Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: … आणि सावल्या झाल्या गायब ! पुणेकरांनी अनुभवला दुर्मिळ खगोलीय चमत्कार

वैज्ञानिकांच्या मते, ही घटना पृथ्वीचा झुकाव, सूर्याभोवतीची परिक्रमा आणि खगोलीय गणित समजून घेण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. विज्ञानप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांसाठीही हा दिवस विशेष आकर्षणाचा ठरला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 15, 2026 | 02:35 AM
Pune News: ... आणि सावल्या झाल्या गायब ! पुणेकरांनी अनुभवला दुर्मिळ खगोलीय चमत्कार

Pune News: ... आणि सावल्या झाल्या गायब ! पुणेकरांनी अनुभवला दुर्मिळ खगोलीय चमत्कार

Follow Us
Follow Us:

नागरिकांनी घेतला दुर्मीळ खगोलीय घटनेचा रोमांचक अनुभव
अनेकांनी हा अनोखा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात केला कैद
सावलीशिवाय दिसणारी छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल

सुनयना सोनवणे /पुणे: पुणे शहरातील नागरिकांनी बुधवारी (दि. १३) ‘शून्यसावली दिवस’ या दुर्मीळ खगोलीय घटनेचा रोमांचक अनुभव घेतला. दुपारच्या सुमारास काही मिनिटांसाठी सूर्य डोक्यावर अगदी लंबवत (Science) आल्याने उभ्या वस्तूंच्या सावल्या अक्षरशः गायब झाल्या. उन्हाचा प्रखर तडाखा असूनही जमिनीवर सावली दिसत नसल्याने अनेकांनी हा अनोखा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

खगोलशास्त्रानुसार, सूर्य जेव्हा आकाशात सर्वाधिक उंचीवर पोहोचतो आणि त्याची किरणे पृथ्वीवर ९० अंशांच्या कोनात पडतात, तेव्हा ‘शून्य सावली दिवस’अनुभवास येतो. या वेळी सूर्य नेमका डोक्यावर असल्याने व्यक्ती किंवा वस्तूची सावली तिच्याच खाली लपते आणि काही क्षणांसाठी ती दिसेनाशी होते. पुण्याचा अक्षांश सुमारे १८.५ अंश उत्तर असल्याने बुधवारी सूर्य याच स्थितीत पोहोचला होता.

शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी रस्ते, मैदानं, गच्च्या आणि उद्यानांमध्ये उभे राहून या घटनेचा अनुभव घेतला. सोशल मीडियावरही खांब, बाटल्या आणि इतर वस्तू सावलीशिवाय दिसणारी छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. आयुका तसेच विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. पाइप, सिलिंडर आणि उभ्या वस्तूंच्या साहाय्याने सावली कशी नाहीशी होते, हे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.

Navarashtra Special: मुंग्यांच्या वारुळांचे अदृश्य होत चाललेले जग; पर्यावरणातील असमतोलाचा गंभीर इशारा

वैज्ञानिकांच्या मते, ही घटना पृथ्वीचा झुकाव, सूर्याभोवतीची परिक्रमा आणि खगोलीय गणित समजून घेण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. विज्ञानप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांसाठीही हा दिवस विशेष आकर्षणाचा ठरला. खुल्या मैदानांमध्ये पाइप, सिलिंडर आणि इतर वस्तू ठेवून सावली गायब होण्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. वैज्ञानिकांच्या मते, या घटनेचा उपयोग पृथ्वीचा व्यास आणि आकार समजून घेण्यासाठीही केला जातो.

‘दररोज दुपारी सावली मोठी किंवा छोटी दिसते; मात्र आज काही क्षणांसाठी ती पूर्णपणे गायब झाल्यासारखी वाटली. पायाखालीच सावली लपल्याचा अनुभव खूप वेगळा होता.’
-विजय कांबळे, विद्यार्थी

Web Title: Citizens of pune experienced rare astronomical phenomenon known as zero shadow day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • navarashtra special
  • pune news
  • science news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Surveillance Day 2026: दरवर्षी 16 ऑगस्टलाच का साजरा होतो ‘निगराणी दिन’? जाणून घ्या यामागचे खास आणि रंजक कारण
2

Surveillance Day 2026: दरवर्षी 16 ऑगस्टलाच का साजरा होतो ‘निगराणी दिन’? जाणून घ्या यामागचे खास आणि रंजक कारण

National Roller Coaster Day :रोलर कोस्टर राईडचा थरार आणि इतिहास! जाणून घ्या ‘राष्ट्रीय रोलर कोस्टर दिन’ का साजरा केला जातो?
3

National Roller Coaster Day :रोलर कोस्टर राईडचा थरार आणि इतिहास! जाणून घ्या ‘राष्ट्रीय रोलर कोस्टर दिन’ का साजरा केला जातो?

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
4

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.