Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khandoba: खंडोबाला गोंधळ घालण्याची काय आहे परंपरा तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कारण

महाराष्ट्रातील लोकदेवता खंडोबा यांची पूजा अतिशय भक्तिभावाने केली जाते. जेजुरीच्या खंडोबावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. खंडोबाच्या पूजेमध्ये “गोंधळ” ही एक महत्त्वाची आणि पारंपरिक प्रथा मानली जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 05, 2026 | 09:32 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • खंडोबाला गोंधळ का घालतात
  • गोंधळ घालण्याची काय आहे परंपरा
  • गोंधळ का घालतात
 

महाराष्ट्रातील लोकदेवता खंडोबा यांची उपासना ही श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः जेजुरी येथे खंडोबाच्या भक्तांची अपार गर्दी पाहायला मिळते. या पूजेमध्ये “गोंधळ घालणे” ही एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि पौराणिक परंपरा आहे. खंडोबाला गोंधळ घालण्यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत.

खंडोबाच्या भक्तीत गोंधळ घालण्याची परंपरा अतिशय जुनी आणि भावपूर्ण आहे. खंडोबा हा भक्तांच्या नवसाला पावणारा देव मानला जातो आणि गोंधळ हा त्याच्या पूजेतील एक महत्त्वाचा विधी. हा गोंधळ का घातला जातो असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? गोंधळ घालण्यामागील कारण काय आहे ते जाणून घेऊया

नवस पूर्ण झाल्यावर गोंधळ घालण्याची परंपरा

नवस पूर्ण झाल्यावरती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा जेव्हा एखाद्या भक्ताची मनोकामना पूर्ण होते म्हणजेच लग्न, मुल, आरोग्य, व्यवसाय तेव्हा खंडोबाला केलेला नवस पूर्ण करण्यासाठी हा गोंधळ घातला जातो. हा देवाला धन्यवाद देण्याचा एक मार्ग आहे. गोंधळामध्ये भजन, गाणी, कथा आणि नृत्य यांचा समावेश असतो त्यामुळे देव प्रसन्न होतो आणि घरात सुख समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.

Khandoba: रविवारी खंडोबाची आराधना का करतात? जाणून घ्या धार्मिक …

खंडोबाच्या पराक्रमाच्या कथा आणि कृतज्ञता व्यक्त करणे

गोंधळामध्ये खंडोबाच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या जातात. जसे की, मणी आणि मल्ल राक्षसांचा वध त्यामुळे भक्तांना देवाची महती कळते आणि श्रद्धा वाढते. याशिवाय गोंधळ घालताना ढोल ताशे आणि मंत्र यांच्या आवाजामुळे वाईट शक्ती होरपळतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. गोंधळ घालणाऱ्यांना गोंधळी असं म्हणतात. हे विशेष कलाकार असून ते पारंपरिक वेशात गोंधळ घालतात. यात देवदेवतांची गाणी आणि कथा सादर केली जाते. तुणतुण, ढोल, झांज यांसारखी वाद्य गोंधळ घालताना वापरली जातात. खंडोबाला गोंधळ घालणे हा फक्त विधी नसून भक्ती, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर लोकपरंपरागत मार्ग आहे.

Khandoba: खंडोबाच्या दारी लंगर का मोडले जाते? काय आहे यामागील कारण …

गोंधळाचे धार्मिक महत्त्व

गोंधळ हा केवळ एक विधी नसून तो भक्त आणि देव यांच्यातील नाते अधिक दृढ करणारा एक माध्यम आहे. या माध्यमातून भक्तांना मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि श्रद्धेची अनुभूती मिळते. गोंधळ करताना मंत्र, वाद्यांचा नाद आणि भक्तीभाव यामुळे वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनते. अनेकांच्या श्रद्धेनुसार या विधीमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. तसेच भक्त आणि देव यांच्यातील नाते अधिक दृढ होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: खंडोबाला गोंधळ का घातला जातो?

    Ans: नवस पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी गोंधळ घातला जातो.

  • Que: गोंधळाचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: गोंधळामुळे देव प्रसन्न होतो, घरात सुख-समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: गोंधळाचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: भक्तीभावाने देवाची स्तुती करणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि आनंद साजरा करणे हा गोंधळाचा मुख्य उद्देश आहे.

Web Title: What is the tradition and reason for gondhal khandoba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Jejuri Khandoba Temple

संबंधित बातम्या

Shani Sade Sati: शनीच्या साडेसातीदरम्यान सोन्याचे दागिने घालणे शुभ की अशुभ, काय सांगते ज्योतिषशास्त्र
1

Shani Sade Sati: शनीच्या साडेसातीदरम्यान सोन्याचे दागिने घालणे शुभ की अशुभ, काय सांगते ज्योतिषशास्त्र

Sarva Pitru Amavasya: देशभरात अशी साजरी होते सर्वपित्री अमावस्या; जाणून घेऊया पितृस्मरणाच्या वेगवेगळ्या परंपरा
2

Sarva Pitru Amavasya: देशभरात अशी साजरी होते सर्वपित्री अमावस्या; जाणून घेऊया पितृस्मरणाच्या वेगवेगळ्या परंपरा

Sant Machhindranath: मच्छिंद्रनाथ कोण होते? नाथपंथाची पायाभरणी आणि गोरक्षनाथांशी असलेले गुरू-शिष्य नाते जाणून घ्या
3

Sant Machhindranath: मच्छिंद्रनाथ कोण होते? नाथपंथाची पायाभरणी आणि गोरक्षनाथांशी असलेले गुरू-शिष्य नाते जाणून घ्या

Zodiac Signs: पुढील दोन आठवडे या राशींचे चमकणार नशीब, धन आणि करिअरमध्ये मिळेल लाभ
4

Zodiac Signs: पुढील दोन आठवडे या राशींचे चमकणार नशीब, धन आणि करिअरमध्ये मिळेल लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.