Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Paper Bag Day Special: कागदी पिशवी खरोखरच पर्यावरणपूरक आहे का?

कागद निर्मिती ही ऊर्जा-केंद्रित प्रक्रिया असल्याने कार्बन उत्सर्जनही होते. उत्पादनादरम्यान सल्फर ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सूक्ष्म कण यांसारखे प्रदूषक हवेत मिसळू शकतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 13, 2026 | 09:38 PM
World Paper Bag Day Special: कागदी पिशवी खरोखरच पर्यावरणपूरक आहे का?
Follow Us
Follow Us:
  • झाडे, पाणी आणि कार्बन उत्सर्जनाचे वास्तव
  • लाकडाच्या लगद्यापासून किंवा पुनर्वापरित कागदापासून तयार होतात कागदी पिशव्या 
  • एका टन कागदी लगद्यासाठी साधारण २० हजार ते ६० हजार लिटर पाणी 
सुनयना सोनवणे /पुणे: एका हातात कागदी पिशवी आणि मनात ‘मी पर्यावरणासाठी योग्य निर्णय घेतोय’ अशी भावना… प्लास्टिकच्या वाढत्या प्रदूषणामुळे आज अनेक ग्राहक कागदी पिशव्यांकडे वळत आहेत. प्लास्टिकबंदी, पर्यावरणाविषयी वाढलेली जागरूकता आणि बाजारपेठेतील बदल यामुळे कागदी पिशव्यांचा वापर (Navarashtra Special) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, कागदी पिशवी खरोखरच पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे का? तिच्या निर्मितीपासून ते विल्हेवाटीपर्यंतचा प्रवास पाहिला, तर त्यामागेही काही पर्यावरणीय आव्हाने आहेत. जागतिक कागदी पिशवी दिवसाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.

कागदी पिशव्या प्रामुख्याने लाकडाच्या लगद्यापासून किंवा पुनर्वापरित कागदापासून तयार केल्या जातात. पुनर्वापरित कागदाचा वापर केल्यास नवीन झाडांची गरज कमी होते. मात्र, नव्या कागदासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड आवश्यक असल्याने वनसंपत्तीवरील दबाव वाढू शकतो.

कागद निर्मिती प्रक्रियेत पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. लगदा तयार करणे, कागदाचे पत्रे बनवणे आणि ब्लीचिंग यासाठी पाणी आवश्यक असते. एका टन कागदी लगद्यासाठी साधारण २० हजार ते ६० हजार लिटरपर्यंत पाणी लागू शकते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यात रसायने, तंतू आणि ब्लीचिंग घटक असू शकतात. योग्य प्रक्रिया न झाल्यास हे घटक जलस्रोतांमध्ये मिसळून जलचर परिसंस्थेवर परिणाम करू शकतात.

पावसाच्या सरींमध्ये रुजतंय हरित स्वप्न; ‘फॉरेस्ट’चा १० लाख सीडबॉल्सचा संकल्प

कागद निर्मिती ही ऊर्जा-केंद्रित प्रक्रिया असल्याने कार्बन उत्सर्जनही होते. उत्पादनादरम्यान सल्फर ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सूक्ष्म कण यांसारखे प्रदूषक हवेत मिसळू शकतात. शाई, कोटिंग आणि चिकट पदार्थांच्या वापरामुळे कागदी पिशव्यांचा पर्यावरणीय ठसा आणखी वाढतो.

आई शप्पथ! 23% पावसाचे थेंब जमिनीवर पोहोचण्याआधीच…; ‘ IITM ‘च्या संशोधनातून निष्कर्ष

‘कागदी पिशवी ही प्लास्टिकला पर्याय आहे; पण ती पूर्णपणे पर्यावरणीय परिणाममुक्त नाही. खरा पर्यावरणपूरक मार्ग म्हणजे कमी वापर, वारंवार पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाट हा आहे. एखाद्या वस्तूला पर्यावरणपूरक म्हणण्यापूर्वी तिच्या संपूर्ण जीवनचक्राचा विचार करणे गरजेचे आहे. कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, वापर आणि पुनर्वापर या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात.’
– पूजा सोनसाळे, पर्यावरण अभ्यासक

Web Title: Due to increasing plastic pollution many consumers are buying paper bags today navarashtra special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • Environment Department
  • navarashtra special
  • plastic bag

संबंधित बातम्या

International Podcast Day: ऑडिओ कंटेंट निर्मितीतील क्रांती म्हणजे पॉडकास्ट; वाचा कसा होता ‘या’ माध्यमाचा रंजक प्रवास?
1

International Podcast Day: ऑडिओ कंटेंट निर्मितीतील क्रांती म्हणजे पॉडकास्ट; वाचा कसा होता ‘या’ माध्यमाचा रंजक प्रवास?

Translation Day : ‘या’ खास दिवशी केला जातो जगाला जवळ आणणाऱ्या ‘ज्ञानदूतांचा’ गौरव; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा रंजक इतिहास
2

Translation Day : ‘या’ खास दिवशी केला जातो जगाला जवळ आणणाऱ्या ‘ज्ञानदूतांचा’ गौरव; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा रंजक इतिहास

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव
3

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व
4

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.