Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2026: 13 ऑगस्टपासून सुरू होतो श्रावण; 4 सोमवारांचे धार्मिक महत्त्व आणि शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा

भगवान शंकराला अर्पित महिना म्हणजे श्रावण! या महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना महादेवांना समर्पित आहे. या महिन्यात भक्त सोमवारी उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा आराधना करतात. हा पवित्र श्रावण महिना कधी सुरू होत आहे आणि किती सोमवार येत आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 06, 2026 | 01:10 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे श्रावण
  • श्रावणातील 4 सोमवारचे धार्मिक महत्त्व
  • श्रावणातील सोमवारी शिवमूठ अर्पण करण्याची काय आहे परंपरा
 

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा श्रावण महिन्याची सुरुवात गुरुवार, दि. 13 ऑगस्टपासून होत आहे आणि हा महिना 11 सप्टेंबर रोजी संपणार आहे. धार्मिक ग्रंथांच्या मते, श्रावणात भगवान शंकर पृथ्वीवर निवास करतात आणि आपल्या भक्तांच्या सगळ्या समस्या दूर करतात. श्रावण महिन्यातला पहिला दिवस खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे या दिवशी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी व जलाभिषेकासाठी मंदिरात खूप मोठ्या रांगा लागतात.

असे मानले जाते की, या महिन्यात भगवान शिवाने देवी पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. शिव पार्वतीचा विवाह याच महिन्यात संपन्न झाल्याने हा महिना शिव भक्तांसाठी व महादेवाच्या पूजा आराधनेसाठी देखील विशेष महत्त्वाचा मानला जातो. भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने 108 वर्षे कठोर तपस्या केली होती. त्यामुळे हा महिना महादेवांना खूप प्रिय असल्याचे मानले जाते.

कधी सुरू होत आहे श्रावण महिना

हिंदू पंचांगानुसार यंदा गुरुवार, 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि 11 सप्टेंबर रोजी श्रावण महिना संपणार आहे. श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेतील दुसरा महिना मानला जातो. या महिन्यात सोमवारचे व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारला देखील महत्त्वाचे मानले जाते.

Shravan 2026: श्रावण महिना दोनदा का येतो? जाणून घ्या उत्पत्ती, धार्मिक महत्त्व आणि शास्त्रीय कारण

श्रावण महिन्यात किती सोमवार येत आहे

यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 श्रावण सोमवार येत आहेत.

पहिला सोमवार – 17 ऑगस्ट

दुसरा सोमवार – 24 ऑगस्ट

तिसरा सोमवार – 31 ऑगस्ट

चौथा सोमवार – 7 सप्टेंबर

श्रावणातील सोमवाराचे धार्मिक महत्त्व

श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान शिवाला समर्पित मानला जातो. या दिवशी उपवास करून शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतूरा, भस्म आणि फुले अर्पण केली जातात. श्रद्धेनुसार या दिवशी शिवपूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, वैवाहिक सुख लाभते, आरोग्य उत्तम राहते आणि जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते.

श्रावणातील सोमवारचे अध्यात्मिक महत्त्व

श्रावण महिना हा भक्ती, संयम आणि साधनेचा काळ मानला जातो. या महिन्यात केलेली शिवभक्ती मनःशांती, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी लाभदायक मानली जाते. शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा अन्नधान्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि समाजात दानधर्माची भावना वाढवण्याचा संदेश देते.

Mangla gauri vrat 2026: पतीच्या दीर्घायुष्यासाठी जाणून घ्या ‘या’ 6 महत्त्वाच्या गोष्टी

श्रावणात शिवमूठ वाहण्याची काय आहे परंपरा

महाराष्ट्रात श्रावण सोमवारी भगवान शिवाला विविध धान्यांची ‘शिवमूठ’ अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा समृद्धी, अन्नधान्याची भरभराट आणि कुटुंबाच्या कल्याणाशी जोडली जाते. प्रदेशानुसार आणि कौटुंबिक परंपरेनुसार शिवमूठमध्ये थोडा फरक असू शकतो.

पहिला सोमवार – तांदूळ

दुसरा सोमवार – तीळ

तिसरा सोमवार – मूग

चौथा सोमवार – जवस किंवा गहू

शिवमूठ अर्पण करताना काय करावे?

सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.

शिवलिंगावर जलाभिषेक आणि आवश्यक असल्यास पंचामृत अभिषेक करावा.

बेलपत्र, पांढरी फुले आणि धूप-दीप अर्पण करावेत.

सोमवारची शिवमूठ भक्तिभावाने अर्पण करावी.

“ॐ नमः शिवाय” मंत्राचा जप करून आरती करावी.

शक्य असल्यास गरजूंना अन्नदान किंवा धान्यदान करावे.

श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराची आराधना अत्यंत भक्तिभावाने व व्रत घेऊन केल्यास भगवान शिवशंकराचे आशीर्वाद प्राप्त होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: श्रावण महिना कधी सुरू होत आहे

    Ans: श्रावण महिना गुरुवार, 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे

  • Que: श्रावणातील सोमवारांचे महत्त्व काय आहे?

    Ans: श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान शिवाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी व्रत, अभिषेक आणि शिवपूजा केल्यास पुण्यप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: शिवमूठ म्हणजे काय?

    Ans: शिवमूठ म्हणजे भगवान शिवाला विशिष्ट धान्य अर्पण करण्याची पारंपरिक पद्धत. महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची प्रथा आहे.

Web Title: Shravan 2026 religious significance of the 4 mondays in shravan the tradition of offering shiva amulets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Guru Charitra: श्री गुरुचरित्रात एकूण किती अध्याय आहेत? जाणून घ्या ग्रंथाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये
1

Guru Charitra: श्री गुरुचरित्रात एकूण किती अध्याय आहेत? जाणून घ्या ग्रंथाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये

Shravan Special: श्रावणासाठी हिरव्या बांगड्यांच्या आकर्षक डिझाईन्स! हातांच्या सौंदर्यात पडेल भर
2

Shravan Special: श्रावणासाठी हिरव्या बांगड्यांच्या आकर्षक डिझाईन्स! हातांच्या सौंदर्यात पडेल भर

Sai Baba Story: दातोबांच्या दुःखामागील कारण काय होते? जाणून घ्या साईबाबांची प्रेरणादायी कथा
3

Sai Baba Story: दातोबांच्या दुःखामागील कारण काय होते? जाणून घ्या साईबाबांची प्रेरणादायी कथा

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र चंद्राच्या नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा
4

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र चंद्राच्या नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.