Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shoola Yoga: शूल योग तयार होत असल्याने या दिवशी चुकूनही करु नका ही काम, जाणून घ्या शनिवारचे उपाय

आज शनिवार, 19 जुलै रोजी शूल योग तयार होत आहे. ज्यातिषशास्त्रात या योगाला अशुभ मानले जाते. या योगामध्ये काही कामे करणे निषिद्ध मानली जातात. शूल योगाचा अशुभ परिणाम कसा होतो, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 19, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज शनिवार, 19 जुलै रोजी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी येत आहे. या दिवशी भरणी नक्षत्र असल्याने शूल योग तयार होत आहे. या योगाला ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानले जाते. यावेळी शुभ कार्य करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. दरम्यान ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आलेले आहे.

पंचांगानुसार, या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होऊन 12.55 वाजेपर्यंत राहील आणि राहुकाल सकाळी 09.01 वाजता सुरू होऊन 10.44 वाजेपर्यंत राहील.

काय आहे शूल योग

ज्योतिषशास्त्रामध्ये या योगाला अशुभ योग मानले जाते. ज्यामध्ये सातही ग्रह तीन राशींमध्ये स्थित असतात. या योगात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे कारण त्यामुळे जातकाला त्रास होऊ शकतो.

Samudrik Shastra: पायाच्या खालच्या भागावर तीळ असणाऱ्या लोकांचे कसे असते व्यक्तिमत्व

समस्या उद्भवणे

शूल म्हणजे ‘भेदक शस्त्र’. या योगात केलेली कोणतीही कृती, जरी यशस्वी झाली तरी, ती त्या व्यक्तीच्या जीवनात दीर्घकालीन दुःख निर्माण करू शकते.

शूल योगाचे दुष्परिणाम कसे दूर करावे

शूल योगाचा स्वामी राहू असल्याने भगवान शिव राहूचे वाईट परिणाम कमी करण्यास मदत करतात. मान्यतेनुसार भगवान शिवाची नियमित पूजा केल्याने शूल योगाचे वाईट परिणाम कमी करण्यास मदत होते. हे प्रभाव कमी करण्यासाठी दररोज भगवान शिवाला पाणी अर्पण करुन महामृत्युंजय मंत्रांचा जप करावा. तसेच महादेवाना बेलाच्या पानांचा नैवेद्य दाखवल्याने ते प्रसन्न होतात. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म अशुभ योगामध्ये झाला असल्यास अशा लोकांनी शूलयोग शांती पूजा करावी.

Shravan 2025: श्रावणात मांसाहार करणे अशुभ आहे का? यामुळे लागतं पाप, काय आहे धार्मिक कारण

शनिच्या क्रोधापासून होते मुक्तता

शनिवारचे व्रत केल्याने शनिच्या साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी हे व्रत केले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या व्रताची सुरुवात करण्याला विशेष महत्त्व आहे. याशिवाय, शुक्ल पक्षाच्या कोणत्याही शनिवारी हे व्रत सुरू करता येते. असे मानले जाते की, सलग 7 शनिवार हे उपाय केल्याने शनिच्या कोपापासून मुक्तता होऊन व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

हे करा उपाय

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी ब्रम्ह मुहूर्तावर उठून आंघोळ झाल्यानंतर शनि देवाची पूजा करावी. त्यानंतर शनिदेवाची मूर्ती किंवा शनियंत्र ठेवा आणि शं शैश्चराय नम:, सूर्य पुत्राय नम: यासारख्या शनि मंत्रांचा जप करा. तसेच शनिवारी शनिदेवाची पूजा करताना काळी उडीद डाळ खिचडी अर्पण करुन आरती करावी. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात, असे मानले जाते. 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shoola yoga do not do this work by mistake on this day this is a remedy for saturday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Garuda Purana: गरुड पुराणातील यमलोक आणि नरकाची कथा काय सांगते? जाणून घ्या या ग्रंथाचे महत्त्व
1

Garuda Purana: गरुड पुराणातील यमलोक आणि नरकाची कथा काय सांगते? जाणून घ्या या ग्रंथाचे महत्त्व

Shivlilamrut: शिवलीलामृतच्या १३व्या अध्यायातील दक्षयज्ञापासून शिव-पार्वती विवाहापर्यंतची संपूर्ण कथा जाणून घ्या
2

Shivlilamrut: शिवलीलामृतच्या १३व्या अध्यायातील दक्षयज्ञापासून शिव-पार्वती विवाहापर्यंतची संपूर्ण कथा जाणून घ्या

Budhaditya Yoga: श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तयार होत आहे बुधादित्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार सुख-संपत्तीचा लाभ
3

Budhaditya Yoga: श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तयार होत आहे बुधादित्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार सुख-संपत्तीचा लाभ

Solar Eclipse: अमावस्या-पौर्णिमेलाच का लागते ग्रहण? जाणून घ्या यामागचं खगोलशास्त्रीय कारण
4

Solar Eclipse: अमावस्या-पौर्णिमेलाच का लागते ग्रहण? जाणून घ्या यामागचं खगोलशास्त्रीय कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.