Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास

Dinvishesh : आज २४ जून भारताच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. या दिनविशेषच्या माध्यमातून आपण इतिहासातील सर्व घटनांचा आढावा घेणार आहोत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2026 | 08:54 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : भारताचे चौथे राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी यांची पुण्यतिथी आहे. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८९४ मध्ये झाला होता. त्यांनी १९६९ ते १९७४ च्या कालवधीत भारताचे चौथे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. ते भारताचे पहिले आणि एकमेव राष्ट्रपती जे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण जीवन वेतले. त्यांच्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील योगदाना अत्यंत महत्त्व दिले जाते. यासाठी त्यांना १९७५ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळतही आणि कामदार चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. २४ जून १९८० रोजी चेन्नई येथे त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने देशाने एक महान राष्ट्रनेता गमावला.

मराठी रंगभूमीवरील श्रेष्ठ आणि रुबाबदार अभिनेते नानासाहेब फाटक यांचा जन्म २४ जून १८९९ रोजी झाला होता. प्रभावी संवादकर्ते, धीरगंभीर आवाज आणि देखणे व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रक्षाबंधनमधील गिरीधर, एकच प्याला मधील सुधाकर, झुंजारराव आणि हॅम्लेट या भूमिका आजही लोकांच्या पसंतीस पडतात. त्यांना देशभरातल्या सर्वोत्कृष्ट नटाच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. मुखवट्याचे जग हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहे. त्यांच्या मराठी रंगभूमीवरील योगदानाचे अत्यंत महत्त्व आहे.

24 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1441 : इटन कॉलेजची स्थापना.
  • 1692 : किंग्स्टन शहराची स्थापना झाली.
  • 1793 : फ्रान्समध्ये पहिले प्रजासत्ताक राज्यघटना स्वीकारली.
  • 1812 : नेपोलियन बोनापार्टने रशियावर आक्रमण केले.
  • 1880 : ओ कॅनडा हे प्रथम कॅनडाचे राष्ट्रगीत म्हणून गायले गेले.
  • 1939 : सियामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – फ्रान्स आणि इटली यांच्यात युद्धविराम झाला.
  • 1982 : कर्नाटकातील सर्व शाळांमध्ये कन्नडचे शिक्षण अनिवार्य.
  • 1996 : मायकेल जॉन्सनचा 200 मीटरचा 19.66 सेकंदांचा धावून विश्वविक्रम.
  • 1998 : अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2001 : भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आय. एन. एस. विराटने आधुनिकीकरणानंतर नौदलात पुन्हा प्रवेश केला.
  • 2004 : न्यूयॉर्कमध्ये फाशीची शिक्षा असंवैधानिक ठरवण्यात आली.
  • 2008 : नेपाळचे पंतप्रधान गिरिजा प्रसाद कोईराला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • 2010 : जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या 27 व्या व पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास

24 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1862 : ‘श्रीधर बाळकृष्ण रानडे’ – रविकिरण मंडळाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 21 मार्च 1974)
  • 1863 : ‘विश्वनाथ काशिनाथ राजवाडे’ – प्रसिद्ध महाराष्ट्रीयन इतिहासाचार्य इतिहासकार, अभ्यासक, लेखक, भाष्यकार आणि वक्ते यांचा जन्मदिन.
  • 1870 : ‘दामोदर हरी चाफेकर’ – चार्ल्स रँड याची हत्या करणारे यांचा जन्म. (मृत्यू: 18 एप्रिल 1898)
  • 1892 : ‘श्रीधर बाळकृष्ण रानडे’ – रविकिरण मंडळाचे संस्थापक यांचा जन्म.(मृत्यू: 21 मार्च 1974)
  • 1893 : ‘रॉय ओ. डिस्नी’ – द वॉल्ट डिस्नी कंपनी चे सह-संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1971)
  • 1897 : ‘पंडीत औंकारनाथ ठाकूर’ – ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री यांचा जन्म. (मृत्यू: 29 डिसेंबर 1967)
  • 1899 : ‘नानासाहेब फाटक’ – मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 8 एप्रिल 1974)
  • 1908 : ‘गुरूगोपीनाथ’ – कथकली नर्तक यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1987)
  • 1927 : ‘कवियरासू कन्नडासन’ – तामिळ लेखक यांचा जन्म.
  • 1928 : ‘मृणाल केशव गोरे’ – महाराष्ट्रातील लोकनेत्या यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 2012)
  • 1937 : ‘अनिता मुजूमदार देसाई’ – ज्येष्ठ लेखिका यांचा जन्म.
  • 1962 : ‘गौतम शांतीलाल अदानी’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
  • 1987 : ‘लायोनेल आन्द्रेस मेस्सी’ – आर्जेन्टिना देशाचा फुटबॉल खेळाडू यांचा जन्म.
24 जून रोजी मृत्यू दिनविशेष

1881 : ‘पं. श्रद्धाराम शर्मा’ – लोकप्रिय आरती ओम जय जगदीश हरे निर्माता यांचे निधन.
1908 : ‘ग्रोव्हर क्लीव्हलँड’ – अमेरिकेचे 22वे आणि 24वे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1837)
1997 : ‘संयुक्ता पाणिग्रही’ – ओडिसी नर्तिका यांचे निधन. (जन्म: 24 ऑगस्ट 1944)
2013 : ‘एमिलियो कोलंबो’ – इटलीचे 40वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1920)
1980 : ‘वराहगिरी वेंकट गिरी’ – भारताचे चौथे राष्ट्रपति यांचे निधन.

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास

Web Title: Dinvishesh 24 june death anniversary of indias fourth president v v giri marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.