NCRB Report 2024 Murders India: महाराष्ट्राचा 'बिहार' होतोय का? खुनाच्या घटनांत देशात 'टॉप-३'मध्ये! NCRBची धक्कादायक आकडेवारी
NCRB Report 2024 Murders India : देशातील खुनांच्या गुन्ह्यांबाबत उत्तरप्रदेश आणि बिहारनंतर महाराष्ट्राचा नंबर लागत असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. राज्यात २०२४ मध्ये तब्बल २ हजार १६८ खुनांच्या घटनांची नोंद झाली आहे. वेळीच या घटनांना न रोखल्यास महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नसल्याचे मत खासगीत अधिकारी व्यक्त करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून सलग उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर महाराष्ट्राचा क्रम लागत आहे. वाढत्या शहरीकरणासोबतच संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्ध, आर्थिक व्यवहारातून वाद तसेच संशय, कौटुंबिक कारणावरून खून होत असल्याचे दिसून आले आहे.
आईला शिवी दिल्याने तरुणाला आला राग; दगडाने ठेचून केली हत्या
देशभरात २०२४ मध्ये एकूण २६ हजार ३८३ खुनाचे गुन्हे दाखल ३ हजार २१८, बिहारमध्ये २ और ७८७, तर म हजार ७८७, तर महाराष्ट्रात २ हजार १६८ खुनांची नोंद झाली आहे.
राज्यातील महत्वाच्या मानत्या जाणाऱ्या तीन शहरांतील स्थितीही भयावह आहे. दिलासादायक म्हणायचे झाल्यास मुंबई व पुण्यातील घटनांमध्ये सलग तीन वर्षात घट झाली आहे. तर, सलग तीन वर्षात मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधील खूनामध्ये वाढ झाल्याचे एनसीआरबीने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट दिसत आहे.
देशातील महानगरांमध्ये खुनांच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र समोर आले आहे. नागपुरात खुनांव्या घटना वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. दिल्ली शहर ५०४ खुनांसह देशात पहिला क्रमांक आहे. त्यानंतर बंगळुरू, सुरत, मुंबई, चेन्नई, पाटणा आणि पुणे या शहरांचा क्रमांक लागत आहे, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्येचा वाढता दबाव आणि सामाजिक तणाव यामुळे स्थिती गंभीर बनत आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील खुनाच्या घटनांची आकडेवारी पाहता, राजधानी दिल्ली ५०४ घटनांसह या यादीत अव्वल स्थानी आहे, जी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यानंतर बंगळुरू (१७६) आणि सुरत (११४) या शहरांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दक्षिण भारतात चेन्नईत १०५, हैदराबादमध्ये ८९ तर कोची (१७) आणि कोझिकोड (११) सारख्या शहरांत हे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास, मुंबईत १०७, पुण्यात ९४ आणि नागपूरमध्ये ८८ खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. उत्तर आणि मध्य भारतातील शहरांमध्ये पटना (१०६), जयपूर (९९), लखनौ (९७), कानपूर (९३) आणि अहमदाबाद (९०) येथे गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असून कोलकाता (५७) आणि गाझियाबाद (५३) मध्ये हे प्रमाण काहीसे कमी असल्याचे दिसून येते. सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद कोझिकोड शहरात झाली आहे.






