Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santoshi Mata Vrat Katha: १६ शुक्रवारचे व्रत केल्याने या देवीचा मिळतो आशीर्वाद, काय आहे व्रताचे महत्त्व

शुक्रवारचा दिवस संतोषी देवीला समर्पित आहे. १६ शुक्रवारचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत श्रद्धेने पाळले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, हे व्रत मनोभावे केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात आणि सुख-समाधान प्राप्त होते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 03, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्रवारी करा देवी संतोषी मातेची पूजा
  • १६ शुक्रवारचे व्रत का करतात
  • १६ शुक्रवारचे व्रत करण्याचे महत्त्व
 

गुजरात, राजस्थान, उत्तर भारत आणि महाराष्ट्रामध्ये संतोषी मातेचे पूजन मोठ्या प्रमाणावर केले जाते, कारण ही देवी समाधान, शांतता आणि सुखाची देवता मानली जाते. संतोषी मातेची आराधना लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे.

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान गणपती आपल्या बहिणीकडून रक्षासूत्र बांधून घेत होते आणि भेटवस्तूची देवाणघेवाण सुरू होती. मग त्यांच्या मुलांनी गणेशजींना या विधीबद्दल विचारले. तेव्हा गणेश जी म्हणाले की हा धागा नाही तर रक्षासूत्र आशीर्वाद आणि भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक आहे. हे ऐकून शुभ-लाभ खूप उत्साही झाले आणि त्यांनी गणेशजींना सांगितले की त्यांनाही एक बहीण हवी आहे, जेणेकरुन त्यांनाही हा रक्षासूत्र कुणी बांधवा. शुभ-लाभची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान गणेशाने आपल्या शक्तींमधून एक ज्योत निर्माण केली आणि रिद्धि-सिद्धि या दोन्ही पत्नींच्या आत्म्यशक्तीच्या सामर्थ्याने त्याला एकत्र केलं. काही काळानंतर या ज्योतीने मुलीचे रूप घेतले, जिचे नाव संतोषी ठेवण्यात आले. तेव्हापासून ती मुलगी ‘संतोषी माता’ म्हणून ओळखली जाऊ लागली. संतोषी माता यांचा जन्म शुक्रवारी झाला असल्याने त्यांची पूजा आणि व्रत फक्त शुक्रवारीच केले जातात.

Ekvira Devi: एकविरा देवी कशी बनली कोळी बांधवांची कुलदैवत, जाणून घ्या पौराणिक कथा

१६ शुक्रवारचे व्रत

सलग १६ शुक्रवार संतोषी मातेचे व्रत करतात. अशी श्रद्धा आहे की, या व्रतामुळे दु:ख, दारिद्र्य नष्ट होते आणि घरात सुख-समृद्धी येते. संतोषी मातेला गणपतीची कन्या आणि महालक्ष्मीचे रूप मानले जाते. ती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ‘संतोष’ (समाधान) देणारी माता म्हणून पूजली जाते. भक्त आपल्या कुटुंबात शांती, मुलांचे आरोग्य आणि यशासाठी तिची पूजा करतात. संकटे दूर करण्यासाठी तिची आराधना केली जाते.

पूजा पद्धत

संतोषी मातेची पूजा पद्धत खूप साधी आहे. भक्तांनी गुळ आणि हरभरा यांचा प्रसाद अर्पण करून पूजा करावी, अशी प्रथा आहे. शुक्रवारी आवर्जून पूजा केली जाते.

