Tulsi Vastu Tips: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
तुळशीसाठी वास्तू टिप्सः हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते, त्या घरात आनंद, शांती आणि सकारात्मकता नांदते. म्हणूनच लोक अंगणात, बाल्कनीत किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुळस लावणे पसंत करतात.आपल्या घरात तुळस नसेल असं घर शोधून पण सापडणार नाही. सकाळी उठल्यावर तुळशीला पाणी घालणं, संध्याकाळी दिवा लावणं, हे आपल्या घरातलं रोजचं काम आहे. तुळस असली की घरात कसं प्रसन्न वाटतं. पण हीच तुळस चुकीच्या जागी लावली तर फायदा होण्याऐवजी मनाला टोचणी लागून राहते. म्हणून तुळस कुठे लावायची, कोणत्या बाजूला लावायची, हे आधी समजून घ्या. Tulsi Vastu Tips:
बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की तुळशीचे रोप मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावावे की डाव्या बाजूला? वास्तूशास्त्रामध्ये यासंबंधी विशिष्ट नियम सांगितले आहेत.
वास्तूनुसार दाराच्या उजव्या बाजूला तुळस लावणं शुभ मानलं जातं. घरातून बाहेर जाताना उजवा हात ज्या बाजूला येईल, तिथे तुळस असावी. पण हे सगळं जागेवर अवलंबून असतं. काहींच्या दारात जागाच नसते. मग जबरदस्तीने तुळस दारातच कोंबायची नाही. जिथे तिला ऊन मिळेल, हवा मिळेल, आणि येण्या-जाण्याला अडचण होणार नाही, अशी जागा बघून लावावी. तुळशीला सारखं हलवावं लागू नये, म्हणून एकदा जागा ठरवली की तीच पक्की करा.
वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशा तुळशीचे रोप लावण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, ही दिशा देव-देवतांशी संबंधित आहे. पूर्व आणि उत्तर दिशेला तुळस लावणे देखील शुभ मानले जाते.
Sawan 2026 Vastu Tips: श्रावण महिन्यात लावा ‘ही’ ५ चमत्कारी झाडे; वास्तूनुसार वाढेल पैशांचा ओघ
ईशान्य कोपरा हा देवांचा कोपरा मानतात. तिथे तुळस लावली की घरात बरकत येते, असं म्हटलं जातं. जर ईशान्यला जागा नसेल तर पूर्वेला किंवा उत्तरेला लावली तरी चालते. या दिशांना ऊन पण चांगलं मिळतं आणि तुळस पण छान वाढते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दक्षिण दिशेला तुळस लावू नका. दक्षिण दिशा तुळशीसाठी चांगली मानली जात नाही. दाराजवळ जागा नसेल तर बाल्कनीत किंवा अंगणात ईशान्येला ठेवा, पण दक्षिणेला नको.
धार्मिक श्रद्धेनुसार, तुळशीच्या रोपाला योग्य जागा आणि आदर दिला पाहिजे. त्यामुळे, तुळशीचे रोप थेट जमिनीवर ठेवण्याऐवजी उंच स्टँड किंवा स्टूलवर ठेवणे उत्तम.बऱ्याच जणांची सवय असते, कुंडी थेट जमिनीवर ठेवायची. पण तुळस ही देवासारखी आहे. तिला जरा उंचावर ठेवावी. एखादा स्टँड घ्या, किंवा छोटं वृंदावन बनवा. त्यात तुळस ठेवली की ती दिसायला पण भारी दिसते आणि पाय पण लागत नाही. घर पण नीटनेटकं दिसतं.
वास्तूनुसार, तुळशीच्या रोपाभोवतीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. रोपाजवळ बूट, चपला, कचराकुंड्या किंवा इतर कचरा ठेवू नये.हा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुळशीजवळ चपला-बूट काढून ठेवणं, कचऱ्याची पिशवी ठेवणं, हे अजिबात करू नका. तुळशीभोवती नेहमी स्वच्छ ठेवा. वाळलेली पानं, फांद्या वेळच्या वेळी काढून टाका. तुळस सुकलेली दिसली की लगेच लक्ष द्या.
हिंदू धर्मात, सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची परंपरा आहे. कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते.संध्याकाळ झाली की तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला की घरात कसं शांत वाटतं. दिवा लावताना फक्त एक काळजी घ्या, दिवा पानांना किंवा वाळलेल्या फांद्यांना लागणार नाही. जरा लांब ठेवा, नाहीतर तुळस जळायची भीती असते.






