फोटो सौजन्य- istock
सामुद्रिकशास्त्राच्या मान्यतेनुसार ज्या लोकांच्या पायाच्या खालच्या भागावर तीळ असतात ते लोक खूप मेहनती असतात. असे लोक स्वभावाने खूप संयमी मानले जाताता. पायाच्या खालच्या भागावर तीळ असणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्व जाणून घ्या
शरीरावरील विविध भागांवर असलेल्या तिळाच्या आधारे व्यक्तीच्या भविष्याची संबंधित असलेली चिन्हे सांगता येतात. सामुद्रिकशास्त्रात असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीच्या पायाच्या खालच्या बाजूला तीळ असतो ती व्यक्ती खूप मेहनती असते आणि तिच्या मुळांशी जोडलेली असते. त्याचसोबत अशी लोक स्वभावाने संयमी देखील असतात. असे लोक त्यांच्या भावना शक्यतो इतरांसोबत शेअर करत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे विचार कधीही कोणालाही स्पष्टपणे सांगत नाही. पायाच्या खालच्या भागावर तीळ असणाऱ्या लोकांचा कसा असतो स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घ्या
ज्या लोकांच्या पायाच्या खालच्या भागाला तीळ असते अशा लोकांना एकट्यात वेळ घालवणे जास्त आवडते. हे लोक आत्म-विश्लेषणात्मक असतात. असे लोक कामामध्ये वारंवार विश्लेषण करतात की तुम्ही कोणत्या कामामध्ये काय चांगले केले आहे आणि कोणते क्षेत्र अधिक चांगले करता आले असते. त्याचसोबत कधी कधी अति विचार केल्यामुळे चिंता देखील निर्माण होऊ शकते. दरम्यान, अशा लोकांमध्ये खूप विश्वासार्ह आणि वचनबद्ध भागीदार असतात. अशा लोकांच्या नातेसंबंधामध्ये नेहमी स्थिरता आणि सुरक्षिततेला अधिक महत्त्व असते.
असे मानले जाते की, ज्या लोकांच्या पायाच्या खालच्या भागात तीळ असतात त्यांना सामान्य ज्ञानाची चांगली समज असते. असे लोक कोणत्याही समस्येवर पटकन उपाय शोधतात. तसेच ते स्वभावाने खूप साधे असतात. अशा लोकांमध्ये कोणतीही गोष्ट साध्य करण्याची फारशी इच्छा नसते. हे लोक त्यांच्या पातळीपेक्षा नेहमी वर जातात.
मात्र ज्यांच्या पायाच्या खालच्या भागात तीळ आहेत अशा लोकांनी आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. कारण अशा लोकांना जीवनामध्ये पायांच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. त्यांना पायांमध्ये अनेक वेदना होऊ शकतात.
जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या पायाच्या वरच्या भागात किंवा उजव्या मांडीवर तीळ असणे म्हणजे ती व्यक्ती खूप कामुक आहे. असे लोक खूप आकर्षक मानले जातात. अशा लोकांना इतरांशी बोलायला खूप आवडते. असे लोक पहिल्या ओळखीतच समोरच्या व्यक्तीला आकर्षित करुन घेतात. या लोकांना फिरायला खूप आवडते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)