Zodiac Sign: आदित्य मंगळ योगाचा मेष, कर्क आणि तूळ राशींसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

चित्रपटातून अधिक लोकप्रियता

१९७५ साली ‘जय संतोषी माँ’ प्रदर्शित झाले. एखादे चित्रपट श्रद्धाळू भक्तांच्या मनात भक्ती मोहर उमटवते याचे उत्तम उदाहरण आहे. यानंतर संपूर्ण देशभरात संतोषी मातेचे मंदिर उभारले गेले. सर्वत्र पूजाअर्चा सुरू झाली. तसेच या चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर, संतोषी माता लोकांच्या घराघरात पोहोचली, विशेषतः उत्तर भारत आणि गुजरातसारख्या प्रदेशात तिची भक्ती वाढली असे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर, भौतिक सुखासोबतच मानसिक शांती आणि कौटुंबिक सौख्यासाठी संतोषी मातेवर अपार श्रद्धा ठेवली जाते.

सर्वप्रथम संतोषी मातेची पूजा प्रामुख्याने राजस्थान (जोधपुर) मधील लाल सागर येथील प्राचीन मंदिरात होत होती. आता संपूर्ण भारतात शुक्रवारच्या दिवशी विशेष भक्तिभावाने केली जाते.

देवी संतोषीची विधिवत पूजा

शुक्रवारी, ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर, देवी संतोषीचे ध्यान करत व्रताचा संकल्प करा. यानंतर, देवघरात ज्या ठिकाणी पूजा करणार असाल त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून पाटावर लाल रंगाचे कापड पसरून देवी संतोषीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा. कलशाची स्थापना करत विधिवत पद्धतीने माता संतोषीची पूजा करा. त्यानंतर, माता संतोषीला फुले, हार, सिंदूर, अक्षता अर्पण करा. नैवेद्य म्हणून भिजवलेली हरभरा डाळ, गूळ आणि केळी देवीला अर्पण करा. तुपाचा दिवा, धूप जाळत माता संतोषींची व्रत कथा, चालीसा, मंत्र इत्यादींचे पठण करून शेवटी आरती करा. शेवटी सर्वांना प्रसाद वाटून कलशातील पाणी संपूर्ण घरात शिंपडा. संतोषी मातेची पूजा अर्चा नवरात्रीच्या दिवसांत केली जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: १६ शुक्रवारचे व्रत का केले जाते?

    Ans: मनोकामना पूर्ण व्हावी, घरात सुख-समृद्धी यावी आणि अडचणी दूर व्हाव्यात यासाठी हे व्रत केले जाते.

  • Que: या व्रताचे विशेष महत्त्व काय आहे?

    Ans: हे व्रत संयम, श्रद्धा आणि संतोष यांचा संदेश देते, तसेच जीवनात सकारात्मकता आण

  • Que: व्रत केल्याने कोणते फायदे मिळतात?

    Ans: आर्थिक समस्या कमी होणे, कौटुंबिक सुख वाढणे आणि मानसिक शांती मिळणे असे फायदे मानले जातात.

Web Title: Santoshi mata vrat 16 friday fast brings blessings of goddess importance of vrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Ramayan: मंदोदरीला पंचकन्यांमध्ये का मानले जाते? जाणून घ्या तिच्याशी संबंधित खास कथा
1

Ramayan: मंदोदरीला पंचकन्यांमध्ये का मानले जाते? जाणून घ्या तिच्याशी संबंधित खास कथा

Chanakya Niti: कधीही अपमान होणार नाही! आचार्य चाणक्यांच्या या गोष्टी ठेवा लक्षात
2

Chanakya Niti: कधीही अपमान होणार नाही! आचार्य चाणक्यांच्या या गोष्टी ठेवा लक्षात

4 Mukhi Rudraksha: विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांसाठी मानले जाते खास; जाणून घ्या चार मुखी रुद्राक्षाचे फायदे
3

4 Mukhi Rudraksha: विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांसाठी मानले जाते खास; जाणून घ्या चार मुखी रुद्राक्षाचे फायदे

Palmistry: तळहातावर या रेषा असल्यास मिळू शकते वक्तृत्व आणि लेखनात अपेक्षित यश
4

Palmistry: तळहातावर या रेषा असल्यास मिळू शकते वक्तृत्व आणि लेखनात अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.