Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Dev Puja Rules: शनिदेवांच्या पत्नीचा ‘हा’ श्राप नेमका काय? घरी पूजा करण्याआधी जाणून घ्या धार्मिक मान्यता

Shani Dev Puja Rules: शनी देवाची पूजा करताना काही धार्मिक नियम पाळले जातात, अशी मान्यता आहे. लेखानुसार, शनी देवाची मूर्ती घरात ठेवू नये आणि त्यांची पूजा मंदिरात करावी, असे सांगितले जाते. यामागे शनी देवांच्या पत्नीने दिलेल्या शापाची पौराणिक कथा जोडली जाते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 03, 2026 | 01:14 PM
Shani Dev Puja Rules (फोटो- सोशलमीडिया)

Shani Dev Puja Rules (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • धार्मिक मान्यतेनुसार शनी देवाची मूर्ती घरात न ठेवता मंदिरात पूजा करण्याची परंपरा सांगितली आहे.
  • यामागे शनी देवांच्या पत्नीच्या शापाशी संबंधित पौराणिक कथा जोडली जाते.
  • शनिवारी मंदिरात अभिषेक, तेलाचा दिवा, काळे तीळ अर्पण आणि शनी मंत्राचा जप करण्याचा उल्लेख आहे.
 

शनी देवाचं नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या मनात धडकी भरते. कारण शनी देव हा सगळ्यात कठोर देव मानला जातो. तो न्यायाचा देवता आहे. माणसाच्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब करून तो फळ देतो, असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे शनी देवाची पूजा करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्याचे नियम पाळावे लागतात. यातला सगळ्यात मोठा नियम म्हणजे शनी देवाची पूजा कधीच घरात करू नये. त्याची मूर्ती घरात ठेवू नये. पण असं का? यामागे काय कारण आहे? चला जाणून घेऊया. Shani Dev Puja Rules:

पूजा फक्त भक्तीने नाही तर नियमाने सुद्धा करावी लागते

हिंदू धर्मात प्रत्येक देवाची पूजा करण्याची एक वेगळी पद्धत आहे. फक्त भक्ती असून चालत नाही, त्याचे नियम पण पाळावे लागतात. नियमाने केलेली पूजा फळ देते, पण नियम तोडले तर त्याचे वाईट परिणाम पण भोगावे लागू शकतात, अशी मान्यता आहे. म्हणूनच जर तुम्ही शनी जयंतीला किंवा शनिवारी शनी देवाची पूजा करणार असाल तर आधी हा नियम समजून घ्या की त्याची पूजा घरात का करत नाहीत.

पत्नीने दिलेला शाप कारण आहे का?

यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. कथेनुसार शनी देवाला त्यांच्या पत्नीने शाप दिला होता. शाप असा होता की शनी देव ज्याच्याकडे बघतील त्याचे वाईट होईल. त्यांची दृष्टी खूप कठोर आहे, ती ज्याच्यावर पडेल त्याला त्रास भोगावा लागेल.

जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा आपण देवाच्या डोळ्यात बघतो, मूर्तीकडे बघतो. जर घरात शनी देवाची मूर्ती असेल आणि आपण रोज त्यांच्याकडे बघत असू तर त्यांच्या त्या शापित नजरेमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते असं मानलं जातं.

Shani Sade Sati: शनिची साडेसाती सुरू झाली? शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी करा ‘लाल किताब’ उपाय

घरात जर नकारात्मक ऊर्जा आली तर घरातली शांतता जाते. भांडणं होतात. आनंद निघून जातो. घरातल्या लोकांच्या कामात अडथळे येतात. पैशाची चणचण भासते. याच कारणामुळे शनी देवाची मूर्ती घरात ठेवू नये असं सांगितलं जातं. त्याऐवजी शनी मंदिरात जाऊन त्याची पूजा करणं जास्त शुभ मानलं जातं. शनिवारी लोक मंदिरात जाऊनच पूजा करतात.

शनी देवाची पूजा कशी करावी?

शनी जयंतीच्या दिवशी किंवा शनिवारी पूजा करायची असेल तर सकाळी लवकर उठा. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.त्यानंतर मंदिरात जा.शनी देवाला पंचामृताने किंवा पंचगव्याने अभिषेक घाला. त्यांच्या मूर्तीला कुंकू आणि काजळ लावा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. धूप लावा. शनी देवाला काळी फुले आणि तेलापासून बनवलेले गोड पदार्थ अर्पण करणं शुभ मानलं जातं. काळे तीळ पण अर्पण करतात.

त्यानंतर मनापासून शनी देवाच्या मंत्रांचा जप करा. ‘ओम शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करा. शनी चालीसा वाचा. आणि शेवटी आरती करा.पूजा करताना काही चूक झाली असेल तर शनी देवाकडे क्षमा मागा. कारण शनी देव हा माफ करणारा पण आहे, फक्त तुमचे कर्म चांगले असले पाहिजेत.

Shani Mahadasha: शनिची महादशा शुभ की अशुभ, कसा जाणवतो शनिच्या महादशेचा परिणाम

लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट

शनी देवाला घाबरण्याची गरज नाही. तो फक्त वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा देतो. जर तुमचे कर्म चांगले असतील, तुम्ही कोणाचे वाईट करत नसाल तर शनी देव तुमचं कधीच वाईट करणार नाही. तो उलट तुम्हाला चांगलं फळ देईल.म्हणून घरात त्याची मूर्ती ठेवण्याऐवजी मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घ्या. आणि नेहमी चांगलं वागा, हाच शनी देवाला प्रसन्न करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे.

Web Title: Shani dev puja rules idol at home religious beliefs rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Astrology shani deva
  • hindu religion
  • Religion
  • religion news

संबंधित बातम्या

Pitru Paksha 2026: मृत्यूनंतर नाही, तर जिवंतपणीच पिंडदान! ‘या’ मंदिरातील ३ दिवसांची परंपरा नेमकी काय?
1

Pitru Paksha 2026: मृत्यूनंतर नाही, तर जिवंतपणीच पिंडदान! ‘या’ मंदिरातील ३ दिवसांची परंपरा नेमकी काय?

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
2

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

jitiya vrat: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पाळले जाते जितिया व्रत, जाणून घ्या मुहूर्त पूजा पद्धत, साहित्य
3

jitiya vrat: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पाळले जाते जितिया व्रत, जाणून घ्या मुहूर्त पूजा पद्धत, साहित्य

Pitru Paksha: श्राद्धाच्या ताटात भोपळ्याची भाजी का असते? जाणून घ्या पितृपक्षातील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा
4

Pitru Paksha: श्राद्धाच्या ताटात भोपळ्याची भाजी का असते? जाणून घ्या पितृपक्षातील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.