Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kali Jogeshwari devi: काळी जोगेश्वरी देवी कोण आहे? काय आहे या देवीचा महिमा, जाणून घ्या

महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत आणि शक्ती उपासनेत काळी जोगेश्वरी देवीला अत्यंत जागृत आणि प्रभावशाली देवी मानले जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार ही देवी संकटांपासून संरक्षण करणारी, अन्यायाचा नाश करणारी आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आदिशक्तीचे रूप आहे. काळी जोगेश्वरी देवी कोण आहे आणि तिचा महिमा जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 29, 2026 | 09:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • काळी जोगेश्वरी देवी कोण आहे
  • काय आहे काळी जोगेश्वरी देवीचा महिमा
  • काळी जोगेश्वरी देवीचा काय आहे इतिहास
 

आदिशक्तीची विविध रूपे देशभरात वेगवेगळ्या नावांनी पूजली जातात. त्यापैकी एक प्रभावशाली आणि जागृत रूप म्हणजे काळी जोगेश्वरी देवी. पुण्याच्या जुन्या भागात बुधवार पेठ परिसरात या देवीचे मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. तसेच या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. काळी जोगेश्वरी देवी कोण आहे आणि तिचा महिमा जाणून घेऊया

काळी जोगेश्वरी देवी कोण आहे?

काळी जोगेश्वरी देवीला आदिशक्तीचे उग्र आणि शक्तिशाली रूप मानले जाते. “जोगेश्वरी” या नावाचा अर्थ योगिनींची ईश्वरी किंवा योगशक्तीची देवी असा केला जातो. अनेक ठिकाणी तिला माता पार्वती, दुर्गा आणि कालीमातेचे स्वरूप मानले जाते. देवीचे काळे रूप हे अज्ञान, भीती आणि नकारात्मक शक्तींवर विजय मिळवणारे मानले जाते.

Yedeshwari Devi: येडेश्वरी देवी मानली जाते शक्तीचे रुप, जाणून घ्या या देवीचा महिमा

पुण्याचे रक्षण करणारी देवी

काळी जोगेश्वरी देवी ही पुण्यातील प्राचीन आणि श्रद्धास्थान मानली जाणारी देवी आहे. पुण्याच्या जुन्या भागात बुधवार पेठ परिसरात हे मंदिर स्थित आहे. जोगेश्वरी देवीला शक्तीस्वरूप आणि पुण्याचे रक्षण करणारी देवी मानलं जातं. पुण्यातील ग्रामदैवतांच्या परंपरेत जोगेश्वरी देवीचं विशेष स्थान आहे. जोगेश्वरी आणि योगेश्वरी हे देवी दुर्गेचं रुप मानलं जातं आणि देवीचं जोगेश्वरी हे नाव तिच्या स्वरुपावरून आणि तिच्या उग्र शक्तीस्वरूपावरून पडल्याचं मानलं जातं.

देवीचे उग्र रूप

लोकश्रद्धेनुसार देवी भक्ताचं संकटांपासून रक्षण करते आणि त्यांना धीर देते. जोगेश्वरी देवी ही शंकराचे उग्र रूप असलेल्या कालभैरव यांची पत्नी मानली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात आणि जोगेश्वरीच्या देवळात काळभैरवाची मूर्ती देवीच्या मंदिरात असण्याचं हे एकमेव वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. काळी जोगेश्वरी मंदिराचा इतिहास खूप जुना मानला जातो.

काय आहे या देवीचा इतिहास

स्थानिक कथेनुसार, येथे देवीची पूजा केली जाते. अनेक राजघराण्यांनी आणि भक्तांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुण्यात जोगेश्वरी देवीची विविध मंदिरे आहेत त्यामध्ये तांबडी जोगेश्वरी विशेष प्रसिद्ध असली तरी काळी जोगेश्वरी मंदिराला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे. जुन्या कुळाच्या सीमा आणि ग्रामसंस्कृतीशी या देवतेचा संबंध असल्याचा इतिहासकार सांगतात. मंदिरात देवीची मूर्ती पारंपरिक पद्धतीने सजवली जाते.

Sheetala Devi Temple: केळवा बीचजवळ वसलेले शीतला देवी मंदिर, जाणून घ्या इतिहास आणि धार्मिक महत्त्व

नवरात्रोत्सवात विशेष उत्सव

मंगळवार, शुक्रवार आणि नवरात्रोत्सवाच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावरती भक्त दर्शनासाठी येतात. देवीला साडी, नारळ, फुल आणि ओटी अर्पण करण्याची येथे परंपरा आहे. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीला नवसही फेडतात. पुण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात काळी जोगेश्वरी देवीचं स्थानं महत्त्वाचं मानलं जातं. जुन्या कुळातील श्रद्धा, परंपरा आणि लोकविश्वास याचं एक जिवंत प्रतीक सुद्धा मानलं जातं.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जोगेश्वरी देवीचे नाव कसे पडले?

    Ans: देवीच्या उग्र आणि शक्तिशाली स्वरूपावरून “जोगेश्वरी” हे नाव पडल्याचे मानले जाते.

  • Que: देवीचा कालभैरवाशी काय संबंध आहे?

    Ans: लोकश्रद्धेनुसार जोगेश्वरी देवी ही कालभैरवाची पत्नी मानली जाते.

  • Que: मंदिराचे विशेष वैशिष्ट्य काय आहे?

    Ans: देवीच्या मंदिरात काळभैरवाची मूर्ती असणे हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे.

Web Title: Who is kali jogeshwari devi and what is her glory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व
1

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा
2

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव
3

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.