आज फ्रान्सची आणि जगाची शान मानला जाणारा सर्वात प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय स्थळ आयफेल टॉवरचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी ३१ मार्च १८८९ मध्ये या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले होते. यामुळे हा दिवस आयफेल टॉवर डे म्हणून साजरा केला जाता. आयफेल टॉवर हा आज केवळ फ्रान्सच नाही, तर संपूर्ण जगाचे आकर्षण केंद्र बिंदू आहे. एकेकाळी या टॉवरला कुरुप मानले जायचे, पण आज या टॉवरला पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. आज आपण या आयफेल टॉवरची काही रंजक अशी तथ्ये जाणून घेणार आहोत.
१. नाव : पूर्वी या आयफेल टॉवरला ३०० मीटरचा लोखंडी टॉवर असेच म्हटले जायचे. याची रचना गुस्तावर आयफेल यांनी आखळी होती. परंतु हा टॉवर दिसण्यात एकदम कुरुप वाटायचा. याचे बांधकाम झाल्याच्या काही काळानंतर याला मिस्टर आयफेर यांचे नाव देण्यात आले आणि लोक आयफेल टॉवलर असे म्हणू लागले.
२. धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातील याची रचना तयार करताना मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. अलेक्झांडर ड्युमा, गाय डी मॉपासाँ यांसारख्या दिग्गज लेखकांनी याला ‘काळ्या चिमणीसारखा कुरूप संबोधले होते. मॉपसॉं यांनी या टॉवरवरील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते, परंतु नंतर त्यांनी हा टॉवर कुरुप नसून अत्यंत सुंदर असल्याचे म्हटले.
३. मूळ रचनाकार : खरे तर याची डिझाइन गुस्तावर आयफेल यांच्या कंपनीतील इंजिनीअर मॉरिस कोचलिन आणि एमिल नौगुयर यांनी केली होती. परंतु या डिझाइनला सुरुवातीला गुस्ताव आयफेल यांनी विरोध केला होता. त्यांना यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या होता, ज्यामुळे याची उभारणा केल्यास ते पडण्याची शक्यता होती. परंतु नंतर गुस्ताव यांनी यामध्ये सुधारणा करुन प्रकल्प यशस्वी केला.
४. हा टॉवर केवळ पर्यटनासाठी नाही, तर याच्यावर एक प्रयोगशाळाही उभारण्यात आला आहे. या प्रयोगशाळेत हवामानशास्त्र आणि भौतिकशास्त्रास्त्राचे प्रयोग केले जातात.
५. हा टॉवर रात्रीच्या वेळी दर तासाला काही मिनिटांसाठी झळाळून उठतो, जो पर्यटकांसाठी एक अद्भुत अनुभव असतो.
६. आश्चर्यकारक बाब म्हणजे, या आयफेल टॉवरची उंची ऋतूंनुसार बदलते. हा लोखंडाचा टॉवर उष्णतेमुळे उन्हाळ्यात काही मिलीमीटरने मोठा वाटतो आणि हिवाळ्यात पुन्हा याची उंची पूर्ववत होते. तापानानुसार याची उंची बदलत राहते असे तज्ञ सांगतता.
७. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या आयफेल टॉवरला उद्ध्वस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु फ्रान्सच्या मित्र राष्ट्रांचे सैन्य वेळेत पोहोचले आणि ही ऐतिहासिक वास्तू थोड्याक्यात बचावली. आज ही ऐतिहासिक वास्तू प्रेमाचे प्रतीकही मानली जाते.






