फोटो सौजन्य- chatgpt
येडेश्वरी देवी ही महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धास्थान असलेली देवी असून तिचं प्रसिद्ध मंदिर येडेश्वर देवी मंदिर हे धाराशिव जिल्ह्यातील येळशी परिसरात डोंगररांगामध्ये बसलेलं आहे. बालाघाट पर्वतरांगेत बसलेलं हे मंदिर हेमाडपंथी शैलीचं आहे. हे मंदिर शक्तीचं रूप मानलं जाते. येडेश्वरी देवी अनेकाचं कुलदैवत आहे. ही श्री तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून देखील ओळखली जाते. येडेश्वरी नावामागे देखील काही कथा सांगितल्या जातात. काही कथेनुसार देवीने राक्षसांचा नाश करण्यासाठी वेगळ आणि गूढ रुप धारण केलं होतं. तिच्या त्या अद्भुत आणि अनाकलनीय रुपामुळे लोकांनी तिला येडाई किंवा येडेश्वरी म्हणण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागात आजही लोक भक्त तिला प्रेमाने येडाई देवी असं संबोधतात. तर याचा संबंध रामायणाशी देखील आहे.
प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासात निघाले तेव्हा त्यांना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रुप धारण करून त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा रामाने पार्वतीला येडी (वेडी) आहेस असं म्हटलं तेव्हापासून देवी त्याचठिकाणी राहिली आणि येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवीसंदर्भात सांगितली जाते. येडेश्वरी देवीचे मंदिर निसर्गरम्य वातावरणात असून भक्तांना येथे शांत आणि आध्यात्मिक अनुभव येतो. मंदिर परिसर डोंगर, झाडे आणि नैसर्गिक सौदर्यांने वेढलेला असल्यामुळे धार्मिकतेसोबतच पर्यटनदृष्ट्याही हे स्थान फार महत्त्वाचं मानलं जातं.
चैत्र महिना आणि श्रावण पौर्णिमेला येथे विशेष यात्रा भरते. ज्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. श्रावणी पौर्णिमेला येडेश्वरी यात्रेत चुना रचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडतो. एरव्ही बारा महिने काळी भोर असलेल्या जमिनीत देवीची पालखी येताच चुलखडी प्रकट होते, अशी पूर्वीपासून येथील मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्यांच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्यान रंगवलं जातं.
या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या आंबील यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रीतही या देवीचा उत्सव पाहायला मिळतो. दसऱ्यापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येरमाळ लोक आणि इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात. नवरात्र उत्सवाच्या काळात येथे मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. या देवीला नारळ, फुले, साडी आणि ओटी अर्पण करण्याची परंपरा आहे. काही भक्त नवस बोलतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावरती देवीची भेट घेऊन तिची यथायोग्य पूजा करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: येडेश्वरी देवीला आदिशक्तीचे रूप मानले जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार देवी संकटांपासून रक्षण करते आणि मनोकामना पूर्ण करते.
Ans: येडेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील येडेश्वरी येथे स्थित आहे. हे ठिकाण भाविकांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते.
Ans: धार्मिक मान्यतेनुसार देवीच्या दर्शनाने मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते.






