Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीरामांचे जीवन घडवणारे दोन महान गुरु : महर्षी वसिष्ठ आणि विश्वामित्र, जीवनातील दोन तेजस्वी आधारस्तंभ

प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनात अनेक ऋषी-मुनी, संत आणि विद्वानांचे मार्गदर्शन लाभले. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारे आणि त्यांना आदर्श बनवणारे दोन मुख्य गुरु म्हणजे महर्षी वसिष्ठ आणि महर्षी विश्वामित्र.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 10, 2026 | 10:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • श्रीरामांचे जीवन घडवणारे दोन महान गुरु
  • महर्षी वसिष्ठ आणि विश्वामित्र
 

महर्षी वसिष्ठ, श्रीरामांचे प्रथम गुरु

महर्षी वसिष्ठ हे इक्ष्वाकू वंशाचे कुलगुरु होते. अयोध्येच्या राजघराण्याचे आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून त्यांना अत्यंत मान होता. राजा दशरथ यांच्यासह संपूर्ण राजपरिवार त्यांचा आदर करत असे. श्रीरामांच्या बालपणातील शिक्षणाची जबाबदारी महर्षी वसिष्ठ यांच्याकडे होती.

वसिष्ठांनी दिलेले शिक्षण

वेद आणि उपनिषदांचे अध्ययन, धर्मशास्त्र आणि राजधर्म, सत्य, संयम आणि करुणा, समाजव्यवस्था आणि न्यायनीती, गुरुभक्ती व मातापित्यांचा आदर प्रजेप्रती कर्तव्यभावना अशी अंतर्गत जीवन पुष्प सुगंधीत करण्यास शिक्षण दिले. त्यामुळे श्रीराम रामराज्य उभे करू शकले. तसेच श्रीरामांच्या स्वभावातील शांतता, नम्रता, आज्ञाधारकपणा आणि धर्मनिष्ठा ही वसिष्ठांच्या संस्कारांचीच देण होती.

महर्षी वसिष्ठांनी श्रीरामांना शिकवले की राजा हा केवळ सत्ताधारी नसतो, तर तो प्रजेचा पालक असतो. त्यामुळे श्रीराम पुढे “मर्यादा पुरुषोत्तम” म्हणून ओळखले गेले. वनवास स्वीकारताना, पित्याची आज्ञा पाळताना किंवा प्रजेसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करताना श्रीरामांनी वसिष्ठांच्या शिकवणीचे पालन केले.

Shani Nakshatra Parivartan: शनि जयंतीनंतर शनि बदलणार आपले नक्षत्र, मीन राशींसह या राशींच्या लोकांनी राहावे सावध

दुसरे गुरू महर्षी विश्वामित्र, श्रीरामांचे युद्धगुरु

महर्षी विश्वामित्र हे पूर्वी पराक्रमी राजा होते. नंतर त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मर्षी पद प्राप्त केले. ते महान तपस्वी, विद्वान आणि दिव्य अस्त्रांचे ज्ञाता होते. जेव्हा राक्षस यज्ञांमध्ये विघ्ने आणत होते, तेव्हा विश्वामित्रांनी राजा दशरथांकडे जाऊन श्रीराम आणि लक्ष्मण यांना आपल्या सोबत पाठवण्याची विनंती केली. सुरुवातीला दशरथ घाबरले, परंतु महर्षी वसिष्ठांनी त्यांना समजावले की विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली रामांचे महान कार्य घडेल.

विश्वामित्रांनी दिलेले शिक्षण

महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामांना धनुर्विद्या, युद्धकला दिव्य अस्त्र-शस्त्रांचे ज्ञान, संकटांशी सामना करण्याचे धैर्य
अधर्माविरुद्ध लढण्याची प्रेरणा हे सर्व शिक्षक दिले. त्यांनी श्रीरामांना अनेक दिव्य अस्त्रे प्रदान केली. यामुळे श्रीराम केवळ राजकुमार न राहता महान योद्धा बनले.

ताडका वध आणि राक्षसांचा नाश

विश्वामित्रांच्या आदेशाने श्रीरामांनी ताडका नावाच्या राक्षसीचा वध केला. त्यानंतर सुबाहूचा नाश केला आणि मारीचाला दूर पळवले. यामुळे ऋषींचे यज्ञ सुरक्षित झाले. यातून श्रीरामांनी शिकले की धर्मरक्षणासाठी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात.

सीता स्वयंवरातील भूमिका

महर्षी विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मणांना घेऊन मिथिलेला गेले. तेथे भगवान शिवांचे महान धनुष्य उचलून श्रीरामांनी ते मोडले आणि सीता यांच्याशी विवाह झाला. या घटनेमुळे श्रीरामांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. वसिष्ठांनी श्रीरामांच्या अंतःकरणाला घडवले, तर विश्वामित्रांनी त्यांच्या बाह्य सामर्थ्याला दिशा दिली.

Chandra Gochar: 10 मे रोजी चंद्र बदलणार आपली रास, मेष आणि कुंभ राशीसह या राशींच्या जीवनात होणार बदल

गुरु-शिष्य नात्याचा आदर्श

श्रीराम आपल्या गुरूंचा अत्यंत आदर करत. त्यांनी कधीही गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन केले नाही. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्रीरामांचे जीवन होय.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: महर्षी वसिष्ठ कोण होते?

    Ans: महर्षी वसिष्ठ हे इक्ष्वाकू वंशाचे राजगुरु आणि अत्यंत महान ऋषी मानले जातात. त्यांनी श्रीराम यांना धर्म, संयम आणि आदर्श जीवनाचे शिक्षण दिले.

  • Que: महर्षी वसिष्ठ हे इक्ष्वाकू वंशाचे राजगुरु आणि अत्यंत महान ऋषी मानले जातात. त्यांनी श्रीराम यांना धर्म, संयम आणि आदर्श जीवनाचे शिक्षण दिले.

    Ans: या दोन्ही गुरूंनी श्रीरामांचे व्यक्तिमत्त्व घडवले. वसिष्ठांनी आध्यात्मिक आणि नैतिक मूल्ये दिली, तर विश्वामित्रांनी पराक्रम आणि युद्धनीती शिकवली.

  • Que: श्रीराम आणि गुरु-शिष्य नाते आदर्श का मानले जाते?

    Ans: कारण श्रीराम नेहमी आपल्या गुरूंचा आदर करत आणि त्यांचे आदेश नम्रतेने पाळत असत.

Web Title: The two great gurus who shaped the life of shri ram were maharishi vasishtha and vishwamitra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी
1

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी

Pitru Paksha 2026: गणपती बाप्पांना निरोप देताच पितृपक्ष सुरू! कोणत्या दिवशी करायचं श्राद्ध? पाहा तिथीनुसार संपूर्ण यादी
2

Pitru Paksha 2026: गणपती बाप्पांना निरोप देताच पितृपक्ष सुरू! कोणत्या दिवशी करायचं श्राद्ध? पाहा तिथीनुसार संपूर्ण यादी

Vastu Shastra Married Daughter: माहेरून मुलीला वस्तू देताय? ‘या’ 5 गोष्टी देण्याआधी हे नक्की वाचा
3

Vastu Shastra Married Daughter: माहेरून मुलीला वस्तू देताय? ‘या’ 5 गोष्टी देण्याआधी हे नक्की वाचा

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
4

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.