Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025 : लक्ष्मीपूजन अमावस्येला का येतं? अमावस्या खरंच वाईट असते, जाणून घ्या समज आणि गैरसमज

लक्ष्मीपूजन अमावस्येलाच का केलं जातं, यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि खगोलशास्त्रीय कारणं आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 21, 2025 | 03:20 AM
Diwali 2025 : लक्ष्मीपूजन अमावस्येला का येतं? अमावस्या खरंच वाईट असते, जाणून घ्या समज आणि गैरसमज
Follow Us
Close
Follow Us:

 

हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि आनंददायी सण म्हणजे दिवाळी. या सणाचा सर्वात महत्त्वाचा दिवस तो म्हणजे लक्ष्मीपूजन. जो अमावस्येच्या रात्री साजरा केला जातो. पण नेमकं लक्ष्मीपूजन अमावस्येलाच का केलं जातं, यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि खगोलशास्त्रीय कारणं आहेत.

अमावस्या म्हणजे चंद्र नसलेली पूर्ण काळोखी रात्र. अंधाराचं प्रतीक म्हणजे तमोगुण. या दिवशी अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि दु:खावर सुखाचा विजय मिळवण्यासाठी लक्ष्मीदेवीचं पूजन केलं जातं. दिव्यांचा प्रकाश म्हणजे समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी घराघरांत दिवे लावले जातात आणि देवी लक्ष्मीचं स्वागत केलं जातं.

Diwali 2025: दिवाळीत या शुभ मुहूर्तावर करा लक्ष्मीपूजन, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, पूजा पद्धत

पौराणिक कथेनुसार, या दिवशी समुद्रमंथनातून लक्ष्मीदेवीची निर्मिती झाली. त्यामुळे अमावस्येच्या रात्री देवी पृथ्वीवर भ्रमण करते, असं मानलं जातं. अमावस्या म्हटली की प्रत्येक वेळी धडकी भरते मात्र अमावस्येकडे सकारात्मक पद्धीतीने कसं पहावं हे दिवाळीचा सण सांगतो. असं म्हणतात,  ज्या घरात स्वच्छता, शांती आणि प्रकाश असतो तिथं ती स्थायिक होते. म्हणून दिवाळीपूर्वी घराची स्वच्छता करून दिवे, तोरणं आणि फुलांनी सजावट करण्याची प्रथा आहे. ही झाली अध्यात्मिक बाजू. अमावस्येला लक्ष्मीपूजन असल्यामागे खगोलशास्त्रीय अभ्यास देखील आहे.

खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं, तर अमावस्येच्या रात्री वातावरणातील ऊर्जा स्थिर आणि शांत असते. त्या वेळेला ध्यान, जप आणि पूजन केल्यास त्याचा परिणाम अधिक सकारात्मक होतो. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी ही रात्र अत्यंत शुभ मानली जाते.
दिवाळी म्हणजे “अंधारावर प्रकाशाचा विजय”. लक्ष्मीपूजनाच्या रात्री आपण केवळ धनाची नव्हे तर ज्ञान, प्रेम, शांतता आणि समाधान या सर्व स्वरूपातील संपत्तीची आराधना करतो.म्हणूनच, अमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन केलं जातं, अंधारातून उजेडाकडे नेणारी रात्र म्हणजे दिवाळी अशी मान्यता आहे.

लक्ष्मीपूजन अमावस्येला का येतं?

हिंदू संस्कृतीत दिवाळी हा फक्त आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण नाही, तर तो आध्यात्मिक आणि ऊर्जेच्या शुद्धीकरणाचं प्रतीक आहे. या सणातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन, जो दरवर्षी कार्तिक अमावस्येच्या रात्री साजरा केला जातो. या दिवसाला देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते, असं मानलं जातं.

Diwali 2025: लक्ष्मीपुजनाला तुमच्या राशीनुसार करा लक्ष्मी मंत्रांचा जप, तुमच्या घरात होईल धनाचा वर्षाव

अमावस्या म्हणजे पूर्ण अंधाराची रात्र, ज्यात चंद्र नसतो. अंधार म्हणजे नकारात्मकता, आळस आणि अज्ञान याचं प्रतीक. या अंधारावर दिव्यांच्या प्रकाशाने विजय मिळवणे म्हणजेच दिवाळी साजरी करण्यामागचं तत्त्वज्ञान आहे. लक्ष्मी म्हणजे समृद्धी, संपत्ती आणि सकारात्मकतेचं प्रतीक. म्हणूनच लोक आपल्या घरांना स्वच्छ ठेवून, दिवे लावून देवीचं स्वागत करतात, जेणेकरून तिचं आगमन होईल आणि घरात आनंद, शांती, धन व यश नांदेल.लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त धनलाभ नव्हे, तर मनःशांती, कुटुंबातील एकता, आणि चांगल्या ऊर्जेचं आवाहन. अंधाऱ्या अमावस्येच्या रात्री जेव्हा घराघरात दिव्यांचा प्रकाश पसरतो, तेव्हा तो केवळ प्रकाश नसतो, तर समृद्धीचं, श्रद्धेचं आणि आशेचं प्रतीक असतो.म्हणूनच लक्ष्मीपूजन अमावस्येलाच केलं जातं.कारण त्या दिवशी आपण अंधारावर प्रकाशाचा, दु:खावर आनंदाचा आणि दारिद्र्यावर समृद्धीचा विजय साजरा करतो. अमावस्येला नकारात्मकपणे न पाहता त्याची चांगली बाजू देखील लक्षात घ्यायला पाहिजे.

Web Title: Why is lakshmi puja celebrated on amavasya amavasya is really bad know the myths and misconceptions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 03:20 AM

Topics:  

  • Diwali 2025
  • hindu religion

संबंधित बातम्या

Diwali 2025: DSLR नको, फोनच पुरेसा आहे! या टिप्स फॉलो करा आणि बना प्रो फोटोग्राफर
1

Diwali 2025: DSLR नको, फोनच पुरेसा आहे! या टिप्स फॉलो करा आणि बना प्रो फोटोग्राफर

Diwali 2025: काळानुसार बदलले रांगोळीचे स्वरूप; पारंपरिकतेपासून थेट…
2

Diwali 2025: काळानुसार बदलले रांगोळीचे स्वरूप; पारंपरिकतेपासून थेट…

Honda SP 125 की Bajaj Pulsar, Diwali 2025 मध्ये कोणती बाईक झाली सर्वात जास्त स्वस्त?
3

Honda SP 125 की Bajaj Pulsar, Diwali 2025 मध्ये कोणती बाईक झाली सर्वात जास्त स्वस्त?

Rahul Gandhi: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी साजरी केली खास दिवाळी; स्वतःच्या हाताने बनवले लाडू अन् जिलेबी
4

Rahul Gandhi: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी साजरी केली खास दिवाळी; स्वतःच्या हाताने बनवले लाडू अन् जिलेबी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.