फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Indira Gandhi Jayanti 2026: आज इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचा जयंती आहे. त्यांचा जन्म १९१७ मध्ये प्रयागराज येथे झाला आणि त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सुकन्या होत्या. त्यांनी देशाच्या विकासात आणि प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामध्ये १९७१ च्या युद्धानंतर पाकिस्तानचा पराभव करून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती ही त्यांच्या राजनैतिक कारकिर्दीतील ऐतिहासिक कामगिरी मानली जाते. हरितक्रांतीला प्रोत्साहन देऊन भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कणखर आणि धाडसी निर्णयांमुळे त्यांना ‘आयर्न लेडी’ (लोह महिला) म्हणून संबोधले जात असे. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या हत्येनंतर, देशाच्या राजकारणात आणि इतिहासात त्यांचे नाव कायमचे अमर झाले.






