Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Child Abuse Awareness part 2: घरातील हिंसा ठरतेय विकृतीचे मूळ; मुलांमधील ‘असंवेदनशीलता’ भविष्यासाठी धोक्याची घंटा

Child Abuse Awareness- पीडिताला दोष देण्याची संस्कृती (Victim Blaming Culture) मुलानेच काहीतरी केले असेल का? असा प्रश्न विचारल्यामुळे आरोपीला एक प्रकारचे 'संरक्षण' (Shield) मिळते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 11, 2026 | 10:06 AM
Child Psychology and Domestic Violence, Impact of Family Abuse on Children,

Child Psychology and Domestic Violence, Impact of Family Abuse on Children,

Follow Us
Close
Follow Us:
  • घरात होणारा अपमान आणि मारहाण यामुळे मुले इतरांच्या वेदनांबाबत असंवेदनशील होतात, परिणामी त्यांच्यातील ‘सहानुभूती’ (Empathy) कायमची नष्ट होऊ शकते.
  • लैंगिक शिक्षणाअभावी मुलांना स्वतःच्या शरीरावरील हक्क आणि सीमा (Boundaries) समजत नाहीत, ज्यामुळे शोषणाची शक्यता वाढते.
  • डार्क वेब आणि लैंगिक साहित्यामुळे विकृत कल्पनांना वास्तवात उतरवण्याची भीती निर्माण झाली आहे.
 

Interview
▶ अनुराधा धावडे। नवराष्ट्र पुणे, नसरापूर पठोपाठ महाराष्ट्रात विविध ठिकाणी घडलेल्या अशा बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर या घटना टाळण्यासाठी किंवा अशा प्रकारची कृत्य करणाऱ्या विकृतांपासून बचाव कसा करावा यासंदर्भात अॅड, सनी नाईक यांनी सविस्तर विवेचन केले. मानः शास्त्रीय दृष्टीकोन आणि यासंदर्भातील सविस्तर कायदेशीर माहिती त्यांनी या मुलाखतीत दिली.

प्रश्न: अशी प्रवृत्ती किंवा विकृतीच्या वाढीसाठी कोणते घटक कारणीभूत ठरू शकतात? असतील तर ते घटक कोणते ?

उत्तर: समाजातील विविध घटक या विकृतीला कारणीभूत ठरतात, ज्यामुळे बाललैंगिक शोषणासारखे गुन्हे घडतात.
पितृसत्ताक मानसिकता (Patriar-chal Mindset): समाजात ‘मालमत्ता’ असलेल्या पितृसत्ताक मानसिकतेमुळे मुलांच्या शरीराकडे (Property) म्हणून पाहिले जाते. यामुळे ‘संमती’ (Consent) ही संकल्पना लहान वयातच मोडीत निघते.

– लैंगिक शिक्षणाबाबतचा सामाजिक संकोच (Stigma Around Sex Education): लैंगिक शिक्षणाबद्दल असलेल्या नकारात्मकतेमुळे मुले ‘शारीरिक स्वायत्तता’ (Body Au-tonomy) शिकत नाहीत. परिणामी, ‘मर्यादांचे उल्लंघन’ (Boundary Violation) होत आहे हे त्यांना ओळखता येत नाही.

Child Abuse Awareness: बाललैंगिक अत्याचार, ‘पेडोफिलिक डिसऑर्डर’ आणि विकृतीची कारणे; आरोपींचे मानसशास्त्रीय पॅटर्न कसे ओळखाल?

-कुटुंबातील हिंसेचे उदात्तीकरण (Normalization of Violence in Family): घरातील मारहाण किंवा अपमान यांमुळे मुलांमध्ये ‘असंवेदनशीलतेचा’ (Desensitiza-tion) मार्ग मोकळा होतो आणि त्यांच्यातील ‘सहानुभूती’ (Empathy) नष्ट होते.

अनियंत्रित डिजिटल उपलब्धता (Unregulated Digital Ac-cess): ‘डार्क वेब’ (Dark Web) आणि ‘बाल लैंगिक शोषण साहित्य’ (CSAM) च्या सहज उपलब्धतेमुळे विकृत ‘कल्पनांचे’ (Fantasy) रूपांतर ‘वास्तवात’ (Reality) होते. – सामाजिक एकाकीपण आणि सामूहिक देखरेखीचा अभाव पूर्वीच्या ‘एकत्र कुटुंब’ (Joint Family) पद्धतीमध्ये असलेली ‘सामूहिक दक्षता’ (Collec-tive Vigilance) आता ‘विभक्त कुटुंब’ (Nuclear Family) पद्धतीत ‘वैयक्तिक गोपनीयतेच्या’ (Individ-ual Privacy) नावाखाली लोप पावली आहे.

