्या काव्याचे विशेष मानले जातात. लौकिक व अलौकिक अशा उभयविध पातळ्यांवरील जीवनानुभूतींची प्रचीती त्यांच्या काव्यातून एकाच वेळी येते. त्यामुळेच सूरदासांना हिंदी साहित्यातील ‘सूर’ (सूर्य) म्हणून संबोधले जाते.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: संत सूरदास कोण होते

    Ans: संत सूरदास हे हिंदी साहित्यातील महान संतकवी आणि भगवान श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. ते भक्ती चळवळीतील अग्रगण्य कवी मानले जातात.

  • Que: सूरदासांचा अध्यात्मिक प्रवास कसा सुरू झाला?

    Ans: बालपणापासूनच त्यांना संगीत आणि भक्तीची आवड होती. पुढे त्यांनी संसार त्यागून भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत स्वतःला समर्पित केले.

  • Que: सूरदासांच्या काव्याची वैशिष्ट्ये काय आहेत?

    Ans: त्यांच्या काव्यात वात्सल्य, माधुर्य, सख्यभाव आणि भक्तीचा सुंदर संगम आढळतो. ब्रज भाषेतील गेय पदे ही त्यांची खास ओळख आहे.

Web Title: Sant surdas who was sant surdas know about his spiritual journey and devotion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
1

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
2

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश
3

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व
4

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.