– पीडिताला दोष देण्याची संस्कृती (Victim Blaming Culture) मुलानेच काहीतरी केले असेल का? असा प्रश्न विचारल्यामुळे आरोपीला एक प्रकारचे ‘संरक्षण’ (Shield) मिळते.

– तक्रार नोंदवण्यातील उदासीनता पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम २१ अंतर्गत शिक्षक किंवा डॉक्टरांनी तक्रार नोंदवणे अनिवार्य आहे, तरीही अनेकदा ती केली जात नाही. यामुळे ‘मौन संमती’ (Com plicity of Silence) निर्माण होते. आर्थिक विषमता (Economic Disparity): गरिबीमुळे मुले अधिक ‘असुरक्षित’ (Vulnerable) होतात आणि मानवी तस्करी (Traffick ing) व शोषणाला बळी पडतात.

NCRB Report 2024 Murders India: महाराष्ट्राचा ‘बिहार’ होतोय का? खुनाच्या घटनांत देशात ‘टॉप-३’मध्ये! NCRBची धक्कादायक आकडेवारी

पालकांनी आणि समाजाने घ्यावयाची महत्त्वाची खबरदारी

बाललैंगिक शोषणासारख्या घटना रोखण्यासाठी पालक आणि समाजाने ‘सक्रिय सतर्कता’ (Active Vigilance) बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील उपाययोजना महत्वाच्या ठरतात.

ओळखीच्या व्यक्तींकडून असलेला धोका ओळखणे पालकांनी केवळ ‘अनोळखी व्यक्तीपासूनचा धोका लक्षात न घेता, ‘विश्वासू व्यक्तीकडून’ असलेला धोका ओळखणे जास्त महत्त्वाचे आहे. पोक्सो (POCSO) कोर्टाच्या आकडेवारीनुसार, ९०% गुन्हे है ‘ओळखीच्या’ किंवा ‘कुटुंबातील सदस्यांकडूनच केले जातात.

मोकळ्या संवादाचे वातावरण घरामध्ये मुलांशी असा संवाद असावा की, मुले कोणत्याही ‘अस्वस्थ करणाऱ्या स्पर्शा बद्दल (Uncomfortable Touch) न घाबरता किंवा निः संकोचपणे बोलू शकतील.

वयानुसार शरीर शिक्षण मुलांना त्यांच्या वयानुसार शरीराचे ज्ञान देणे आवश्यक अहे, यामध्ये ‘खाजगी अवयव’ (Private Parts), ‘संमती’ (Consent) आणि ‘निषिद्ध स्पर्श क्षेत्रे’ (No-Touch Zones) याबद्दल स्पष्ट माहिती द्यावी.

डिजिटल देखरेख (Digital Monitor-ing) ‘ऑनलाइन ग्रूमिंग’ (Online Grooming) हा गुन्ह्याचा एक नवीन प्रकार समोर येत आहे. त्यामुळे मुलांचा ‘स्क्रीन वेळ’ (Screen Time). ‘ऑनलाइन सवाद’ आणि विशेषतः ‘गेमिम चैट रूम्स’वर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवावे.

तात्काळ हस्तक्षेप आणि रिपोर्टिंग समाजाने संशयास्पद वर्तन दिसताच ‘पोक्सो हेल्पलाइन १०९८’ वर त्वरित कळवावे, रिपोर्टिंगमध्ये केलेला ‘उशीर’ हा एका अर्थान गुन्ह्यातील ‘सहभाग’ (Complicity) मानला जाऊ शकतो.

सामूहिका जबाबदारी (Collective Responsibility) शाळा, शेजारपाजार आणि धार्मिक स्थळे यांसारख्या ठिकाणी मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘सामूहिक देखरेख (Community Surveil-lance) असणे गरजेचे आहे.

कलंक निवारण (De-stigmatiza tion): पीडित मुलाला किंवा मुलीला ‘लाज’ वाटेल असे वर्तन न करता त्यांना ‘सहाय्य व्यवस्था (Support System) पुरवावी, पोक्सो कायद्याच्या कलम ३३ नुसार पीडिताची ओळख गुप्त ठेवणे हे कायदेशीर बंधन आहे.

 

Web Title: Child abuse awareness part family violence erasing empathy in children adv sunny naik decodes the root of criminal mindsets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • Child Harassment
  • child trafficking
  • mental health

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.